शीर्षकावरून समजले असेलच की हि पाकृ केवळ आणि केवळ जेवण बनवण्याच्या कौशल्यात निपुण नसलेल्यांसाठी आणि काहीही पचवण्याच्या कौशल्यात पारंगत असलेल्यांसाठीच आहे.
एकेकाळी, म्हणजे बारावी नापास होत असताना घरी होतो तेव्हा बरेचदा हा प्रकार करून झाला आहे. मात्र कैक वर्षांनी आज लग्नानंतर, जेव्हा बायको माहेरी आणि आईवडील नातेवाईकांकडे, असा दुहेरी सुवर्णयोग आला, तेव्हा पुन्हा एकदा किचन ओट्यावर हात साफ करायची संधी मिळाली. तिचा पुरेपूर वापर करत आज हि डिश तुमच्यासमोर पेश करत आहे. ज्यांना जेवण फक्त गरमच काय ते करता येते आणि तरीही बाहेरचे न खाता घरचेच आवडते अश्यांना फायद्याचे ठरू शकेल हि यामागची सद्भावना आणि जाणकारांकडून चार टिपा मलाही मिळतील हा यामागचा सदहेतू.
तर,
एका माणसासाठी रावडाचिवडा बनवायला लागणारे साहित्य आहे,
खालीलप्रमाणे :-
तयार भात - प्रमाण आपल्या पोटाच्या अंदाजाने
कोणत्याही प्रकारची तयार डाळ, आमटी, कालवण वगैरे - प्रमाण भात कोलसवण्याइतपत (गोडे वा आंबट वरणापेक्षा तिखट डाळ वा आमटीला जास्त पसंती.)
तयार भाज्या - घरात, फ्रिजमध्ये, आजच्या, कालच्या, परवाच्या, असतील नसतील तेवढ्या सर्व! शेजार्यांकडे फक्त तेवढे मागायला जाऊ नका.
अंडे - ज्यांना चालते त्यांच्यासाठी तर मस्ट’च. (अंड्याला या प्रकारात सोन्याची किंमत. कारण सोन्याचे जसे ठोकून पत्रा करणे, खेचून तार करणे, (ज्याला सायंटिफिक भाषेत तन्यता-वर्धनीयता असेही म्हणतात) तसे काहीही करता येते, त्याचप्रमाणे इथेही अंड्याचे आपल्या आवडी आणि मर्जीनुसार भुर्जी ऑमलेट बॉईल’एग वगैरे काहीही करता येते.)
शेव, फरसाण, चिवडा, बाकरवडी - उपलब्धतेनुसार
मीठ - चवीनुसार
सॉस, ठेचा, लालतिखट चटण्या - आवडीनुसार
लोणचे - हे मात्र हवेच ! प्रकार कुठलाही चालेल.
पापड, रायता, पकोडे ईत्यादी ईत्यादी - मूळ पदार्थाला असल्या कुबड्यांची गरज लागत नाही.
शीतपेय - थंडगार ताक किंवा लिंबू-कोकम सरबत.
---------------------------------------------------------------------------------
तर,
आता काय करायचे हे दरवेळी बदलत असल्याने आज मी काय केले हेच सांगतो.
कृती :-
१) सर्वप्रथम एक पसरट भांडे घेतले. (पसरट टोप वा कढई काहीही चालते, फक्त जे काही आई-बायकोने स्वच्छ धुतलेले असेल आणि आपल्याला धुवायची गरज लागणार नाही असे एखादे घ्यावे. कारण असल्या धुण्यापुसण्यातच अर्धी शक्ती खल्लास झाली तर पुढचा पदार्थ बनवायचा उत्साह मावळायची भिती असते.)
२) त्यानंतर एका अंड्याला जेवढे तेल लागते त्याच्या दुप्पट तेल त्या टोपात ओतून घेतले. चमच्याने छानपैकी टोपभर पसरवले. गॅस चालू करून तापायला ठेवले. पहिला तडतड आवाज येताच लागलीच घाबरून गॅस बंद केला. स्वयंपाक करणे आपल्या रोजच्या सवयीचे नसल्यास उकळत्या तेलाशी जास्त खेळू नये.
