तुझ्यासवे जगताना (गाणे)
तुझ्यासवे जगताना (गाणे)
तुझ्यासवे जगताना भाव मनीचे खुलताना
मी भान हरवतो ॥१॥
तुझ्यासवे हसताना दु:ख मनीचे भुलताना
मी भान हरवते ॥२॥
तुझ्यासवे रडताना स्वप्नं आशेची पहाताना
मी भान हरवतो ॥३॥
तुझ्यासवे खेळताना गाणे गात झुलताना
मी भान हरवते ॥४॥
तुझ्यासवे फुलताना माझा मलाच विसरताना
मी भान हरवतो ॥५॥
तुझ्यासवे फुलताना माझी मलाच विसरताना
मी भान हरवते ॥६॥
तुझ्यासवे जगताना (दोघे)
मी भान हरवतो
मी भान हरवते
― ₹!हुल / १२ जून १७