उपक्रम

मभागौदि २०२५, निसर्गायण - मंगलाजोडी, चिल्का सरोवर पक्षीनिरिक्षण - मामी

Submitted by मामी on 27 February, 2025 - 09:01

चिल्का सरोवर भुवनेश्वरपासून साधारण ६० किमी. केवळ दीड तासात पोहोचतो आपण. मात्र सहसा सर्व पर्यटक चिल्का सरोवराच्या दक्षिण तटाला भेट देतात. तिथून बोटी निघतात, डॉल्फिन्स दाखवतात, बेटावर नेतात, मोतीवाले शिंपले दाखवून ते फोडून त्यातून मोती काढून दाखवतात आणि विकत घेण्याची गळ घालतात. हे आम्ही केलं आणि मग पुन्हा मागे येऊन सरोवराला वळसा घालून चिल्काच्या उत्तर किनार्‍यावर असलेल्या भानौपो चिलिका येथे मुक्कामाला आलो. आपल्याला अश्या नाविकतळावर जाण्याची वेळ आणि संधी मिळेलच असं नाही पण आम्हाला नशिबाने या सुंदर स्वच्छ तळावर राहता आलं.

विषय: 

मभागौदि २०२५ शशक - प्रश्न - हाडळीचा आशिक

Submitted by हाडळीचा आशिक on 27 February, 2025 - 05:28

आज काहीसुद्धा मिळालं नाही... उलट नेहेमीपेक्षा जास्तच ऐकायला लागलं...

हा मोठ्ठा ! सदानकदा ध्यानस्थ पंचवटीखाली.. काहीही न करता... मला दररोज गावात जावं लागतं.. भावाबहिणीकडे बघून.. याला बोलायला गेलं तर हसून म्हणतो कसा; 'मला कुठं खायला लागतं ! हा देह श्वासांवर चालतो.. तुम्हीसुद्धा प्रयत्न करा..'

'वारेवा.. तूही बस आम्हीसुद्धा बसतो..' यावरसुद्धा हसलाच.. नेहेमीसारखा.. गूढ..
आळशी !

विषय: 

मभागौदि २०२५ - निसर्गायण - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 February, 2025 - 23:20

सूर्य अस्ताचलाकडे कलायला लागतो, सावल्या लांब होऊ लागतात. पाखरं घरट्यांकडे, खिलारं गोठ्यांकडे परतायला लागतात.
ज्यांना घर असतं, ती माणसं झपाझप घरांकडे निघतात.
ज्यांना घर नसतं, ती जड पावलांनी घराच्या कल्पनेकडे, किंवा घराच्या आठवणींकडे…

विषय: 
शब्दखुणा: 

मराठी भाषा गौरव दिन २०२५ - निसर्गायण!

Submitted by छन्दिफन्दि on 25 February, 2025 - 19:00

निसर्गायण मध्ये
फळं, फुलं, पानं, पर्वत केंद्रित हे आधीचे पाच लेख.

पानगळतीच्या ऋतु मधील रंगांची उधळण...
https://www.maayboli.com/node/82630

वसंतऋतु मधे बहरणारी फळांची फुले ..
https://www.maayboli.com/node/83139

ड्रॅगन फ्रूट च एकाच रात्रीपुरतं उगवणार, ब्रम्हकमळसारखं दिसणार शुभ्र फुल..
https://www.maayboli.com/node/83279

मभागौदि २०२५ शशक- ब्रह्मांड गेमिंग कंपनी अनलिमिटेड - मामी

Submitted by मामी on 25 February, 2025 - 10:45

"सर, त्रिमुर्ती क्लाएंटच्या नारायण मूर्तीकडून पुन्हा रिक्वेस्ट आली आहे. अजूनही गेम रटाळ वाटतोय. इतर दोन डायरेक्टर्सचंही तेच म्हणणं आहे. तो भैरव नंदी वैतागून प्रोजेक्टच रद्द करत होता. ब्रह्मेंनी त्याला थोपवलं म्हणे."

"अरेच्चा! अजूनही समाधान नाही मूर्तीचं? त्याच्यासारखं आम्हीही अहोरात्र काम करायचं काय! बरं आता ते खास सहा डार्क भावना-प्रोग्रॅम्स आहेत ते फिट करा गेममधल्या सर्व पात्रांत. अर्थात प्रत्येकात वेगवेगळं प्रमाण हवं. घ्या किती रंजक हवंय ते! आता बोंबलले तरीही हे प्रोग्रॅम्स काढता येणार नाहीत सांगा."

