बागोंमे बहार है ! - गंमत फळझाडांच्या फुलांच्या बहाराची

Submitted by छन्दिफन्दि on 8 March, 2023 - 21:59

खरं तर माझा हा पहिलाच अनुभव आहे. म्हणून एवढं अप्रूप! वसंत ऋतू , स्प्रिंगला अजून अवकाश आहे. हळू हळू दिवस मोठा होतोय. सकाळी सगळं आवरल्यावर थोडा वेळ मिळाला तर मागे अंगणात गेले सहजच. मोसंब्याच्या आणि त्याच्या बाजूच्या पपनसाच्या झाड कडे लक्ष गेल तर अनंताच्या फुलांपेक्षा थोडी लहान अशी पांढऱ्या रंगाची छान फुलं आलेली त्यांच्यावर. उत्सुकतेने जवळ गेले तर त्या फुलांना इतका सुंदर वास. अगदी सुवासिक फुलांचंच झाड जणू.

spring3.jpgspring10.jpg

त्यांच्यात रमत्ये तोच "गुं गुं .." आवाजाने लक्ष गेलं तर एक (मधू) माशी छान मध गोळा करत होती (अकराच्या दरम्यान तीचा ब्रंच असेल बहुदा ). सायन्स च्या वर्गात आपण सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन त्यातील कीटकांचा सहभाग शिकलेला असूनही अगदि काही नाट्य चालू असावं इतकी उत्सुकता वाटून गेली.
दोन मिनिटं थबकले तर पक्षांचा किलबिलाट प्रकर्षाने कानावर पडला. वाऱ्याबरोबर windchime ची किण किण चालूच होती .
मला गंमत वाटली ती ह्याची कि मी काही आमच्या गावच्या अंगणात उभी नव्हते , तर अगदी हार्ट ऑफ सिलिकॉन valley मध्ये (अँपल कॅम्पस पासून अगदी एखाद दोन miles म्हणा ना !) होते. आणि माझ्याकडे हे सगळं अनुभवायला लागणारं स्वास्थ्य आणि अवकाश दोन्ही होत. क्षणभर का होईना इतकं छान प्रसन्न वाटलं.
IMG_20220217_160858376.jpgIMG_20220219_122729807.jpg

fall मध्ये सगळी पानं गाळून गेलेल्या रखरखीत प्लम च्या झाडाला अचानक एके सकाळी बारीक बारीक हिरवी पालवी फुटलेली दिसली. चला आता झाड परत हिरव्यागार पानांनी बहरणार म्हणून मन खुश झालं. दोन दिवसांनी बघितलं तर लक्षात आलं ती पानं नसून त्या उमलण्याधीच्या कळ्या आहेत. दुसऱ्याच दिवशी काही कळ्या छान उमललेल्या, अगदी सुरेख नाजुक पांढरी फुलं आणि मध्यभागी असलेला पराग म्हणजे कुंचल्याने काढल्यासारखी पिवळी, पोपटी, पांढरी नक्षीच .
थोड्या शोधाअंती कळलं कि ह्या काळात फळझाडांना फुलांचा बहर येतो (जसा आपल्याकडचा आंब्याचा मोहोर). चेरी ब्लॉसम तर जगप्रसिद्ध आहेच. तसच कॅलिफोर्निया मध्ये almond ब्लॉसम प्रसिद्ध आहे .अल्मन्ड च्या फुलांना सुवासही असतो (हि google माहिती ). ह्यावर्षी त्यांचा अनुभव घेण्याचा जरूर प्रयत्न करू.
इकडे मला आवडणारी एक गोष्ट म्हणजे जवळ जवळ प्रत्येकाच्या दारात एखाद तरी फळ झाड असतंच. सफरचंद , संत्री, लिंब , डाळिंब , परसिमोन (एक जपानी फळ आहे), प्लम, जर्दाळू, अंजीर ही आणि अशी अनेक प्रकारची झाडं असतात. साधारण एप्रिल मे पासून फळं यायला सुरुवात होते.

IMG_20210504_124134377.jpgIMG_20210620_115225859.jpgIMG_20210620_115538182.jpg

फळं पिकल्याची पहिली खबर लागते ती खारींना, पक्षांना. त्यांना नैवेद्य झाला कि मग आपण फळं उतरवायला मोकळे. ही घरची फळं खरंच खूप रसाळ आणि गोड असतात. इतकी जास्त होतात शेजारच्या, पाजारी, ऑफिसमधे सगळीकडे कौतुकाने दिली जातात . घेणारेही तेवढ्याच कौतुकाने घेतात किंवा खूप जास्त असतील तर पुढे वाटतात .
गेल्या दोन वर्षात Covid च्या , लोकडउनच्या कठीण परिस्थितीत नेक्स्टडोर सारख्या community अँप्स मधून अजून एक छान बाजू कळली , कितीतरी लोकं त्यांच्या घराच्या झाडाची फळे फुड बँकेत देत होते, इतरांना आवाहन करत होते. निसर्गाचं देणं गरजूं पर्यंत पोहोचवण्याचं पुण्यकर्म करत होते.
तर अशी ही फळझाडांच्या फुलांच्या बहाराची गंमत !

सुचना - हा लेख गेल्या वर्षीचा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर फोटो आणि लेख. माझी लहानपणापासूनची इच्छा आहे सफरचंदाचं झाड बघायची आणि स्वत:च्या हाताने सफरचंद काढून खायची. त्यातलंच एखादं झाड अंगणातल्या बागेत वाढवायची. पण कोकणात ते शक्य होईलसं वाटत नाही.

मी चिन्मयी, सामो, ssj <<< Thank you
वेगवेगळ्या विषयांवर छान लिहीताय तुम्ही. आणखी वाचायला आवडेल.<< धन्यवाद.

मी चिन्मयी<<< खुपच क्यूट इच्छा.
पण म्हणजे कोकणात हापूस आंबा, फणस, काजू हि झाडं तुमच्याकडे नक्कीच असणार.
इथे लोकं हापूस आंब्याच्या आठवणीत तरस्तात. क्वचित दोन -एक वर्षांपासून मिळायला लागलाय.. पण खूप महाग. वास आणि चव पण थेट तिकडच्यासारखी नाही मिळत. पण दुधाची तहान ताकावर भागवली जाते.

माझ्या मैत्रिणीकडे सफरचंदाचं झाड आहे आणि त्याला वेड्यासारखी फळं येतात. गोड आणि करकरीत सफरचंद. सगळे गल्लीतले लोकं येऊन येऊन घुवून जातात. (तिने सांगितल्याप्रमाणे )

प्लम ची अजून एक गंमत आठवली म्हणजे, गेल्या वर्षी नवऱ्याचा एक सहकारी पलम्स घेऊन गेला आणि तो आवर्जून सांगत होता. त्याच अगदी छोटं तान्ह बाळ होतं, त्याला पहिल्यांदाच त्याने नेलेल्यातलं प्लम चाखवलं. इतकं गोड आणि रसाळ त्या बाळालाही खूप आवडलं, त्याने चुटू चुटू गर चोखला.