Dragon Fruit, south/ central America मध्ये होणाऱ्या फळांचे , एका रात्रीपुरते उमलणारे फुल!

Submitted by छन्दिफन्दि on 15 April, 2023 - 23:48

जुलै २०२१ मधील अनुभव

आज सकाळी नवर्याने घाईघाईने बाहेर बागेत बोलावले. बघते तर कोपर्यातल्या निवडुन्गाला एक भले मोठे फ़ुल आले होते. पांढरे शुभ्र. जवळ गेल्यावर खूप छान सुगंध आला.
आम्ही ह्या घरात रहायला येऊन तीन महीने होतील. त्यामुळे येथील झाडांशी पूर्ण परिचय नाही झाला अजून. कोपर्यात 2-3 निवडुंग होती, काहिशी दुर्लक्षितच. मला निवडुन्गाची फारशी आवड नाही. आणि त्या ओबड दोभडं दिसणाऱ्या निवडुंगाला इतके सुंदर आणि सुगंधित फुल. क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसेना.

dragonflwr1.jpg

येवढया सुन्दर फ़ुलाचा फोटो न घेतला तरच नवल. cactus ला येवढं मोठं फ़ुल कधिच ऐकल किंवा पहिलं नव्हतं. मन तिथेच रेंगाळत राहिलं.
मग लगेच google लेन्स वरुन बघितल तर कळलं की हे तर Costa Rican Pitahaya / Costa Rica nightblooming cactus आहे.
थोडसं आपल्या ब्रम्ह्कमळासारखं दिसणारं पण एकदम वेगळ्या जातिचं फुल. अजुन google / You tube वर थोडा वेळ घालवल्यावर कळलं की हे Dragon Fruit चं फुल आहे . माझ्या खवय्या मुलामुळे मला Dragan fruit ट्रॉपिकल आणि इकडे दुर्मिळ असल्याचे माहित होते. एका कुठल्याशा दुकानात सहा dollars ना एक छोटसं फळ घेतले होते म्हणजे नक्कीच खास होते.
तर हे कॅक्टस जातीचेच झुडूप असते. तीन-चार वर्षा नंतर ह्या झाडांना फुले येण्याची शक्यता असते. मोठ्या फुलात एक छोटे फ़ुल दिसते तो त्याचा stigma (female part ) असतो. खाली जे पराग कण दिसतात (pollens ) तो male part.
सुर्यस्ताच्या दरम्याने ती कळी उमलायला लागते. रात्री ते फुल अगदी चांगले बहरते. रात्रिच्या वेळी जे कीटक , bats त्याच्यावर बसतील ते pollination घडवून आणतात .फुल सेल्फ़् pollinating असेल आणि हे घडलं तर पुढे त्या फुलाचे फळ बनते. नाहीतर फुल गळुन पडते . मग ह्यावर दुसरा उपाय म्हणजे फुल उमललं असताना hand pollination करणे.
ही सगळी माहिती गोळा करून परत बागेत गेले.

dragonflwr5.jpg

बघितले तर दुपारी बारा वाजता फुल बंद व्हायला लागले. आणि अर्ध्या तासात बंदच झाले.मलुल झाले. इतक स्पेशल फुल आणि ते फुलताना आपल्याला बघायला नाही मिळालं, मन उगाच खट्टू झालं.
पण बाजुच्या फांदीवर एक अजून कळी बघीतली आणि हुश्श वाटलं. आज हीचं काय होत ते बघूया .

dragonflwr6_1.jpg

रात्री साडे आठच्या दरम्याने फुल उमलले. रात्रीच्या मंद चांदण्यात ते पूर्ण उमललेले पांढरे शुभ्र फुल, त्याचा मंद सुवास, आणि हवेतील गारवा वेगळीच अनुभूति होती.
आम्ही ह्यावेळी पूर्ण तयारीत होतो. रंगवायचा ब्रश घेउन hand pollination केले, उगाच किटकांच्या भरवशावर Dragon Fruit चे भविष्य का सोडा.
राहून राहून नवल वाटलं, रात्री इतक्या दिमाखात अगदी राजासारख मिरवणारं फुल दुपार होई पर्यंत अगदीच गलितगात्र होऊन मान टाकते, ह्या दिमाखदार फुलाचं आयुष्य अवघे काही तासांपुरतेच, निसर्गाच्या मनात आलं तर त्या फुलाचं पुढे फळ होणार नाहीतर मग ते गळून पडणार. खरंच किती क्षणभंगुर आहे सारे!
बघा कसा दिवस गेला?
सकाळी ज्याची सुतराम कल्पनाही नव्हती त्या Costa Rican Pitahaya भोवती अख्खा दिवस गेला. एक दुर्मिळ ( आमच्यासाठी तरी) अनुभव मिळाला. Technology ह्या वेळी एक वरदान बनुन आम्हाला निसर्गाच्या जवळ घेऊन गेली आणि निसर्गाची किमया अनुभवता आली.
Fingers crossed. बघुया काय होतयं पुढे Dragon Fruit येत का ते!

https://youtube.com/shorts/CkeCKajpytw?feature=share

तळटीप - ड्रॅगनफ्रुट नाही आलं

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओबडडीभाडं>> म्हणजे काय? कोव्ह फेफे आठ्वलं.

