Submitted by पद्म on 11 September, 2019 - 07:56
उशिर झाला होता. जेवणंसुद्धा उरकत आली होती. आता आलोच होतो; म्हणून जेवायला बसलो!
वाढणार्याने सगळं वाढलं, पण बाजुच्या ताटात दिसणारी खीर मला वाढली नव्हती. बाजुच्याने मात्र चाटुन पुसून खीर संपवली होती.
तेवढ्यात त्याने आवाज दिला, "भाऊ, खीर!" ईथे मला एक वाटी मिळाली नव्हती, याला दुसरी वाटी पाहिजे होती.
"खीर संपलीये!"
तो थोडा नाराज झाला. त्याने दुसर्या कुणालातरी आवाज दिला, "दादा, खीर मिळेल का?" कित्ती हावरटपणा!
त्याने अजून तीन चार जणांना कामाला लावलं... शेवटी थोडीशी खीर सापडली. मला तर राग आला त्या हावरटपणाचा...
भाऊ खीर वाढणारच, तेवढ्यात तो म्हणाला, "मला नकोय! सरांना दे."
आणि माझ्याकडे वळून म्हणाला, "खाऊन बघा, मस्त झालीये!"
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे कथा. आवडली.
छान आहे कथा. आवडली.
छान
छान
वाह मस्तच ! आवडली कथा.
वाह मस्तच ! आवडली कथा.
दुसऱ्याला पटकन जज करण्याची सवय असतेच आपल्याला.
साधी - सोपी गोष्ट आवडली.
साधी - सोपी गोष्ट आवडली.
छान, आवडली
छान, आवडली
मस्त
मस्त
साधी - सोपी गोष्ट आवडली.>>>+१
साधी - सोपी गोष्ट आवडली.>>>+१.
सर,
सर,
माफ करा पण ही कथा नसून नुसते एक प्रसंग वर्णन आहे.
लिहिलेले आणि खासकरून न लिहिलेले अनेक प्रसंग एकत्र विणून एक कथा बनते. जसे सिनेमातले वेगवगळे सीन्स मिळून एक सिनेमा बनतो.
तुम्हाला एका प्रसंगाच्या वर्णनाला स्टोरीटेलिंग म्हणायचे आहे? जरूर म्हणा.
छान, पद्म
छान, पद्म
धन्यवाद सस्मित, अॅमी, मीरा,
धन्यवाद सस्मित, अॅमी, मीरा, चंद्रा, VB, अज्ञानी!
दुसऱ्याला पटकन जज करण्याची सवय असतेच आपल्याला.>> हो ना! मी तर त्या खीर शोधून काढणार्याला धन्यवाद म्हणणार होतो... त्याच्यामुळे मला तो व्यक्ती कळाला! नाहीतर त्या व्यक्तीबद्दलचा कायमचा गैरसमज राहिला असता...
का रे पद्म? मला धन्यवाद नाही?
का रे पद्म? मला धन्यवाद नाही?
आपून को बुरा लगा! चला आपून....... पक्षपाती कुठला!
.
.
.
.
.
.
.
.
.
असा प्रतिसाद मी अजिबात देणार नाहीये.
माफ करा पण ही कथा नसून नुसते
माफ करा पण ही कथा नसून नुसते एक प्रसंग वर्णन आहे.>>> अरे सर, त्यात माफी कसली? मला कथांबद्दल जास्त कळत नाही, फक्त सगळे लिहिताहेत म्हणून मी पण थोडं ट्राय करून पाहिलं...
कथा म्हणून नाही, पण प्रसंग कसा वाटला? ते जरूर सांगा..
मधुरा, धन्यवाद!
मधुरा, धन्यवाद!
मी तो प्रतिसाद लिहिताना तू प्रतिसाद दिला, म्हणून तुझं नाव नाही आलं...
मला कथांबद्दल जास्त कळत नाही,
मला कथांबद्दल जास्त कळत नाही, फक्त सगळे लिहिताहेत म्हणून मी पण थोडं ट्राय करून पाहिलं... >>हरकत नाही, पण तुम्ही संयोजक म्हणून कथांचे परिक्षण करणार आहात ना?
कथेबद्दल थोडंफार जाणून घेण्यासाठी हे वाचा
https://www.janefriedman.com/what-is-a-story/
हरकत नाही, पण तुम्ही संयोजक
हरकत नाही, पण तुम्ही संयोजक म्हणून कथांचे परिक्षण करणार आहात ना?>>> मी फक्त एक मेंबर आहे... संयोजक टीममधला! ज्या संयोजकांना कथांचे ज्ञान आहे, ते करतील परिक्षण!
पण प्रसंग म्हणून कशी वाटली, ते नाही सांगितलंस..
हाब, लिंकसाठी धन्यवाद! वाचतो!
मी फक्त एक मेंबर आहे...
मी फक्त एक मेंबर आहे... संयोजक टीममधला! ज्या संयोजकांना कथांचे ज्ञान आहे, ते करतील परिक्षण! >> ओह! ओके.
