उपासाच्या शेवयांची खीर

Submitted by किल्ली on 14 November, 2021 - 23:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजच्या उपावसाच्या फराळासाठी ही चटकन होणारी पाककृती करून पाहा.
...
उपासाच्या शेवया - दोन वेटोळे ,
दूध - साधारण ४ कप ,
साखर - चवीनुसार, ५-६ टे स्पून,
साजूक तूप - ३-४ टे स्पून,
वेलची पुड - चिमूटभर

शिंगाड्याच्या पिठाच्या शेवया विकत मिळतात, त्या आणाव्यात.

क्रमवार पाककृती: 

१. शेवयांचे वेटोळे उकलून हातानेच चुरा करा. खूप कडक असतात. थेट भाजताना तोडायला गेल्यास इकडे तिकडे उडून पडतात. त्यामुळे आधीच शेवया एका टोपात उडणार नाहीत अशा बेताने काळजीपूर्वक तोडून घ्याव्यात.
2. ह्या तोडलेल्या शेवया खमंग मंद आचेवर जाड बुडाच्या भांड्यात तुपावर भाजून घ्या.
३. एकीकडे दूध तापण्यासाठी ठेवून द्या, कमी आचेवर.

४. भाजताना शेवया फुलतील. लगेच लाल होऊन काळ्या पडू शकतात. त्यामुळे सतत हलवत राहून भाजायचे आहे. साधारण लालसर झाल्या की आच बंद करा.
..
भाजलेल्या शेवया :
IMG-20211023-WA0006_1.jpg
..
५. भाजलेल्या शेवयांवर हळूहळू गरम दूध ओता.
६. आता त्यावर साखर घाला.
७. खिरीचे मिश्रण नीट ढवळून घ्या. झाकण ठेवा.
८. जरा वाफ आली की त्यावर वेलचीपूड व तुमच्या आवडीचा सुकामेवा घालू शकता.
..
खीर :
0_91907770_148016850030458_1875549697661192426_n_17849687293986786.jpg
..
ही खीर गरम किंवा थंड कशीही छानच लागते. एवढंच की थंड झाल्यावर लगेच आळते आणि घट्ट होते.
..
पूर्वप्रकाशित
स्पंदन दिवाळी २०२१ इ अंक

वाढणी/प्रमाण: 
माझ्यासारखा खाणारा असेल तर एकटाच खाऊन संपवेल
अधिक टिपा: 

टीप : संपूर्ण पाककृती मंद आचेवर करायची आहे.

माहितीचा स्रोत: 
स्वतः केलेला प्रयोग आणि ऐकीव माहिती
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसतायेत शेवया!

पण ह्या शिंगाड्याच्या पिठाच्या मिळतात का शेवया?

धन्यवाद भरत आणि कृष्णा Happy
हो, मिळतात.
वेटोळे स्वरूपात असतात.
पुण्यात मंडईत मिळतील
नांदेड ला एक ओळखीच्या काकू आणून देतात

मस्त दिसतेय खीर! शेंगाड्याच्या पीठाची खीर खाल्ली आहे. शेवया मिळतात हे माहीत नव्हते.

खीर मस्त दिसतेय , उपासाच्या शेवया असतात आणि त्या बाजारात विकत मिळतात हे अजिबात माहीत नव्हते. पाहिली रेसिपी तेव्हा वाटलं साबा नी घरी बिरी केल्या किल्लीच्या

धन्यवाद मनिमोहोर Happy
साबा करूच शकतात Proud
पण हल्ली होत नाहीत त्यांना फार काही व्याप

<< किती अवघड रेसीपी. कसं जमतं बाई. >>
अगदी अगदी, हाच विचार आला होता मनात. आता मसाला चहाची पाककृती टाका किल्लीतै Light 1

छान दिसतेय खीर किल्ले. शिंगाड्याच्या पिठाच्या शेवया मिळतात ही न्यूज आहे. मग उपमा ही होईल ना?