बालकविता

बडबडगीत

Submitted by Rudraa on 1 October, 2021 - 21:26

उठ उठ,उठ उठ आईची बडबड,
गार गार गारठ्याला भलतीच चड ।।
भिर भिर, भिर भिर पक्षांची भरारी ,
चिवचिव चिमण्याची तांदळाची न्याहरी ।।१।।

सुई सुई, सुई सुई करतो वारा ,
सळसळ पानांचा आवाज निराळा ।।
खड खड,खड खड रस्ता लई भारी ,
रोज रोज बैलगाडीची मौजच न्यारी ।।२।।

सर सर, सर सर पळतात ढग ,
मऊ मऊ गालिच्छे निळे निळे नभ ।।
रिपरिप, रिपरिप पावसांच्या सरी ,
खळखळ पाण्यात माशांची स्वारी ।।३।।

गड गड, गड गड ढगांचा ढोल ,
कडकड कडाड गेला विजेचा तोल ।।
काळी काळी काळी अंधारातली माडी ,
धड धड काळजात धसकन् करी ।।४।।

शब्दखुणा: 

बिच्चारी मनी... !

Submitted by prernap1412 on 11 June, 2020 - 09:22

बिच्चारी मनी... !

कितीतरी दिवसांनी
मनीला मिळाला मासा,
विचार करू लागली,
खायचा कुठे नी कसा?

चाले डुलत डुलत…
विचार करी मनाशी,
कावळा भेटला वाटेतं,
म्हणाला, “तब्येत कशी? “

उघडे तोंड देण्या उत्तर,
मनी मोठया खुशीने,
मासा पडे जमिनीवर,
कावळा घेई खुशीने… ll

काम होता कावळ्याचे,
कावळा उडे आकाशात…
मनीला काही न सुचे,
‘आ’ वासून राही पहात… ll

- प्रेरणा पाटकर

आटपाट नगर

Submitted by कविता क्षीरसागर on 9 August, 2019 - 08:02

आटपाट नगर

आटपाट नगरात बासुंदीचे तळे
तळ्याच्या शेजारी बर्फीचे मळे

नगरात राहणारे आहेत वेडे
त्यांनी बांधलेत बिस्किटांचे वाडे

तेल म्हणून लावतात ते दही
पाण्यावर करतात पेन्सिलीने सही

फिरायला नेतात मिठाईची गाडी
वरती छोटी खरवसाची माडी

तेथील लोक आहेत झोपाळू  
झोपेतच खातात २,४ जर्दाळू

असे आहे हे आटपाट नगर
दिसेलच तुम्हा तिथे गेलात तर

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

आमचे आजोबा

Submitted by विदेश on 3 March, 2016 - 13:11

दोन पाय अन आधार काठी
तीन पायांचे आमचे आजोबा..

पाठ ताठ खांदेही ताठ
ना दुखतो एकही खुबा..

दृष्टी शाबूत दातही मजबूत
हास्याचा तर नित्य धबधबा..

धाक दरारा अजून वाटतो
गल्लीत साऱ्या त्यांचा दबदबा..

गिरणीत जाती घेऊन हाती
दहा किलोचा दळण डबा..

चौरस आहार सतत विहार
आरोग्याचा मंत्र अजूबा..

नव्वदीतला तरुण जणू हा
पार शंभरी करणे मनसुबा ..

................ विजयकुमार देशपांडे
.
.

शब्दखुणा: 

छोटी छोटी ही छानशी परी - [बालकविता]

Submitted by विदेश on 17 February, 2016 - 01:11

छोटी छोटी इवली इवली
पाहिली का हो आमची बाहुली

नाक नकटे झ्याक दिसते
येता जाता फ्रॉकला पुसते

चालताना तोरा पहा हिचा
रुबाब जणू राजकन्येचा

खु्दकन हसते क्षणात रुसते
पट्कन कोपऱ्यात फुगून बसते

डोळे फिरती चिमूकलीचे
डबे शोधती भातुकलीचे

खावे फुटाणे का शेंगदाणे
स्वत:शी खेळत भरते बोकणे

बोबडे बोल घुमती घरी जरी
कौतुक होते शेजारीपाजारी

आत्ता होती कुठे गेली छकुली
"भ्वा.."करायला दारामागे लपली

छोटी छोटी ही छानशी परी
पहायला या ना आमच्या घरी ..
.
......... विजयकुमार देशपांडे
.