३) आता फ्रिजमधले थंडगार अंडे एका चमच्याने टकटकवून त्या तेलात सावकाश सोडले आणि टरफले बोटाने साफ पुसून फेकून दिल्यावर गॅस पुन्हा चालू केला. (सेफ गेम, याचे दोन फायदे - एक तर तडतडत्या तेलात अंडे सोडायची रिस्क नाही. दुसरे म्हणजे टरफले पुसून, फेकून, हात धुवुन, होईपर्यंत तेलातले अंडे करपायची भिती नाही.)
४) आता त्याच चमच्याने टोपातले अंडे परतायला घेतले. त्याआधी त्यात मीठ टाकायला मात्र विसरलो नाही. मसाला टाकायचे टाळले कारण त्याने अंड्याची मूळ चव लोप पावते जे या डिशमध्ये मला नको होते.
५) अंड्याचा कच्चेपणा जाऊ लागला तसे ते लालसर व्हायच्या आधीच गॅस पुन्हा एकदा बंद केला. पनीर असो वा अंडे, जास्त तळले गेले की रबरासारखे चिवट होते आणि त्याच्यातील फ्रेशनेसपणा जातो. (वैयक्तिक मत)
६) आता मूळ डिशला थोडावेळ विश्राम देत शीतपेय बनवायला घेतले. ताकाचा बेत होता. आपली नेहमीचीच पद्धत. तांब्यात दही, मीठ, थंड पाणी आणि रवीने घुसळणे. मॅगी नूडल्सनंतर मला परफेक्ट जमणारा हा दुसरा पदार्थ. तसे यात काही कठीण नसते, पण माझ्या रवी घुसळायच्या हाताला गुण आहे असे घरचे म्हणतात. (माझ्या मॅगीबद्दलही असेच म्हणतात, कदाचित मला जे जमतेय ते काम तरी माझ्याकडून काढून घ्यावे या हेतूनेही चढवत असतील.)
७) आता वेळ होती कूकरमधील भात काढून (जो आईने सकाळीच केला होता) त्या टोपातल्या तळलेल्या अंड्याबरोबर मिसळून घ्यायची. मगाशी वर अंड्यास तळताना गरजेपेक्षा जास्त तेल घ्या असे सांगितले होते ते याचसाठी जेणेकरून आताचा भातही त्या तेलात थोडाफार तळला जाईल. सोबतीला आवडीनुसार कोणताही लालतिखट मसाला टाकू शकतो. माझा पावभाजीचा मसालाही वापरून झालाय. पण आज मात्र घरात शोध घेता ‘लाल ठेचा’ गवसला. ज्यात लाल मिरची आणि सुके खोबरे असल्याने एकंदरीत भाताला फ्लेवर छानच येणार होता. छानपैकी अर्धी मूठ भुरभुरला आणि चमच्याने पुन्हा परतायला घेतले.
............बस्स हाच तो क्षण जेव्हा भाताचे बदलणारे रंग पाहता मला आठवले की या डिशचे फोटो काढून काय कसे बनवले हे व्हॉट्सपवर बायकोशी शेअर करावे. मला मॅगी बनवणे आणि जेवण गरम करणे याव्यतिरीक्त आणखीही बरेच(?) काही करता येते यावर ती दाखवत असलेला अविश्वास मला आज तोडायचा होता.
इथे एक नम्रपणे नमूद करू इच्छितो - फोटो मोबाईलने काढल्याने आणि मोबाईलची सेटींग गंडल्याने फार काही सुरेख आले नाहीत, म्हणून फोटोंची क्वालिटी बघून पदार्थांची चव ठरवू नका. फिशटॅंक मधील मासे कितीही रंगीबेरंगी आणि छानछान दिसत असले तरी ते खायला तितकेच चवदार लागतील असे नसते, तिथे चारचौघांसारखा दिसणारा बांगडाच हवा.
.