"आणि गेम हाताबाहेर गेला तर?????? "

विषय: 

मभागौदि २०२५ शशक - मोह - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 February, 2025 - 09:08

'आलास संभ्या, ये ये! अलाबला घिऊ दे तुजी!' म्हातारीनं त्याला जवळ बोलावलं. त्याच्या आठवणीत कायम तिला माजघरातच पाहिली असली, तरी ती त्याची पणजी नाही हे त्याला माहीत होतं. कधी आईला विचारलं तर ती 'तुला कशापायी चौकशा? त्या हाइत म्हून आपन हाओत!' एवढंच म्हणायची. पण त्याची शहरातली नोकरी सुटून तो परत आला, तेव्हा गणा मांत्रिक म्हणाला 'ती लासवट हाय, तंवर आसंच! तुज्या खानदानाला खाऊन बसली, तुला बी गिळंल! शाना आसशील तर येत्या अमुशेला...'.

विषय: 
शब्दखुणा: 

मभागौदि २०२५ शशक – माल घाण असेल तर – तुष्की

Submitted by तुष्कीनागपुरी on 25 February, 2025 - 04:26

“बाबा हे काय करता?” नेहमीच्या बालसुलभ कुतुहलाने तिने विचारले.
“अगं घाणेरडे झालेले भाग काढून टाकतोय
आपण जो माल विकतो
तो घाण असेल तर लोकं घेणार नाहीत ना”
हे ऐकून तिचे डोळे मोठे झाले तोंड वावच्या अभिनिवेषात उघडेच होते काही वेळ
काहीतरी विलक्षण शोध लागलाय असे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
ती तिच्या झपाटलेल्या अवस्थेत जाता जाता बोलून गेली,
“एक सॉलिड आयडिया आली यावरून बाबा
मी आजच मिनी ला सांगते शाळेत
की नेहमीप्रमाणे कुणी घरात नसताना तुझे मोठे काका आले
की तोंडात माती कोंबत जा
आणि चड्डीत सू करून टाकत जा

मभागौदि २०२५ शशक - बाबा - तुष्की

Submitted by तुष्कीनागपुरी on 25 February, 2025 - 02:39

“अगं तू सुयश ला घ्यायला लवकरच येशील का, अगं काही नाही कुणाशी बोलतच नाहीये तो?” असा फोन आला आणि तिच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली. मित्राच्या वाढदिवसासाठी दोन तास तरी लागतील म्हणून त्यानंतर घ्यायला जायचे ठरले होते.

आपल्याला बाबा नाही याबद्दल तो कधीही उघड बोललेला नव्हता. तिनेही कधी बाबाची उणीव भासू नये म्हणून कोणतीच कसर राहू दिली नव्हती. पाचवीतच होता कोवळेच वय त्याचे.

मत्सर मैत्रीतही काय घडवेल सांगता येत नाही. बाबा नसण्यावरून तर चिडवले नसेल?

त्याचे डबडबलेले डोळे पाहून तिच्या मनात अनुकंपा झरू लागली.

मभागौदि २०२५ शशक - उशीर - तुष्की

Submitted by तुष्कीनागपुरी on 25 February, 2025 - 02:10

ग्राऊंड च्या कडेला एकटाच शिक्षा म्हणून तो उभा होता.

“आधीच वेळ दिलेली होती आणि गटातले सगळे खेळाच्या सरावासाठी बरोबर आले, तू वेळेवर का आला नाहीस?”, कर्कश्य आवाजात ओरडत सरांचा तिसऱ्यांदा विचारलेला प्रश्न, तरी तो गप्पच होता.

“तुझ्या बाबांना फोन केला तेव्हा तू वेळेवर निघाला हे त्यांनी सांगितले, अरे मग तरीही उशीर कसा झाला? कुठे घालवलास हा वेळ?”, सरांचा थयथयाट शब्दात मावत नसल्याने डोळ्यांवाटे पण प्रकटत होता.

खोटे त्याला बोलायचे नव्हते, जे घडले त्या आनंदासमोर ही शिक्षा काहीच नव्हती.

तो पठ्ठा गप्पच होता.

मभागौदि २०२५ शशक - स्टेयरिंग व्हील - तुष्की

Submitted by तुष्कीनागपुरी on 25 February, 2025 - 01:33

दोन दिवसांनी पेपर आहे.
आजचा सुटीचा दिवस निट अभ्यास करण्यात घालवायचा,
तिने मनात ठरवले होते.

“आज तरी अभ्यास करणार आहेस का?”, या आईच्या वाक्याने दिवसाची सुरवात झाली.

तिने काय ठरवले आहे न विचारता, ती काय करणार आहे हे गृहित धरून असलेले आईचे वाक्य ऐकताच तिचे डोके सटकले.
अभ्यास करण्याची कोणतीच कृती करायची इच्छा किंवा विचाराला तिच्या डोक्यात आता जागाच उरलेली नव्हती.
सगळी जागा रागाने भरलेली.

Pages

Subscribe to RSS - उपक्रम