२०१८ च्या जुलै महिन्यात  ग्लेशियर आणि यलोस्टोन नॅशनल पार्कांना भेट दिली होती. त्यादरम्यान  आमच्या विमानप्रवासात एक भयंकर प्रसंग गुदरला होता. त्या तश्या परिस्थितीतही मी प्रसंगावधान राखून फोटो काढले होते.   या भयनाट्याला खरंतर मनाच्या तळाशी दाबून टाकायला हवं पण मायबोलीकर आपलेच आहेत म्हणून तो प्रसंग इथे शेअर करत आहे. 
 
  
      
  
  
      
  
  
    चिल्का सरोवर  भुवनेश्वरपासून साधारण ६० किमी. केवळ दीड तासात पोहोचतो आपण. मात्र सहसा सर्व पर्यटक चिल्का सरोवराच्या दक्षिण तटाला भेट देतात. तिथून बोटी निघतात, डॉल्फिन्स दाखवतात, बेटावर नेतात,  मोतीवाले शिंपले दाखवून ते फोडून त्यातून मोती  काढून दाखवतात आणि विकत घेण्याची गळ घालतात. हे आम्ही केलं आणि मग  पुन्हा मागे येऊन सरोवराला वळसा घालून  चिल्काच्या उत्तर किनार्यावर असलेल्या भानौपो चिलिका येथे मुक्कामाला आलो.   आपल्याला अश्या  नाविकतळावर जाण्याची वेळ आणि संधी मिळेलच असं नाही पण आम्हाला नशिबाने या  सुंदर  स्वच्छ  तळावर राहता आलं. 
 
  
      
  
  
      
  
  
    सूर्य अस्ताचलाकडे कलायला लागतो, सावल्या लांब होऊ लागतात. पाखरं घरट्यांकडे, खिलारं गोठ्यांकडे परतायला लागतात.
ज्यांना घर असतं, ती माणसं झपाझप घरांकडे निघतात.
ज्यांना घर नसतं, ती जड पावलांनी घराच्या कल्पनेकडे, किंवा घराच्या आठवणींकडे…
 
  
      
  
  
      
  
  
    "सर,  त्रिमुर्ती  क्लाएंटच्या   नारायण मूर्तीकडून पुन्हा रिक्वेस्ट आली आहे.  अजूनही  गेम रटाळ वाटतोय.  इतर दोन डायरेक्टर्सचंही तेच म्हणणं आहे.  तो भैरव नंदी  वैतागून  प्रोजेक्टच रद्द करत होता.  ब्रह्मेंनी त्याला थोपवलं म्हणे." 
"अरेच्चा! अजूनही समाधान नाही मूर्तीचं?  त्याच्यासारखं आम्हीही   अहोरात्र काम करायचं  काय!  बरं आता ते खास सहा  डार्क  भावना-प्रोग्रॅम्स आहेत ते फिट करा गेममधल्या सर्व पात्रांत. अर्थात प्रत्येकात वेगवेगळं  प्रमाण हवं.  घ्या किती रंजक हवंय ते!  आता बोंबलले  तरीही   हे प्रोग्रॅम्स काढता येणार नाहीत  सांगा." 
"आणि गेम हाताबाहेर गेला तर?????? " 
 
  
      
  
  
      
  
  
    'आलास संभ्या, ये ये! अलाबला घिऊ दे तुजी!' म्हातारीनं त्याला जवळ बोलावलं. त्याच्या आठवणीत कायम तिला माजघरातच पाहिली असली, तरी ती त्याची पणजी नाही हे त्याला माहीत होतं. कधी आईला विचारलं तर ती 'तुला कशापायी चौकशा? त्या हाइत म्हून आपन हाओत!' एवढंच म्हणायची. पण त्याची शहरातली नोकरी सुटून तो परत आला, तेव्हा गणा मांत्रिक म्हणाला 'ती लासवट हाय, तंवर आसंच! तुज्या खानदानाला खाऊन बसली, तुला बी गिळंल! शाना आसशील तर येत्या अमुशेला...'.
 
  
      
  
  
      
  
  
    "मी, डॉ. जमदग्नी म्हणजे कोण आहे हे  दुनियेला माहित आहे कामिनी.   माझ्या  कर्तृत्वावरच तर तू भाळलीस ना?"
 "हो आणि तुम्ही माझ्या सौंदर्यावर! "
"अलबत! आणि अजूनही तुझ्या सौंदर्याचा लोभ  सुटलेला नाही हे ही तुला माहित आहे. "
"इश्श्य!  ते मी जाणते  की पण  तुमच्या आजूबाजूला इतक्या  ललना वावरत असतात की कधी कधी  माझा मत्सराग्नी  जागृत होतो. "
"साहजिकच आहे गं. जिथे प्रेम तिथे मत्सर असणारच. "
"आणि जिथे कर्तृत्व तिथे क्रोधही आहे म्हटलं. "
"हा! हा! हा! मान्य!!!"