तर हा पहिला फोटो टोपात परतलेल्या भाताचा ज्याला ‘एग फ्राईड राईस विथ महाराष्ट्रीयन तडका’ असेही बोलू शकतो.
.
८) टोपातला भात काढून ताटात घेतला आणि त्यावर घरात सापडलेली बारीक तिखट शेव पसरवली. सोबतीला चितळे बंधू बाकरवडी देखील होती, तर ती सुद्धा दाताने कचाकचा कुरतडून त्यावर सोडली. इथे हा भात मी स्वताच आणि एकटाच खात असल्याने बाकरवडी दाताने तोडली कारण मला स्वताच्या उष्ट्याचे चालते.
.
हा दुसरा फोटो त्या भाताला ताटात घेतल्यावरचा प्लस तिखट शेव आणि बाकरवडीचा.
(जाणकार व्यक्ती फोटो झूम करून चेक करू शकता की खरोखर चितळेंचीच बाकरवडी होती, टीआरपीसाठी त्यांचे नाव घेतलेले नाहीये)
.
.
लगे हात मगाशी घुसळून ठेवलेल्या ताकाचाही एक फोटो काढून घेतला.
.
९) ग्रेवी बनवण्यासाठी आता त्याच रिकाम्या टोपात डाळ घेतली आणि भाजीचा शोध घेता फ्रीजमध्ये कालची शेंगाबटाट्याची एकच काय ती माझ्या आवडीची भाजी सापडली. काही हरकत नाही, भारंभार सतरा पदार्थ असण्यापेक्षा मोजकेच पण आवडीचे पदार्थ या प्रकारासाठी केव्हाही चांगलेच. आता इथे काही विशेष करायचे नव्हते. डाळ आणि भाजी एकत्र करून छानपैकी एक कढ घ्यायचा होता. पण तरीही थोडीफार वेगळी चव म्हणून अर्धा चमचा दही त्यात टाकले. (कधी मूड आला तर टोमेटो सॉसही टाकायचो) अर्थात आमची डाळ आणि भाजी तिखट असल्याने त्यात दही टाकले पण कोणाकडे तिखट डाळ-भाजी नसल्यास प्लीजच हं मग नको त्यात दही.
.
हा पुढचा फोटो त्या तयार ग्रेवीचा - दोन बटाटे आणि तीन शेंगा एवढे मोजकेच माझ्यापुरतेच घेतले. या प्रकारात पोटाचा अंदाज घेऊन अन्नाची नाशाडी होऊ नये हे बघणे खूप महत्वाचे असते.
.
.
हा फोटो आता पर्यंत तयार झालेल्या एकंदरीत सर्वच जेवणाचा.
यात ताटात अॅड झालेली लोणच्याची फोड विशेष महत्व राखते. इतरवेळी मला लोणचे हवेच असा आग्रह नसला, अगदी हॉटेलमध्ये मिळणारे फुकटचेही खात नसलो, तरी या डिशबरोबर ते आवर्जून लागतेच.
.
१०) फोटोग्राफीच्या नादात ग्रेवी थंड झाली असे जाणवल्याने पुन्हा एकदा गॅसवर ठेऊन एक कढ काढून घेतला.
.
पण फोटो काढायची एव्हाना चटक लागल्याने खायला सुरुवात करायच्या अगदी आधी हा खालचा फोटो काढायचा मोह काही बाई आवरला नाही.
.
एक सांगावेसे वाटणारे - अंडे फोडण्यापासून, भात परतवायला, डाळ-भाजी घेऊन ती ढवळायला वापरला जाणारा तो एकच एक चमचा जेवायच्या वेळी मात्र ताटातून अल्लद बाहेर काढून बोटांना गरम चटके देत खायची मजा काही औरच !