शब्दखुणा: 

चित्रकार पिंटू

Submitted by विदेश on 25 May, 2015 - 03:10

आमचा पिंटू चित्रकार छान
चित्र काढताना पाठीची कमान ..

जिराफाला असते गेंड्याची मान
उंटाला दिसती हत्तीचे कान ..

भूभूचे शेपूट सरळ असते
हम्माचे शेपूट वाकडे दिसते ..

मोरपिसारा कोंबड्याला असतो
कोंबड्याच्या तुऱ्याचा पत्ता नसतो ..

झुरळ असते काढलेले हातभर
मिशा त्याच्या फक्त चिमूटभर ..

इवल्याशा सशाला पाय कावळ्याचे
सिंहाला नेमके पाय बगळ्याचे ..

मुंगीचा डोळा वाघाला दिसतो
घुबडाचा डोळा चिमणीला असतो ..

चित्र रंगवताना डोलावतो मान
म्हणतो स्वत:च "वा वा छान"..

चित्रात भरताना विविध रंग
स्वत:चे भरतो रंगाने अंग

आमचा पिंटू चित्रकार छान
मोठ्ठा झाल्यावर होणार महान .. !

शब्दखुणा: 

सुट्टी म्हणजे -

Submitted by विदेश on 17 May, 2015 - 04:11

सुट्टी म्हणजे नुसती धमाल
पर्यटनाची भलती कमाल ..

गडावर जाऊ शिकू इतिहास
भुगोलातले प्रदेश खास ..

बसू घरात ऊन असल्यावर
पत्ते क्यारम गार फरशीवर ..

टीव्हीवर एनजी डिस्कव्हरी
डोरेमोन भीम बीनची मस्करी ..

अधूनमधून भेंड्या नि गाणी
आईस्क्रीम आणिक लिंबूपाणी ..

पुस्तकं वाचू खूप छान छान
माहितीची करू देवाणघेवाण ..

संध्याकाळी खेळू बागेत खेळ
खेळून खाऊ बागेबाहेर भेळ ..

सुट्टी म्हणजे क्रिकेट खेळणे
अभ्यासाशी गट्टी फू करणे ..
.

शब्दखुणा: 

छोटू सरदार- (बालकविता)

Submitted by विदेश on 14 May, 2015 - 14:13

कमरेला लटकावत तलवार
ऐटीत फिरे छोटू सरदार ..

समोर दिसता माशा झुरळे
म्यानातून निघे तलवार ..

सपासप होती हवेत वार
माशा झुरळे मरती चार ..

हा हा हसे छोटू सरदार
कौतुक करी सारे घरदार ..

"भो भो" आवाज येता कानी
गडबडतसे छोटू सरदार ..

फेकुन देत हातची तलवार
आईच्या पदराआड पसार ..
.

शब्दखुणा: 

आम्चं बाळ...

Submitted by पुरंदरे शशांक on 6 July, 2014 - 23:04

आम्चं बाळ...

पाळण्यात झोपलंय इटुक्लं बाळ
चळवळ करुन दमलंय पार

इटुकल्या बाळाचं नाक नै बट्टऽण !!!
डोळे टकाटका नी डोके पार चमन ... Happy

इटुक्लं बाळ चालवते सायकल
हाता-पायांची किती ती वळवळ

इटुक्लं बाळ काय काय सांग्ते
आईला माझ्या बरोब्बर कळ्ते Happy

चांदोबाचा दिवा

Submitted by विदेश on 20 June, 2014 - 14:07

आई ग आई ,
चांदोबाचा दिवा
किती चांगला -
उंच उंच आकाशात
कुणी टांगला ..

आई ग आई ,
चांदण्यांच्या पणत्या
किती चांगल्या -
उंच उंच आकाशात
कुणी लावल्या ..

आई ग आई ,
दे ग शिडी मला
उंच उंच चढून -
चांदोबा-चांदण्या
आणीन मी काढून ..

आई ग आई ,
चांदोबा-चांदण्या
ठेऊन अंगणात -
रात्री छान खेळेन
त्यांच्या प्रकाशात ..

.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता