जंगलातले उंच वयोपरत्त्वे वठलेले झाड. मुळावर उठलेल्या वडवानला थोपवत अजुनतरी ताठ. इथल्या प्रजातींचे जैववैविध्य जपले, मूळच्या आणि नंतर रुजलेल्या; आता इथल्याच झालेल्या जाती जपल्या म्हणून सुबत्ता होती, पूर्वसुरींचा वसाच! पण टोलेजंग इमारती बांधणार्यांना त्याचं काय? एकाच साच्यातले पांढरे ठोकळे जोपासायचे, अफरातफर, सग्यासोयर्यांना कंत्राटं आणि नटलेलं जंगल उध्वस्त! सीमेवर भिंत उभारुन वारा थोपवायच्या, पूर्वीचं वैभव दाखवायच्या वल्गना!
वठलेल्या झाडावर हल्ला सोपाच, शकले उडू लागली आणि सार्या जंगलाचेच अवसान गळाले.
छोट्या घराकडे निघाला होता. खिशातून दोन नाईसची बिस्किटं बाहेर काढत असतानाच त्याला रस्त्याच्या बाजूला मातीच्या ढेकळांत एका पिवळ्या तुकड्याभोवती जमलेले मुंगळे दिसले.
'अरेच्चा! काल इथे आपली लिमलेटची गोळी पडली तिचा तुकडा दिसतोय. मस्त मेजवानी सुरुये!'
छोट्यानं बिस्किटं तोंडात कोंबली आणि खाली बसून तो मुंगळ्यांचं निरीक्षण करू लागला.
बिस्किटं तोंडात कोंबताना अर्धी खाली सांडली याचीही त्याला फिकीर नव्हती.
डिस्क्लेमर: पक्के चहाबाज असाल तर या शिर्षकातला 'टी' तुम्ही वाचू नका . फुल चहाचे अपभ्रंश करुन लिहीलेल्या शब्दातल्या 'चा' कडेही तुम्ही बघू नका. पण एक वेगळ्या स्वादाचे पेय म्हणून एकदा तरी नक्की करुन बघा. करायलाही फार कष्ट नाहीत.
चला मग करुन बघुया हे दोन चहा
१) गोकर्ण फुलाचा चहा आणि २) जास्वंद फुलाचा चहा
प्रचि:
डोंगराच्या पायथ्याशी तिला हालचाल जाणवली. तिने धोका ओळखून इतरांना बोलावले. घाबरतच सगळे जमा झाले.
त्यांना धीर देण्यासाठी ती बोलली. "ते चोर इथे पोचतील पण घाबरून जाऊ नका. दर वेळेला आपल्या घरांवर ते हल्ला करून आपली संपत्ती घेऊन जातात. पण या वेळी आपण त्यांना हल्ला करायला वेळच द्यायचा नाही".
पोचल्यावर चोरांतील एकाने मशाल पेटवायला घेतली तेवढ्यात लपून बसलेला एक गट एकजुटीने त्यांच्यावर तुटून पडला. त्यांना सुरक्षाकवच घालायला सुद्धा वेळ दिला नाही. ते चोर जोरजोरात आक्रोश करू लागले आणि सैरावैरा धावू लागले.
घटक पदार्थ: १-२ ग्लास आंबील करण्यासाठी
१) नाचणी सत्व/ नाचणी पीठ ३ चमचे
२) पाणी दिड ते दोन ग्लास
३) मीठ (साधे किंवा सैधव)
४) पुदीना ५-६ पाने
५) मिरची तिखटवाली असेल तर अर्धी किंवा पाव मिरची
६) जिरे पावडर अर्धा चमचा
७) आलं अर्ध पेर
८) ताक
९) कोथिंबीर
(यात घटक पदार्थ आणि काही प्रमाणात कृतीमध्ये व्हेरिएशन्स आहेत. मी आज केलेली कृती खाली सविस्तर देते. व्हेरिएशन्स नंतर सगळ्यात खाली लिहेन.)
सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
साहित्य:
मूग, तूर आणि मसूर या डाळी - प्रत्येकी अर्धी वाटी
तांदूळ - एक वाटी
लसूण - पाच सहा पाकळ्या
हिरवी मिरची - दोन
जिरे - एक टीस्पून
मीठ चवीनुसार
लोणी, लसूण चटणी रंगरंगोटीसाठी!
कृती:
१. डाळी आणि तांदूळ पाणी थोडे वर राहील इतके भिजवून दिवसभर ठेवा. रात्री ते पाण्याशिवाय मिक्सरमधून फिरवून रवाळ पातळसर पीठ झाकून ठेवा.
२. सकाळी पीठ आंबून छान फुगलेले असेल. त्यात लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा आणि मीठ घाला. थोडे पाणी घालून बॅटर नीट ढवळून घोटून घ्या.
मोदक आणि वर तुपाची धार, गूळखोबरं, खिरापत, पंचामृत, लाडू - पेढे, वडया, केळीच्या पानावर वाढलेली गरमागरम वरणभाताची मूद, रंगीबेरंगी चटण्या-कोशिंबिरी, ऋषींची भाजी, गौरींचा नैवेद्य, बाप्पाची शिदोरी आणि निरोप देऊन आल्यावर चटकदार वाटली-डाळ! गणपतीबाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा चांगलाच खवैय्यासुद्धा आहे बरं! मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केले, पाहुण्यांना वाटायची खिरापत काय तयार केली याची चित्रमय झलक बघायला मायबोलीकर उत्सुक आहेत.
वाजत गाजत, थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या, समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीनच उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.
त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२४' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

मंगलमूती मोरया! गणपती बाप्पा मोरया!
कविता म्हणजे काय? कुणी म्हणेल 'जे गद्य नाही ते पद्य'. कुणी म्हणेल 'ट' ला 'ट' आणि 'प्राची' ला 'गच्ची' लावून जी होते ती कविता. कुणी म्हणेल पाऊस पडला, प्रेम जडलं आणि मग मोडलं ही की जे 'होतं' ती कविता, तर कोणी म्हणेल वक्रोक्ती हा तर कवितेचा गाभा.
कविता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अलंकार, प्रतिके, प्रतिमा, मिथके अशा गोष्टींचा वापर करुन छंदबद्ध, वृत्तबद्ध किंवा मुक्तशैलीत लिहिलेली रचना येते. बर्याचदा कविता वाचली की काहीतरी खोलवर जाणवते. अरे हे तर आपल्याच मनीचे गूज होते, त्याची कविता कशी बनली याची मौज ही वाटते आणि ती कविता त्या कवीची न राहता आपलीच बनते.
गणपती ही जशी विद्येची देवता आहे तशी संकल्पपूर्तीला मदत करणारी देखील आहे. आपण कुठली पूजा करायला सुरुवात करण्यापूर्वी गणेशाला वंदन करुन संकल्पमंत्र म्हणतो आणि इष्टदेवतेला ते संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करतो.