तळटीप - सारे फोटो मुद्दामहूनच खालच्या फरशीवर काढले आहेत. किचनमधील पसारा एकाही फोटोत दिसून बायकोच्या शिव्या खायला लागू नये यासाठी घेतलेली हि काळजी. तरी यावरून हे मीच कश्यावरून बनवले असा अविश्वास कोणी माझ्यावर दाखवू नये. खुद्द माझ्या बायकोने यावर विश्वास ठेऊन मला ‘मिस्टरशेफ’चे प्रशस्तीपत्रक दिले आहे
- तुमचा अभिषेक
इथे कोणाला (इथेच काय कुठेच
इथे कोणाला (इथेच काय कुठेच कोणाला) पाकृ सांगायची पात्रता नाही.
तरीही धागा ललितलेखनात न टाकता या विभागात टाकायची हिंमत दाखवतोय.
मस्त...
मस्त...
मस्त
मस्त
अभिषेक... मस्त लिहिलंयस
अभिषेक... मस्त लिहिलंयस आपलं केलायेस भात कम...
येव्हढ्या>>> वस्तू टाकल्यात भातात... मॉडर्न गोपाळकाला दिस्तोय...
चला तुला "काहीतरी" बनवता येते
चला तुला "काहीतरी" बनवता येते म्हणायचे
भारी जमलिये पाककृती (लेख).
भारी जमलिये पाककृती (लेख). पदार्थाचं .... तुझ्याहातचा खाल्ल्यावर(च) सांगेन.
मस्त पाककृती !
मस्त पाककृती !
नापाककृती आवडली. आवडली म्हणजे
नापाककृती आवडली. आवडली म्हणजे फक्त बघण्यापुरती, खायची अर्थातच हिम्मत होणार नाही.
काही सूचना -
१. फोटोवर तुम्ही तुमचे नाव टाकले नाही. पुढे मागे कुणी ही पाक्रु फोटोसकट स्वतःच्या नावावर खपवायचा प्रयत्न केला तर मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही तरी पुरावा असावा.
खरं तर तुम्हीच कशावरून इतर कुणाची पाक्रु ढापून येथे टाकलेली नाही कशावरून?
२. शेगडीचा फोटो टाकायला विसरलात.
३. पाकृचा मुख्य फायदा मला जाणवला तो असा म्हणजे दर वेळेला तुम्हाला नवं काही तरी खाल्ल्याचं समाधान देण्याची ताकद या पाकृमध्ये मलातरी जाणवते.
आणखी काही सुचलं तर टंकेनच. सध्या एवढेच पुरे.
आपल्याच तोडीचा पाककलातज्ञ, मॉन्सस्टर शेफ,
तुमचा बोबडे बोल
अभिषेक, जबरी पा.कृ. संजीव
अभिषेक, जबरी पा.कृ.
संजीव कपूरला टफ फाइट देणार आपण.
भारी जमलिये पाककृती (लेख).
भारी जमलिये पाककृती (लेख). पदार्थाचं .... तुझ्याहातचा खाल्ल्यावर(च) सांगेन.
>>>>>>>>>>>>>>>>
अहो दाद, लेखाचे नको हो पदार्थाचेच कौतुक करा. मुळात पदार्थ चांगलाच जमला म्हणून तर फोटो काढून लिहावेसे वाटले, काहीतरी लिहायला सुचले म्हणून स्वयंपाकघरात पळालो नाहीये
बाकी माझ्या बायकोनेही फोटो बघून करून खाऊ घाल म्हणून नंबर लावलाय, त्यापुढचा नंबर तुम्हाला देतो
...
३. पाकृचा मुख्य फायदा मला जाणवला तो असा म्हणजे दर वेळेला तुम्हाला नवं काही तरी खाल्ल्याचं समाधान देण्याची ताकद या पाकृमध्ये मलातरी जाणवते.
>>>>>>>>>>>
अगदी अगदी बो बो +७८६
...
आशिका, कोण संजीव कपूर ???
भ यावह वाटली पाकृ घट्क पदार्थ
भ यावह वाटली पाकृ घट्क पदार्थ वाचूनच! :p
<<<<<<< नानबा | 11 May, 2014
<<<<<<< नानबा | 11 May, 2014 - 14:38
भ यावह वाटली पाकृ घट्क पदार्थ वाचूनच! >>>>>>>>
ब्वा.. धारपांची पुस्तकं वाचणाऱ्यांना ही पाकृ भयावह वाटली म्हणजे आता बोला...
