पाणी

Submitted by विजय दिनकर पाटील on 5 December, 2012 - 04:51

ही गझल ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळी गझल आहे. आवडली. तिसरा शेर समजला नाही. शेवटच्या शेरात नक्की काय म्हणायचे आहे ? (आता धरेला मिळेल कोणाकडून पाणी हे ठीक वाटतं का ? नभ पाणी देतं म्हणून धरणी अपेक्षा करेल, पाणी कसं करेल)

वाहवा.... सुंदर गझल.

मतला आणि शेवटचा शेर आवडला.

तुमच्या, ' मनात माझ्या कुठून येते बरेच काही' ची आठवण झाली.

-कावळा

व्वा...सुंदर..

मतला खूप आवडला...

नभास नाही कधीच भेटायचे धरेला
अता अपेक्षा करील कोणाकडून पाणी

हा ही शेर सुरेख..

शुभेच्छा..

विजयराव! सुंदर मतला, अप्रतिम गझल!
दुकाळ शब्द वापरतात का नाही, माहीत नाही.
शेर नंबर २,४ व ५ खालीलप्रमाणे करून पाहिले.

शेर नंबर २.....
तहानलेली नदी प्रतिक्षा करून थकली....
टिपूसही पाझरे न कोठे अजून पाणी!

शेर नंबर ४......

दुष्काळाला सुद्धा चढते धुंद सुगीची......
समस्त गावास चालले मातवून पाणी!

शेर नंबर ५.....

नभास नाही कधीच भेटायचे धरेला;
कसे धरेला मिळेल कोणाकडून पाणी?

एक आमचा शेर आठवला तो देत आहे....

तहानलेली नदी म्हणाली.....
मलाच ठाऊक ध्यास माझा!
प्रा.सतीश देवपूरकर

क्षमस्व! वृत्त घटकाभर विसरूनच गेलो.
तो शेर असा करावासा वाटला ..............

पहा सुगीची अवर्षणाला कितीक धुंदी.......
समस्त गावास चालले मातवून पाणी!
सुचवलेले शेर/बदल कसे वाटले?
.......प्रा.सतीश देवपूरकर

>>तुझ्या शिवारी हरेक वाफा तहानलेला
अखंड सिंचन करून गेले थकून पाणी

दुकाळ सरताच ओळखेना कुणी कुणाला
सबंध गावास चालले मातवून पाणी

नभास नाही कधीच भेटायचे धरेला
अता अपेक्षा करील कोणाकडून पाणी>>
वेगळाच मतला. खोल पाणी. गझल सुंदरच.