ड्रेगन फ्रुट इथे रेगुलर मिळते. खूप सुंदर रंगसंगती आहे फळाची.

corrected!

ड्रेगन फ्रुट इथे रेगुलर मिळते>>> चान्गल आहे. ते उष्णकटिबंधीय फळ आहे.
या एखाद वर्षात इकडेही आधीपेक्षा जास्त प्रमाणात बघायला मिळतात.

छान लेख आणि फोटो. अजून व्हिडीओ नाही बघितला.

ड्रॅगनफ्रुट नाही आलं >>> ओहह अरेरे.

नवरा आणतो हे फळ, मला आवडत नाही फार, याबद्दल फार माहीती नव्हती, या लेखात समजली.

या एखाद वर्षात इकडेही आधीपेक्षा जास्त प्रमाणात बघायला मिळतात.>> समहाउ फार महाग आहेत इकडे $६.९९ पर पाउन्ड म्हणजे फार महाग होत किमान दिड पाउन्ड तरी भरतच एखाद फळ. भारतात स्वस्त वाटले मला.

लेख छान.

फळ ओवरहाइप्ड.. मी १००रु देऊन घेतले होते पण चवच नाही.

साधना, अन्जू धन्यवाद!

समहाउ फार महाग आहेत इकडे $६.९९ पर पाउन्ड>>>> इकडे अशी ट्रॉपिकल फळं बऱ्याचदा खूप महाग मिळतात. आणि चविष्ट हि नसतात हे माझं एक निरीक्षण. उदा. पेरू, बोरं, जांभळं

२०१४ मध्ये ठाण्यात तरी ड्रॅगन फ्रुट कधी बघितलं नव्हतं, इकडे आल्यावरच पहिल्यांदा पाहिलं.

इथे ठाण्यात अगदी सहज मिळतं ( गेल्या ४/५ वर्षात मिळायला लागलंय)
अजिबात चव नाही ते माईल्ड गोड चव अशी रेंज आहे.
थंडगार करून खायला छान वाटतं.
फ्रूट सलाड मध्ये पण छान वाटतं.

अजिबात चव नाही ते माईल्ड गोड चव अशी रेंज आहे.>>> हो मी आणल आणी ते नेमक सपक निघाल.
भारतात स्वस्त होते आणी तिकडे खाल्ले ते चान्गले पण होते

लेख छान आहे. हे फळ नविन माहित झालं तेव्हा गुगल केलं होतं, पण असं झुडूप आणि फुलं पहायला आवडलं. छान माहिती.
ड्रॅगन फ्रुटला विशिष्ठ अशी चव नसतेच. (Just like Avocado).
त्याचे health benefits आणि nutrition मुळे खाल्ले जाते. मी सलाड मधे बारीक चिरून वापरते, ज्यामुळे बाकीच्या भाज्या आणि क्वचित वापरलेलं सलाड ड्रेसिंग मुळे ते खायला ठीक लागतं.
गेल्या 4-5 वर्षातच या फळाची ओळख झाली. सुरुवातीला फार exclusive वाटणारं फळ आता बोपदेव घाटात (सासवड - पुणे) स्थानिक शेतकऱ्यांना विकताना पाहिलं. आणि एवढी कमी किंमत पाहता ते खरच त्यांच्या शेतात पिकवलेल असणार.

फळ ओवरहाइप्ड.. मी १००रु देऊन घेतले होते पण चवच नाही. >>> सेम पिंच, एकदा असंच महाग आणलेलं. एकदा जरा बरं मिळालेलं, पण चव सो सोच दोन्ही वेळा. ते किवी पण तसलंच, मला समहाऊ इथे मिळणारी फळं आवडतात. नवरा आणतो पैसे खर्च करुन बेचव फळं.

कोल्हापुर्,सातारा,सांगली भागात खुप शेतकरी ड्रॅगन फ्रुट्ची शेती करताहेत. चांगला भाव मिळतो .

ते किवी पण तसलंच, मला समहाऊ इथे मिळणारी फळं आवडतात>>>>

हिरवे किवी अजिबात घ्यायचे नाही, आंबट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट.. गोल्डन किवी मिळायला लागलीत. ती मस्त लागतात.

स्थानिक फळे खावीत हे उत्तम!!!

