उपक्रम

मराठी भाषा दिन २०१८ - उपक्रम - ते दोघे

Submitted by मभा दिन संयोजक on 14 February, 2018 - 23:52

ते दोघे

बऱ्याचदा आपण समोरच्या दोन व्यक्तींचे हावभाव बघून त्यांच्यात नेमके काय बोलणे चाललंय याचा अंदाज लावतो. काही वेळा तो बरोबर असतो तर काही वेळा फसतो.

विषय: 

मराठी भाषा दिवस २०१८ - संयोजक हवेत

Submitted by admin on 28 January, 2018 - 21:45

कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . २०१५ चा अपवाद वगळता गेली ७ वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. या वर्षी ही काही मायबोलीकरांनी आवर्जून तो साजरा करण्यासाठी विचारपूस केली आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.

विषय: 

वाढदिवस

Submitted by अंबज्ञ on 4 November, 2017 - 14:52

.

.

जसा उद्या तसाच आजचा दिवस
तरीही कारण ह्या दिवसाचे ख़ास 
आहे आज तुझा वाढदिवस 
सुंदर वर्षाचा जणु सुवर्णकळस

तुझ्या सर्वच आकांक्षापुढे
राहु दे कायम गगन ठेंगणे   
दृढ़ निश्चयाने छान सजू दे
आयुष्याची सुंदर स्वप्न रंगवणे 

जगण्याचा असे एक दिलासा,
तुझ्या लास्य अमृत हसण्यात 
मृत्युसही जिथे संजीवनी देई
गुंततो जीव नव्याने जगण्यात       

मायबोली गणेशोत्सव २०१७ - मतदान

Submitted by admin on 10 September, 2017 - 00:49

शू पॉलिश -
https://www.maayboli.com/node/63596 - योग
https://www.maayboli.com/node/63688 - कविन
https://www.maayboli.com/node/63690 - 'रंगरसिया' शू पॉलिश - योग
https://www.maayboli.com/node/63704 - रंगेबिरंगी बुटपॉलिश "शिंकलास्की पॉलिश" - मामी

विषय: 

रंगरंगोटी- विराज- ४.५ वर्षे

Submitted by संपदा on 6 September, 2017 - 01:39

मायबोली गणेशोत्सवात भाग घ्यायचे विराजचे हे पहिलेच वर्षं, त्यामुळे तो गणपतीचे चित्र रंगवून देण्यासाठी उत्सुक होता. घरी १० दिवसांचा गणपती असल्याने घरच्या गणपतीकडे बघत हे चित्र रंगवण्यात आले आहे Biggrin

IMG_0622_1.jpg

विषय: 

कविकल्पना -६- नशीब एकेकाचं!

Submitted by संयोजक on 2 September, 2017 - 13:02

कविकल्पना - ६ - नशीब एकेकाचं!
तर यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या ह्या कविला बाहेर पडू द्या.
संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत.
आम्ही आपल्याला कवितांसाठी काही शीर्षके देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक शीर्षकांवर किती कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही. शीर्षक कवितेमधे आलेच पाहिजे असा आग्रह नाही. शीर्षक रुढार्थानेच वापरायला हवे असे बंधन नाही.
थोडक्यात काय तर 'होऊ दे खर्च'

प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ३ - खेळ मांडियेला!

Submitted by संयोजक on 2 September, 2017 - 10:38

प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ३ - विषय - खेळ मांडियेला!

शब्दखुणा: 

खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द

Submitted by संयोजक on 2 September, 2017 - 10:34

खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.

अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - रंगेबिरंगी बुटपॉलिश "शिंकलास्की पॉलिश"

Submitted by मामी on 2 September, 2017 - 04:12

सेल्ले लॉट्टे, सेल्ले लॉट्टे !!!!!!

बारतामदे पहिल्यांदा च - दुनिया मधे बोलाबाला जालेलं पोलिश शास्त्रज्ञांनी शोधलेलं आफ्रिकेत ल्या रंग बदलत्या सरड्यापासून बनलेल बुट पॉलिश! "शिंकलास्की पॉलिश" - एक डब्बा उघडा अन तुमचे रंगबिरंगी बुट चमकवा.

विषय: 

STY 3

Submitted by संयोजक on 1 September, 2017 - 16:31

नैनिताल जवळच्या डोंगरांमधे जेथे कॅम्प व आजूबाजूला सहज गाणी म्हणत फिरण्यासारखी जागा आहे अशा एका ठिकाणी मिस लाजो आणि मिस लिली या दोघी एक कॅम्प चालवत असतात. कॅम्पचे सुपरवायझिंग, कॅम्प अॅडमिनिस्ट्रेटर मि. पंडित ("पंडितजी") वर लाइन मारणे, व इतर वेळेस सतत पोळ्या करणे यात त्या नेहमी गर्क असतात. तशा दोघी बहिणी पण दरवर्षी एकमेकींमधे आपापले गट सर्वात भारी करण्याची कॉम्पिटिशन असते. ती हेल्दी असते, त्या बनवत आणि सतत खात असलेल्या पदार्थांचा अपवाद वगळून. उन्हाळा नुकताच सुरू झालेला असतो. एक बॅच फुल स्विंग मधे असते व नवीन बॅच ची तयारी ऑफिस मधे सुरू असते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - उपक्रम