उपक्रम
मराठी भाषा दिन २०१८ - घोषणा
मराठी भाषा दिन घोषणा
कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्याचीच आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.
चला तर मग मंडळी, सज्ज होऊयात कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी संपन्न होणाऱ्या या आपल्या मायमराठीच्या कौतुक सोहळ्यात सहभागी होण्यास आणि अभिमानाने म्हणण्यास,
लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी !
जाहलो खरेच धन्य,ऐकतो मराठी !!
वर्षा विहार २०२५ - संयोजक हवे आहेत.
नमस्कार मायबोलीकर,
एक खुशखबर. २०२४ नंतर यंदाही २०२५ मधे वर्षा विहार पुन्हा उत्साहात करायचे ठरवले आहे. यंदाच्या ववि संयोजनाची धुरा अनुभवी आणि जाणत्या मायबोलीकरांनी उचललेली आहे. त्यांच्या मदतीसाठी ताज्या दमाच्या मायबोलीवर वावर असणाऱ्या संयोजकांची आवश्यकता आहे. तेव्हा तुम्हाला जर यात सहभागी होण्याची इच्छा असेल तर इथे नाव नोंदवा.
अधिक माहिती लवकरच कळवू.
मभागौदि २०२५ - निसर्गायण - आकाशातील भयनाट्य - मामी
२०१८ च्या जुलै महिन्यात ग्लेशियर आणि यलोस्टोन नॅशनल पार्कांना भेट दिली होती. त्यादरम्यान आमच्या विमानप्रवासात एक भयंकर प्रसंग गुदरला होता. त्या तश्या परिस्थितीतही मी प्रसंगावधान राखून फोटो काढले होते. या भयनाट्याला खरंतर मनाच्या तळाशी दाबून टाकायला हवं पण मायबोलीकर आपलेच आहेत म्हणून तो प्रसंग इथे शेअर करत आहे.
म भा गौ दि २०२५ - निसर्गायण - तो माझा सांगाती! - छंदीफंदी
तो माझ्या आयुष्यात अगदी लहानपणी आईचं बोट पकडून चालायचे तेव्हापासून आहे.
ऊन्ह कलायला लागली की आम्ही, आजूबाजूची मुलं, आया मंडळी, सगळं गावचं तिकडे लोटायचं म्हणा ना!
जाताना भातुकलीची खेळणी घेऊन जायचं, त्या काळी सँड किट नव्हते ना! ओल्या वाळूत खड्डे खणायचे, विहिरी खोदायच्या, डोंगर बनवायचे, कपात थोड पाणी आणून विहीर भरण्याचा निष्फळ प्रयत्न करायचा, काडीने त्या ओल्या वाळूवर नावे लिहायची, चित्र काढायची, ओल्या वाळूचे मस्त लाडू वळायचे, कधी ते एकमेकांच्या अंगावर फोडले जायचे, तर कधी ते एकमेकांवर रचून त्यांचं कासव बनवायचं..
मैलोन मैल भटकत शंख शिंपले गोळा करायचे.. अगदी पिशवी भरभरून…
मभागौदि २०२५- निसर्गायण - विमानतळावर - फारएण्ड
रात्रीचा प्रवास करून आपण पहाटे ५ च्या सुमारास एखाद्या "हब" विमानतळावर उतरलोय. झोप नीट झालेली नाही पण आता उडाली आहे. बराचसा प्रवास झालेला आहे आणि आता एक छोटी फ्लाइट घेतली, की घरी. अशा वेळेस मधे जर २-३ तासाचा वेळ असेल तर तो एरव्ही कंटाळवाणा होतो. पण पहाटे सगळे उघडायच्या आसपास जर पोहोचलो तर तो वेळ फार छान असतो. अनेकदा विमानप्रवास करणार्यांना प्रवासातील बहुतांश गोष्टींचे काही अप्रूप राहिलेले नसते पण या पहाटेच्या लेओव्हरचे मला कायम आकर्षण आहे, विशेषतः घरी येउन मग आराम असेल तर.
मभागौदि २०२५ - निसर्गायण - काही खाजगी क्षण- कविन
माझा सगळ्यात पहिला ट्रेक नाणेघाटचा होता. बहुतेक नोव्हेंबर मधे केला होता. त्यानंतर २-३ वेळा नाणेघाट ट्रेक केला वेगवेगळ्या ऋतुंमधे. पावसाळ्यातला नाणेघाट हा नोव्हेंबरच्या नाणेघाटापेक्षा वेगळा होता आणि ऐन उन्हाळ्यात पहाटे चढताना जाणवलेला नाणेघाट हा अजून वेगळा अनुभव होता.
वाट तीच होती. मी ही तीच होते तरी प्रत्येक वेळेस मनात कोरला गेलेला नाणेघाट वेगळा होता. बरे त्याच १०-१२ जणांसोबत दरवेळी केलेला हा ट्रेक प्रत्येकाला वेगळा अनुभव देऊन गेला होता. बहुतेक प्रत्येका बरोबरचा त्याचा करार वेगळा होता.
मभागौदि २०२५ - अक्षरचित्र - सान्या - मायबोली सदस्यनाम - सोनपरी
मभागौदि २०२५ शशक- मोह - मानव
“काजिनकाबा!”
“खरं?”
“हाव जी. मले काय मालुम कोनं घेतली?”
“बरं. पन काल तू गेलतां न देवयात माय संग.”
“हाव. पन माय त्याईच्याशी बोलुन राहीली होती. मले म्हने “बाब्या, ते पाय तिकडं म्हैस हागुन राहीली. जाय टोपलं घेउन पटकन अन शेन घरी नेजो. गवऱ्या पन थापुन ठेवजो.”"
“मंग?”
“मंग मी पयालो घरी, टोपलं घेतलं, गेलो म्हशीकडं.”
“पन पहिले तूनं वाकुन काईतरी उचललं नं. उषा सांगुन राहीली.”
“खोटं सांगुन राहीली ते. ते तं म्हशीकडं पाहुन राहीली होती.”
“बरं मंग?”
“म्या शेन आनलं घरी, गवऱ्या थापुन ठेवल्या.”
मभागौदि २०२५, निसर्गायण - मंगलाजोडी, चिल्का सरोवर पक्षीनिरिक्षण - मामी
चिल्का सरोवर भुवनेश्वरपासून साधारण ६० किमी. केवळ दीड तासात पोहोचतो आपण. मात्र सहसा सर्व पर्यटक चिल्का सरोवराच्या दक्षिण तटाला भेट देतात. तिथून बोटी निघतात, डॉल्फिन्स दाखवतात, बेटावर नेतात, मोतीवाले शिंपले दाखवून ते फोडून त्यातून मोती काढून दाखवतात आणि विकत घेण्याची गळ घालतात. हे आम्ही केलं आणि मग पुन्हा मागे येऊन सरोवराला वळसा घालून चिल्काच्या उत्तर किनार्यावर असलेल्या भानौपो चिलिका येथे मुक्कामाला आलो. आपल्याला अश्या नाविकतळावर जाण्याची वेळ आणि संधी मिळेलच असं नाही पण आम्हाला नशिबाने या सुंदर स्वच्छ तळावर राहता आलं.
Pages