आशिका, कोण संजीव कपूर ???>>>
आशिका, कोण संजीव कपूर ???>>> शेफ नं.१ झी टी.व्ही. वरचे सगळ्या पा. कृ. शोजमध्ये असतोच असतो.
( पा.कृ. + फोटो + लेख ) भारी
( पा.कृ. + फोटो + लेख ) भारी !
पाककृती आमच्या सारख्यांच्या
पाककृती आमच्या सारख्यांच्या उपयोगाची.
तुम्हाला मिस्टरशेफचे प्रश्स्तीपत्रक मिळाले आहे, सावधान धोक्याची चाहुल. :
गाडगे बाबा की जय...!
गाडगे बाबा की जय...!
भयंकर तोंपासु. भात जीव की
भयंकर तोंपासु. भात जीव की प्राण.
भन्नाट पाकृ आहे!! नवर्याला
भन्नाट पाकृ आहे!! नवर्याला फॉरवर्ड केलीये.
अभिषेक, काही प्रश्न आहेत. त्यावर आपणासारख्या मास्टरशेफचे अनुभवी बोल ऐकायला आय मीन वाचायला मिळाले तर आनंदच आहे.
बाकरवडी दाताने तोडून न टाकता सुरीने बारीक चिरून टाकावी का?
पापडाची गरज नाही असे वाचले पण घरात असल्यास चुरडून टाकला तर चालेल का?
टोपातली डाळ एकदम भसकन ताटलीत ओतून घ्यायची का? कारण डाव दिसला नाही. तसेच लोणच्यासाठी चमचा, भाताची वाढणी पण दिसले नाही.
किचनचा पण एक फोटो टाकायचा की. का टाकला नाही? जरा नवशिक्यांना प्रेरणा मिळाली असती!
जेवण झाल्यावर ही भांडी कुणी घासली?
या पाकृनंतर किचन मधे प्रवेश करताना काय वाटते?..................च्यायला, काय राडा झालाय!! की चला मस्त रावडाचिवडा करून खाऊया!! की जन्माचे सार्थक वगैरे!!
घरात तयार भात आणि डाळ
घरात तयार भात आणि डाळ अस्तांना ही डीश बनवलीत म्हणजे ग्रेट्च आहात तुम्ही! फोटो भारी आहेत
तुमचा अभिषेक भौ, नानबांना ही
तुमचा अभिषेक भौ, नानबांना ही पाकृ भयावह वाटली.
कृपया हे जे काही आहे ते भयकथा म्हणून पुनर्प्रकाशित करा.
नाही तरी तेवढा एकच वांगेमय प्रकार तुमच्याकडून हाताळायचा राहून गेलाय
फिशटॅंक मधील मासे कितीही
फिशटॅंक मधील मासे कितीही रंगीबेरंगी आणि छानछान दिसत असले तरी ते खायला तितकेच चवदार लागतील असे नसते, तिथे चारचौघांसारखा दिसणारा बांगडाच हवा.>>> हे आवडलं!!
डोंबल!!!
डोंबल!!!
बाकरवडी दाताने तोडून न टाकता
बाकरवडी दाताने तोडून न टाकता सुरीने बारीक चिरून टाकावी का?
>>
हरकत नाही, पण दाताने तोडणार्याला थोडी बाकरवडी गटकवताही येते हा फायदा लक्षात घ्या.
पापडाची गरज नाही असे वाचले पण घरात असल्यास चुरडून टाकला तर चालेल का?
>>
हरकत नाही, पण पापड तळायचा वा भाजायचा म्हटले तर अनुक्रमे उकळत्या तेलाशी आणि आगीशी खेळ झाला की.
टोपातली डाळ एकदम भसकन ताटलीत ओतून घ्यायची का? कारण डाव दिसला नाही.
>>
अहो यामागे माझा कोणताच डाव नव्हता हो, तर दिसणार कसा?
तसेच लोणच्यासाठी चमचा,
>>
त्याला चमचा कशाला, लोणचा तो सीधी उंगली से भी निकलता है.
