उपक्रम

शशक स्पर्धा - स्वाती_आंबोळे - परिपूर्ती

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 September, 2026 - 16:03

खेद न कसला, खंत न काही
खळबळ खदखद उरली नाही
खेळ आवरुन खोल सागरी
निखळ नितळ जळ वाहत जाई

खळाळ बाळपणींचा ठेवा
खट्याळ वळणे तारुण्याची
उमगुन येणे खाचाखोचा
हीच खरी खुण पक्वपणाची

दर्‍या नि खोरी खोदत फुलवत
खूप खेळुनी झाले आहे
खडकांवरती कभिन्न काळ्या
खळ्ळ आदळुन झाले आहे

खाचा, खळगे मागे पडले
तशाच विरल्या लाटा लहरी
अखेरीस ये वळण असेही
अखंड तृप्ती केवळ उरली

क्षितिजावरती सुवर्ण खिरते
नभोमंडळी किलबिलती खग
प्रवास आखिव काठांमधला
अखेर होई अथांग, व्यापक

विषय: 

शशक स्पर्धा-कविन-विरह

Submitted by कविन on 17 September, 2026 - 05:58

कुठेतरी बॅकग्राऊंडला रेडीओ सुरु आहे. “जीवलगा कधी रे येशील तू…” 

गेला महिनाभर ती डोळ्यात प्राण आणून त्याची वाट बघतेय पण तो मात्र….

तिच्या घरातल्यांनी तर आता आशाच सोडलेय. रोज तिचे मन गुंतवायचा प्रयत्न करतायत. त्यांचे यत्न तिला कळतायत, पण तिच्या मनाला त्याचीच ओढ लागलेय हे त्यांना कसे समजावे?

आता पुढचं गाणं लागलय “साजण दारी उभा..” 

“विरह नको, ये की रे” हे म्हणताना काळीज वेदनेने पिळवटते तिचे.

ती जिंकतेच शेवटी, त्याला यावच लागतं.

“किती वाट बघायला लावलीस?” ती त्याला घट्ट मिठीत घेत म्हणते 

शशक स्पर्धा- आशिका -राजांची कापडं- (रस- वीर, अलंकार - उपमा, अपन्हुती)

Submitted by आशिका on 17 September, 2026 - 04:58

"आक्षी राजावानी दिसायलास रं" हे ऐकतांच त्याचे बाहु अभिमानाने स्फुरण पावले.

'राजांची कापडं' अंगावर लेणं हे केव्हढं भाग्य !
त्यासाठी एकदाच काय दहादा मृत्यूला सामोरं जायची तयारी होती त्याची.... राजांसाठी....स्वराज्यासाठी !!

बेत पक्का झाला. 'राजांची कापडं' ल्यालेला 'तो' पालखीत बसला. आज तो शिवा काशिद नाही तर शिवाजी राजाच भासत होता. पन्हाळगडावरुन पालखी उचलली गेली. मशाली पेटवल्या गेल्या, ... अर्धी वाट सरली असेल, .....पालखी पकडली गेली आणि शिवाला अटक करण्यात आली.

विषय: 

पाककृती स्पर्धा क्रमांक १ (जिन्नस एक, पदार्थ अनेक) आणि क्रमांक २ (पाककृती लेखन) - स्वाती_आंबोळे - तीन अंकी लोकप्रिय नाटक : लाडका

Submitted by स्वाती_आंबोळे on 15 September, 2026 - 19:44

नमस्कार!
रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून सहर्ष सादर करीत आहोत, तीन अंकी चवदार नाटक 'लाडका'.
प्रायोजक : गार्डनिंगची हौस असणारी मैत्रीण
लेखिका : आऊसाहेब
दिग्दर्शिका आणि सूत्रधार : स्वाती आंबोळे
कलाकार : कांदा, लसूण, दाण्याचं कूट, तीळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, फोडणीचं साहित्य, लाल तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ, आगळ
आणि तिहेरी प्रमुख भूमिकेत आपला सगळ्यांचा लाडका - दोडका!
.