पण तिथेही काय बोलणार ... १००० रुपये डझनने आंबे इथे गावी विकतात, त्यातले चार पाच टाकुन द्यावे लागतात, आतुन लागलेले असतात. आणि चव??? रामा शिवा गोविंदा!!!! परवा फणस घेतला इथे. एकशे पन्नास म्हणाला, म्हटले आंबोलीतल्या लोकांना गावातल्या गावातच भाव वाढवुन सांगतोस का? तसा १०० रु ला दिला. पण काय मजा नाय. कोवळा फणस झाडावरुन पाडुन पिकवलेला, त्यामुळे आतुन एका बाजुने झेझरलेला. गरे अगदी कागदासारखे पातळ व बेचव. मी सध्या झाडावरची जांभळे, पेरु आणि तुत्या खातेय. तेच सुख. आंबोलीत जांभळाची झाडे काळी दिसताहेत इतकी जांभळे लागलीत.

गोल्डन किवी मिळायला लागलीत. ती मस्त लागतात. >>> तेच आणलेलं, नाही आवडलं.

स्थानिक फळे खावीत हे उत्तम!!! >>> सहमत.

स्थानिक फळे खावीत हेच खरे . साधना , लकी आहात ! एवढी जांभळे बघायला तरी मिळत आहेत . पुण्यात फार नाहीत विकायला , थोडी दिसली ती १०० रू. पावशेर !!

झाडावरची जांभळे, पेरु आणि तुत्या खातेय. तेच सुख. आंबोलीत जांभळाची झाडे काळी दिसताहेत इतकी जांभळे लागलीत. >>>> आमच्या घरात पेरु आणि जांभळे खूप आवडती. आणि जांभळे क्वचितच मिळतात, तीही खूप महाग. ११ $ एक छोटा खोका, जांभळ ही छोटी

साधना , लकी आहात !>>> +१

पेरु अमेरीकेत महाग असतात. $३-४ पौंड वगैरे. पण मी खूप घेत कारण लहानपणी खाल्लेली ही फळे , चव डेव्हलप झालेली असते.
ड्रॅगनफ्रुट बेचव वाटलेले. दिसते क्युट.

थोडी दिसली ती १०० रू. पावशेर ! >>> परवा डोंबिवलीत मी पन्नास रु अर्धा घेतली. खायला दिलं ते गोड होतं नंतर काही आंबटही निघाली त्यात, काही गोडही होती.

चित्रातील फूलझाड ब्रह्म कमळासारखे दिसतेयं तेही असेच रात्री उमलते आणि सकाळी मिटते फळ वैगेरे काही येत नाही.

परवा डोंबिवलीत मी पन्नास रु अर्धा घेतली. खायला दिलं ते गोड होतं नंतर काही आंबटही निघाली त्यात, >>

जांभूळ आंबट शक्यतो नाही निघत गोड वा तुरट.

शेतात झाडे आडेत आंबा, पेरू, पपई, आवळे पण ते म्हणजे लंकेत सोन्याच्या वीटा. मध्यंतरी गांवी रस्त्याने जाताना एक बाई होती लहान लेकरू घेऊन रस्त्याच्या कडेला जांभळे घेऊन म्हटले कसे दिले? तर एक पातेले दाखविले एवढे भरून २० रु. जवळपास अर्धा किलो असावेत मी दोन पातेली घेतली वर तिच्या लहान लेकराला १० रु दिले. पण सारी जांभळं अत्यंत गोड आणि भरपूर गर असलेले होते.

माझी पण फळांची धाव लोकल परेन्तच. पेरू चिक्कु केळी आंबे द्राक्षे. हिरवी व काळी एक गोल आकाराची येतात ती पण भारी असतात. कलिंगड पपई. सफ र चंद संत्री मोसंबी.

भारतीय पेरू पेक्षा दुसरे कमी गोड व गुलाबी गरांचे मोठे पेरु
येतात हेच पेरु थायलंड मध्ये जाउन खाल्ले तर चांगल्या चवीचे असतात. म्हणजे अप्रतिमच. थायलंड मध्ये ते दुरिअन, तसेच ड्रॅगन फ्रुट पण मिळते पण दुरियन फणस जातीची मला आजिबात आव्डत नाहीत. ड्रेगन फ्रुट शोभिवंत दिसते म्हणून वापरतात.

बिग बास्केट वर किवी पेर प्लम मिळतात पण एकतर महाग. व खपत नाहीत.

जांभूळ आंबट शक्यतो नाही निघत गोड वा तुरट. >>> मला लागली काही. तुरट चालतात मला मग काही वाटलं नसतं.

शेतात झाडे आडेत आंबा, पेरू, पपई, आवळे पण ते म्हणजे लंकेत सोन्याच्या वीटा. मध्यंतरी गांवी रस्त्याने जाताना एक बाई होती लहान लेकरू घेऊन रस्त्याच्या कडेला जांभळे घेऊन म्हटले कसे दिले? तर एक पातेले दाखविले एवढे भरून २० रु. जवळपास अर्धा किलो असावेत मी दोन पातेली घेतली वर तिच्या लहान लेकराला १० रु दिले. पण सारी जांभळं अत्यंत गोड आणि भरपूर गर असलेले होते. >>> छान केलंत, तिच्याकडून विकत घेतलीत परत लेकराला दिलेत.

Pages