काही म्हणू नका !

Submitted by डॉ अशोक on 18 May, 2014 - 02:54

काही म्हणू नका !

"हो" ही म्हणू नका, "नाही" म्हणू नका
मौनात राहणे, काही म्हणू नका !

हे तर खरेच की, कोणी न आपले
"ये" ही म्हणू नका, "जा" ही म्ह्णू नका !

सवालास हर एक, ना जवाब असतो
नाही लिहू नका, "कां" ही म्हणू नका !

मुक्काम गाठण्या, मार्ग अपुला ह्वा
भेटेल त्या कुणा, राही म्हणू नका

गरजूस शोधणे, ना सहज राहिले
"उठ" ही म्हणू नका, "खा" ही म्हणू नका !

-अशोक
डॉ अशोक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमाल आहे डॉक्टर काका तुमची ! जेव्हा तुमच्या रचना अज्जिबातच वृत्तात नसत तेव्हा तुम्हाला सान्गीतले कि तुम्ही रुसायचात आणि आता जरा गणवृत्तात बर्‍यापैकी आल्यावर तृटी दाखवल्या तर मात्रावृत्त आहे म्हणताय

मात्रावृत्त नाहीयेय हे 'गागालगालगा गागालगालगा' ह्या लयीत आहे की चांग्लं !

वैभव...
*
ही संशयित गझल आपण सांगितली त्या 'गागालगालगा गागालगालगा' ह्या वृत्तात नाही हे पक्कं. उदाहरणार्थ:
*
हे तर खरेच की, कोणी न आपले
"ये" ही म्हणू नका, "जा" ही म्ह्णू नका!
*
यातली पहिली ओळ. "हे तर खरेच की, कोणी न आपले" यात "'गागालगालगा गागालगालगा' " कुठे आणी कसे आले ते समजवले तर बरे होईल! त्याची लगावली माझ्या अल्प मति प्रमाणे "गालल लगालगा, गागाल गालगा " =१०,१० अशी येते! उगाच आपलं उल्लू बनाविंग तर नाही ना?

काका मला माफ करा
आपल्याला समजावू शकण्यास मी कंप्लीटली असमर्थ आहे याची मला आपला वरचा प्रतिसाद वाचून उपरती झाली आहे

मुळात वृत्त म्हणजे काय असते ते कसे मोजायचे कसे योजायचे ह्याबाबत तुम्हाला खूप कसून म्हणजे खूपच कसून अभ्यास करावा लागणार आहे हे मत्र नक्की !

गझलेच्या अभ्यासासाठी आणि गझल-लेखनासाठी अगणित शुभेच्छा काका

~वैवकु Happy

वैभव..
तुम्ही फार लवकर हार मानलीत. तुम्ही गझला (बऱ्या-वाईट) करत असाल. पण चांगले गुरू नक्कीच नाही. आपण सांगितलेली लगावली 'गागालगालगा गागालगालगा' कोणत्या वृत्ताची आहे मला माहित नाही. पण प्रत्येक मिसरा लगावली नुसार असणे म्हणजे अक्षर-गण वृत्त, आणि दोन्ही मिसऱ्यात फक्त मात्रांची संख्या समान असणे म्हणजे मात्रावृत्त. अक्षर-गण वृत्तात लघु-गुरू अक्षरांचा क्रम गझलेच्या दोन्ही मिसऱ्यात आणि प्रत्येक शेरात समान असणे आवश्यक. उदाहरणार्थ लोकप्रिय भुजंगप्रयात. यात लगावली "लगागा लगागा लगागा" म्हणजे लघुगुरूगुरू लघुगुरूगुरू लघुगुरूगुरू अशी आणि एकुण मात्रा १५. मात्र पहिल्या मिसऱ्यात "लगागा लगागा लगागा" असे (एकुण मात्रा १५) आणि दुसऱ्यात गागाल लगागा लगागा (एकुण मात्रा १५) असे करूनही मात्रांची संख्या १५ असेल. मात्र लघु-गुरू क्रमवारी न पाळ्ल्याने अशी रचना भुजंग प्रयात मधे मोडणार नाही. माझ्या रचनेत फक्त एकुण मात्रांची संख्या २० हा नियम पाळला गेलाय. मात्र लघु-गुरू ची क्रमवारी दोन्ही मिसऱ्यात तुम्ही म्हणता तशी 'गागालगालगा गागालगालगा' अशी नाही, तर वेगळी आहे आणि असं असूनही एकुण मात्रा मात्र दोन्ही मिसऱ्यात समान (=२०) १० व्या मात्रे नंतर प्रत्येक मिसऱ्यात यति असावा असा प्रयत्न केला. मात्र समीर चव्हाण यांनी दाखवून दिलं त्यानुसार एका ठिकाणी चूक झाली आहे. हे आणि इतकंच माझं म्हणणं आहे. हे चूक आहे कां?
लोभ आहेच. तो कमी न व्हावा !

पण चांगले गुरू नक्कीच नाही<<<<<< तुम्हाला कोणी म्हटले की मी गुरू वगैरे आहे ? मी अजून गझलेचा चांगला शिष्यही होवू शकलेलो नाही आहे गुरू काय होणार .कप्पाळ ?

