शेर सारे(च) मी तुझे वाचू कशाला

Submitted by अमित्रजित on 27 June, 2014 - 01:06

शेर सारे(च) मी तुझे वाचू कशाला
वाचले निवडक आणि आली झीट आहे

तू म्हणतोस खरा त्याची गझल निराळी
तो गझलकार एक नंबर चीट आहे

सतत जो घेतो विठ्ठलाचे नाव त्याचे
शेर वाचूनी जनतेस आला वीट आहे

कोण करेल टी़का त्याला कोपर्‍यात घे
विरोधाला रोज होते मारपीट आहे

व्याख्यान देण्याचे व्यसन लागले तुला जे
डोसक्याला लागलेली हीट आहे

बूच लावावे अता तुझ्या प्रतिभेला कसे
वाचकाचा मोड आता 'डोळे मीट' आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू म्हणतोस खरा त्याची गझल निराळी
तो गझलकार एक नंबर चीट आहे

हाच आवडला. लंबर एक शेर आहे. Rofl

(पण चीट म्हणजे काय ते नाय कळले. चीट म्हणजे चीटींग या अर्थी का?)

एवढ्यात दमलात ?

त्यांच्या चोरलेल्या जमिनी
त्यांचे चोरलेले शेर उर्फ प्रतिशेर
त्यांच्या स्माईलीज
त्यांचे वाद उर्फ शिव्या
त्यांच्या कडबोळ्या, कुरड्या, भुस्कुटे, किस, धपाटे, आंबवण, थालिपीठं, मेतकुटं, रोंबाट, खदाकनं..... असे बरेच बीबी यायचे आहेत !

Lol मस्त्च
कडबोळ्या, कुरड्या, भुस्कुटे, किस, धपाटे, आंबवण, थालिपीठं, मेतकुटं, रोंबाट, खदाकनं..... असे बरेच बीबी यायचे आहेत !>>>>>>>>.. हे पण भारी. Happy

टचकन डोलेपान्हावलेस्की
आलास ये उभाकाबस्की
वसकन ओरडलास्की
धपकन पडलास्की

द्या त्यांना, अलामत, बिलामत, काफिया, बाफिया.... आयते घ्या म्हणावं !

कडबोळ्या, कुरड्या, भुस्कुटे, किस, धपाटे, आंबवण, थालिपीठं, मेतकुटं, रोंबाट, खदाकनं...<<< Rofl

टचकन डोलेपान्हावलेस्की
आलास ये उभाकाबस्की
वसकन ओरडलास्की
धपकन पडलास्की<<<< Lol

असो
एकनंबर चीट आणि डोळे मीट ह्या द्विपदी आवडल्या

हझल फझल काय करायचेते करा पण आकृतीबंधाची मजा घालवू नका तो नीट पाळाल तर आपल्या रचना अधिक खुलून येतील
धन्यवाद