सध्या संयोजक मंडळात किती मेंबर्स ऊरले आहेत आणि त्यापैकी किती जण कथांचे परिक्षण करणार आहे ते सांगू शकाल का?
सध्या संयोजक मंडळात किती
सध्या संयोजक मंडळात किती मेंबर्स ऊरले आहेत आणि त्यापैकी किती जण कथांचे परिक्षण करणार आहे ते सांगू शकाल का?>>> विपू बघा!
मधुरा सोडून सर्व आहेत...
मधुरा सोडून सर्व आहेत... त्यापैकी काही जण करतील. >> म्हणजे किती जण १,२,३,४ ?
तुमच्या मते हे काही जण कोण असू शकतील.
कारण आम्हा वाचकांना आत्तापर्यंत असे वाटत होते की संयोजक जे काही ठरवतात ते सर्वसंमतीने समितीमधल्या सगळ्यांना सारखे महत्व देऊन, सगळ्यांची मते विचारात घेऊन ठरवतात. असे नाहीये का?
तुमच्या मते हे काही जण कोण
तुमच्या मते हे काही जण कोण असू शकतील.
कारण आम्हा वाचकांना आत्तापर्यंत असे वाटत होते की संयोजक जे काही ठरवतात ते सर्वसंमतीने समितीमधल्या सगळ्यांना सारखे महत्व देऊन, सगळ्यांची मते विचारात घेऊन ठरवतात. असे नाहीये का?>>>>>> इथे मी संयोजक नाही, फक्त तुमच्या कथांचा फॅन पद्म आहे!
जो अजूनही कृष्णविवराच्या पुढच्या भागांची प्रतिक्षा करतोय...!
छान आहे. प्रसंग असो की कथा
छान आहे. प्रसंग असो की कथा त्याचा आशय छान आहे.
धन्यवाद सिमंतिनी...
धन्यवाद सिमंतिनी...
बादवे, सिमंतिनी पार्वतीचंच नाव आहे ना?
महाभारत लेखिकेचे छान स्कोर
महाभारत लेखिकेचे छान स्कोर सेटलिंग चालू आहे. तिकडं अॅडमिनला सांगायचे की मला काही लोकांना ब्लॉक करण्याची सोय उपलब्ध करून द्या. आणि इकडे चिमटे काढायचे. Maturity is absent. दुसरं काय?
आवडली
आवडली
सत्याची शहाणीशा न करता आपण
सत्याची शहाणीशा न करता आपण समोरच्या व्यक्तिला गृहीत धरतो. छान झालाय प्रसंग.
प्रसंग छान वर्णन केला आहे
प्रसंग छान वर्णन केला आहे पद्म सर.
तुम्ही दिलेल्या संयोजन मंडळाबद्दलच्या माहितीबद्दल धन्यवाद.
मी तो प्रतिसाद लिहिताना तू
मी तो प्रतिसाद लिहिताना तू प्रतिसाद दिला, म्हणून तुझं नाव नाही आलं... >>>>> मजा करत होते.
संयोजक समितीच्या सदस्यांच्या
संयोजक समितीच्या सदस्यांच्या नावबाबत इतकं हश हश का आहे? वर प्रतिसदांमध्ये नाव देणं टाळलं आहे आणि मी संयोजकांच्या एका धाग्यावर केवळ उत्सुकतेपोटी हाच प्रश्न विचारला तेव्हा पण नावं न सांगता 'उत्सव सम्पल्यावर सांगू' असा प्रतिसाद मिळाला.
काही विशिष्ट कारणासाठी नावं गुप्त ठेवतात का? नक्कीच.
संयोजक समितीच्या सदस्यांच्या
संयोजक समितीच्या सदस्यांच्या नावबाबत इतकं हश हश का आहे >> ही आहेत ऑफिशिअल नावं.
Aaradhya, 'सिद्धि', मधुरा कुलकर्णी, स्वरुप, mayu4u, अज्ञानी, अभि_नव, पद्म
ह्यात कोण आत, कोण बाहेर, कोण काठावर, कोण परिक्षक, कोण नॉन-परिक्षक हे काही सांगता येणार नाही.
छान कथा. आवडली.
छान कथा.
आवडली.
> ही आहेत ऑफिशिअल नावं. >>>>>
> ही आहेत ऑफिशिअल नावं. >>>>> धन्यवाद आणि धन्य आहे
संयोजक जर कथा स्पर्धा जज करणार आहेत तर ते कथांवर प्रतिसाद कसे बरं देऊ शकतात? स्पर्धेतही भाग घेताहेत, इतर चर्चा प्रतिसादांमध्ये दिसताहेत, म्हणून मी धन्य आहे म्हणाले.
स्पर्धा रोचक आणि हटके आहेत, पण संयोजनामध्ये छोट्या उणिवा दिसताहेत आणि त्यामुळे किंचित असंतोष.
Pages