भाताची वाढणी पण दिसले नाही.
>>
डाळ-भात-भाजी वगैरे वगैरे फ्रिजमधील भांड्यातून टोपात, आणि टोपातून ताटात नेण्यासाठी एकच चमचा पुन्हा पुन्हा धुवुन वापरता येतो की. याचसाठी तर बिल्डरने किचन ओट्याजवळ वॉशबेसिन दिले असते.
किचनचा पण एक फोटो टाकायचा की. का टाकला नाही?
>>
लेखात लिहिलेय की कारण. बायकोने माहेराहून हाणला असता.
जेवण झाल्यावर ही भांडी कुणी घासली?
>>
कामवाली बाई, महिन्यातून एकदोनदा हा एवढा त्रास होणार या अटीवरच तिला कामाला ठेवलेय.
बाकी पाकृ अशी आहे की ताट-वाटी-टोप-चमचा चाटून पुसून साफ कराल, तेवढाच धुवण्यार्याला तरास कमी.
या पाकृनंतर किचन मधे प्रवेश करताना काय वाटते?
>>
खूप इमोशनल व्हायला होते, किचनच्या डोळ्यातून पाणी येईल आणि येत जारे असा अधूनमधून वरचेवर म्हणत दोनचार भांडी खणखणतील असे वाटते.
खुप भन्नाट लिहीलय... हसुन
खुप भन्नाट लिहीलय... हसुन हसुन वाट लागली... त्यात अंड वगळलं तर चालेल...
त्यात अंड वगळलं तर
त्यात अंड वगळलं तर चालेल...
>>>
सांगता आहात की विचारताहात ?
यात काहीही चालते, करणारे आपणच असल्याने आपल्याला आपली आवड ठाऊक असल्याने जे काही बनवाल ते आपल्याला आवडतेच.
मी बारावीला एक वर्ष घरी होतो तेव्हा माझ्या रिकाम्या घरात पोरांचा अडडा भरायचा, ते सर्वच मी रोज जे काही बनवायचो त्यावर तुटून पडायचे. अर्थात सत्ते पे सत्ता स्टाईल. कारण एक डिश मला स्वताला तर एखाद अर्धी डिश ते जितके असतील त्यांना.
यात उकळत्या ग्रेव्हीमध्ये भात सोडून बनवलेले खिमाटही छान लागते. मात्र शेवफरसाण जो यातील माझ्या आवडीचा घटक तो गॅस काढायच्या अगदी आधी टाकायचे. कारण ते नरम पडून त्यात मिक्स झाले नाही पाहिजे.
यात आणखी एक गंमत म्हणजे आदल्या दिवशीची डाळ वा रस्सा भाजी आणखी मजा देऊन जाते कारण ती मस्त मुरलेली असते आणि विशेष म्हणजे खाताना शिळे खातोय असे नाही वाटत.
भन्नाट! पाकृपेक्षा मला तुमचे
भन्नाट!
पाकृपेक्षा मला तुमचे संदर्भासहित स्पष्टीकरणं - लेख्/प्रतिक्रिया- दोन्ही आवड्लं.. त्याबद्द्लच एक प्रशस्तीपत्र फ्री घ्या
हो, लोकांना
हो, लोकांना खाद्यपदार्थापेक्षा लेखातच जास्त रस दिसून आला म्हणून ललितात हलवला.
असो, धन्यवाद
avantar : bobade bol, tyane
avantar :
bobade bol, tyane ek bhayakatha hi lihili ahe
tyachya lekhanat jaun vacha
avantar : bobade bol, tyane
avantar :
bobade bol, tyane ek bhayakatha hi lihili ahe
tyachya lekhanat jaun vacha
??????
कुठली ग्ग?
ती पालीची का?
तसेच एक "बाराच्या भावात भुताच्या गावात" नामक पण होती पण ती फारशी भयकथा होती असे वाटत नाही..
ho ti barachya bhavat
ho ti barachya bhavat valich....
mala bhiti wataleli
Pages