पण तुम्ही माझ्या ज्ञानावर शंका घेत आहात म्हणून आणि मी कोणत्या तळमळीतून तुम्हाला सांगतोय हेही तुम्ही लक्षात घेत नाही आहात म्हणून मी तुम्हाला जरा डीटेलमध्ये सांगतो प्लीज मन लावून वाचावे आणि मी तुम्हाला काहीही खोटे सांगत नाहीये ऑर तुमच्याशी उल्लू बनाविंगही खेळत नाहीये यावर आधी विश्वास ठेवावा

असो आपण मुद्द्याकडे वळू

१) अक्षरगणवृत्ते आणि मात्रावृत्ते ह्या दोन प्रकारात गझल केली जाते /जावी हे बरोबर आहे पण आपण निरीक्षण करा की आजमितीला अक्षरगणवृत्ते सर्वच मराठी गझलकार तंतोतंत पाळत नाहीत / सगळ्याच गझलांमध्ये..शेरांमध्ये ती तशी पाळली जात नाहीत (कारणमिमांसा करणे हा आपला मुद्दा इथे नसल्याच मुळे करत नाही ) / किंवा अगदी दुर्मीळ्पणे पाळली जातात . ..
......म्हणजे असे होते की त्या लयीचे गण पाळले जातात पण अक्षरसंख्या नव्हे ....मग लगेच ती वृत्ते मात्रावृत्ते ठरतात का तर नाही ! केवळ गण पाळले गेले असल्याने त्याना गणवृत्ते म्हणावे असे माझे मत आहे (अक्षर हा शब्द वगळावा कारण त्यांची संख्या पाळली गेली नसल्याने )
त्याना मात्रावृत्त म्हणण्यात अडचण आहे ती अशी की मात्रावृत्तात हे गणही पाळले गेले नसतात !
आता एक समजलेच असेल काका तुम्हाला की तुम्ही लिहिलय ते मात्रावृत्त का नाही आहे ते !! आणि अक्षरगणवृत्तही !! पण ते व्रुत्त आहे ..गणवृत्त आहे

आणि हो.. कन्फ्यूजन टाळायला एक अजून मुद्दा लक्षात घ्या अक्षरगण वृत्त / गणवृत्त / मात्रा वृत्त.... प्रकार कोणताही असो बरोबर पाळला की मात्रासंख्या सेमच राहते ओळीची ..प्रकार कोणताही असो.. म्हणजे केवळ मात्रासंख्या मोजून वृत्त /किंवा त्याचा प्रकार ठरणार नाही हेही लक्षात घ्या !! Happy

२)अक्षरगणवृत्तातील अक्षरसंख्या न पाळली जाणे पण गण पाळले जाणे हा एक प्रकारे सुटीचाच एक प्रकार आहे
अक्षरगणातील एका गा चे दोन ल करणे (गा=ल+ल) किंवा वाईस्व्हर्सा दोन ल चे एक गा करणे (ल+ल=गा....मी तरी अशी जुळव पाहिल्याचे स्मरत नाही मोस्टली गा=ल+ल हीच प्रॅक्टीस दिसून येते ) एवढ्याश्याने अक्षरसंख्येत फरक पडत जातो
पण ही सूट इतकी सर्‍हास वापरली जाते की आता हा प्रकार रूढ झालेला आहे.. इतका की लोकाना तो नियमच वाटावा :)....इनफॅक्ट ही बाबच खिजगणतीतही नसल्यागत झाली आहे

३) र्‍ह्स्व अक्षराला १ आणि दीर्घ अक्षराला २ मात्रा असे मानून गणित करून वृत्ते मोजली जातात असे म्हणणे /मानणे हेही मुळात चुकीचे आहे ह्या मात्रा नुसत्या अक्षरासाठी नव्हे तर त्यांच्या नैसर्गीक उच्चाराला असतात

म्हणजे
र्‍हस्व उच्चाराला शॉर्ट टाईम उच्चाराला १ मात्रा
दीर्घ उच्चाराला लॉग टाईम उच्चाराला दोन मात्रा

हा टाईम घड्याळाच्या काट्याला बघून नव्हे तर एका श्वासाच्या आवागमनाला कॉमन माणसाला लागणारा कॉमन नैसर्गिक वेळ ह्यावर निर्भर राहून मोजायचा असतो

असो
आपल्या वरील रचनेत मतल्यात जी लय पाळली गेली आहे ती गागालगालगा गागालगालगा अशीच आहे इतर अनेक ओळीही मग त्या लयीत वाचायचा प्रयत्न करून पहा नीट वाचता येत आहेत फक्त समीरजी म्हणाले त्याजागी गडबड झाली आहे (२ जागी )
आपण सोदाहरण पटवू पाहत असलेल्या ओळीत पाहू .....

"हे ।तर। खरेच। की ।।, कोणी। न। आपले"।
गा ।गा । लगाल। गा ।। गागा। ल। गालगा ।
गागालगालगा ॥ गागालगालगा

गागालगालगागा गागालगालगागा
ह्या आनंदकंदातील वर ठळक केलेले दोन जागीचे गा काढले की आपल्या ह्या रचनेची लय तयार होते (नाव मला माहीत नाही मला वृत्तांची नावे वगैरे फारशी लक्षातही राहत नाहीत असो तो भाग वेगळा :))

इथे तर हा शब्द आपण म्हणता तसा लल असा उच्चारायचा नसून गा असा उच्चारायचा आहे ..म्हणजे इथे तुमच्याकडून ती सूट घेतली गेली आहे पण तर चा नैसर्गीक वजनाचा उच्चार गा असाही होवू शकत असल्याने ही सूट मान्य होणार आहे हेही लक्षात घ्या

असो

हा प्रतिसाद जरा मन लावून वाचा आणि मी साम्गतोय ते खरे आहे ह्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुमचंतुम्हाला लक्षात येइल !

धन्यवाद

mast

बेफिकीर.....................
"भुजंगप्रयाती य ये चार वेळा"
लहान पणी वाचलं होतं. खूप लहानपणी घोकलं होतं, त्याचा विसर पडला होता. धन्यवाद !

वैभव............................
धन्यवाद...
फुल्टॉस पडावा आणि त्यावर विकेट (माझी) पडावी असं काही झालय कां माझं?