विषय: 

पाककृती लेखन स्पर्धा - आम्रसांदणी - स्वाती आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 14 September, 2026 - 12:39

अजूनही चुकवून दाखवा, आम्रसांदणी सोपी आहे
जुनीच आहे पाककृती, पण लिहिण्याची ढब ताजी आहे

रवा छान बारीकच कपभर, खमंग भाजा शुद्ध तुपावर
रंग गुलाबी, खरपुस दरवळ हीच कसोटी त्याची आहे

ताटलीत पसरून निवू द्या, तोवर कपभर आम्रस काढा
रेष-न्-रेष रसातिल आता गाळुन काढायाची आहे

दही घट्ट घाला अर्धा कप, मिश्रण घुसळुन एकजिव करा
निवलेला मिसळून रवा, मग साखर घालायाची आहे

मीठ चिमुटभर घालुन, ढवळुन, दोन तास हे मुरवत ठेवा
दूध घालुनी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायाची आहे

विषय: 

लेखन उपक्रम : माझा पहिला विमानप्रवास

Submitted by संयोजक on 13 September, 2026 - 21:24

नमस्कार मायबोलीकर मंडळी!

विमानप्रवास!

लहानपणापासून आपल्याला का कोण जाणे, ज्या गोष्टींचे आकर्षण असते, त्यांत बहुतांश लोकांच्या यादीत विमान व विमानप्रवास असतील. आताच्या पिढीला कदाचित त्याचे फारसे अप्रूप नसावे, पण आपण जेव्हा लहानाचे मोठे झालो तेव्हा विमानप्रवासाला एक वलय होते.

विमानाची ती पुस्तकासारखी तिकिटे, आकर्षक पायलट व हवाई सुंदर्‍या, विमानात भरपूर चॉकलेट्स खायला मिळतात याचे कौतुक! विमान उड्डाण करताना व उतरताना आकाशातून दिसणारी शहरे व गावे डोळे भरून बघायला मिळावीत, म्हणून खिडकीच्या काचेवर नाक दाबून खालचं विहंगम दृष्य नजरेत साठवण्याची कोण ती धडपड!

विषय: 

लेखन उपक्रम : चुरा लिया है तुमने जो दिल को - आशा

Submitted by संयोजक on 13 September, 2026 - 19:03

नमस्कार मायबोलीकर मंडळी!

आशा!
आशा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो प्रसन्न, हसरा चेहरा, आणि मनात चालू होतं 'सलोना सा सजन है', ' अभी ना जाओ छो़डकर', 'बिते ना बिते ना रैना', किंवा 'झुमका गिरा रे' नाहीतर 'पांडुरंग कांती', 'बुगडी माझी' आणि 'विकत घेतला श्याम'!
आशाने इतक्या विविध प्रकारची, भाषांतली, संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली अनेकविध ढंगी गाणी गायली आहेत की स्तिमित वगैरे होणे सोडा, आपल्याही चेहर्‍यावर फक्त हसुच येतं.

सामूहिक स्वयंपाकघरे आणि स्त्री-सक्षमीकरणाचा जागतिक पट

Submitted by राज अज्ञानी on 24 August, 2026 - 02:05

प्रस्तावना : मायबोलीच्या वाचकांसाठी हा लेख आहे. यात स्वयंपाकघरातील कामगारांचे स्वरूप, अर्थकारण, वेतन/मेहनताना आणि कार्यपद्धती यावर सविस्तर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हढी माहिती मिळाली ती दिली आहे. वैयक्तिक मर्यादा असल्याने खूपशी माहिती मिळाली नाही. त्यामुळे वाचक आपल्याकडची माहिती या धाग्यावर देऊन हा उपक्रम समृद्ध करू शकतात. जागतिक पटलावर हा उपक्रम संख्येने खूपच कमी दिसतो. पण एक सुरूवात म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. याचे फायदे तोटे यावर प्रतिसादात बोलूच. जगभरात किचनची जबाबदारी स्त्रीकडेच असते त्यामुळे हा उपक्रम महत्वाचा वाटतो.

शब्दखुणा: 

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २: बंगलोर ते मलावली ९३ किमी

Submitted by मार्गी on 13 March, 2026 - 10:52

✪ वन्य परिसरातून सायकल प्रवास
✪ कर्नाटकमधील शांत रस्ते आणि छोटी गावं!
✪ “अरे ओ सांबा" जिथे घडलं असेल असे डोंगर
✪ ननगे स्वल्पा कन्नडा गोत्तू
✪ स्वीडनमधील सायकल मित्रासोबत भेट
✪ सूर्य नमस्काराची सप्त नमस्कार आवृत्ती
✪ Well began is half done!

Pages

Subscribe to RSS - उपक्रम