भक्तीगीत

भक्ति गीत: सप्तशॄंग गडावर जायचं

Submitted by पाषाणभेद on 17 October, 2019 - 01:14

मला ग बाई वाट गावली, माझ्या नशिबानं
सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ||

हाती धरली कावड
गोदेच्या निर्मळ पाण्यानं ||१||

गड झाला हिरवा
साथ दिली पावसानं ||२||

घर माझं भरलं
धन धान्याच्या राशीनं ||३||

जगण्याची रीत दावली
देवी सप्तशॄंगीनं ||४||

नवसाला पावली आई
आशीर्वाद दिला तिनं ||५||

पुजा करून ओटी भरीन
कुंकू लावीन हातानं ||६||

सगे सोयरे झाले सोबती
पायी चालती आनंदानं ||७||

दर्शनाची आस लागली
घाईनं उचलते पाऊलं ||८||

कृपा असू द्यावी भक्तांवरी
विनवणी करी पाषाण ||९||

का रे उशीर

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 26 May, 2019 - 12:04

का रे उशीर

पायाखालची वाळू तापली
नसे माथ्याला कुठे सावली ॥

कंठ सुकला टाहो आटला
चाल चालूनी उर फुटला ॥

त्राण सुटले गात्र थकले
आणि अवघे यत्न सरले॥

आता केवळ तुझ्या भरोसा
दिगंबरा रे सरो निराशा ॥

दत्त म्हणता उभा ठाकसी
तुझीच ना रे कीर्ती ही ऐसी ॥

मजसाठी मग का उशीर
धाव श्रीपाद करुणाकर ॥

विक्रांतचे या हसे होवू दे
बोल नावा तव न येवू दे ॥

श्री अवधूता धाव कृपाळा
शरणागता प्रभू सांभाळा‍ ॥

दत्ता दत्ता मीत हो रे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 21 May, 2019 - 13:25

दत्ता दत्ता मीत हो रे
तुझी फक्त प्रीत दे रे
तव गुण गाण्यासाठी
तूच तुझे गीत दे रे

दत्ता दत्ता थेट ये रे
कडकडून भेट दे रे
तन मन हरो माझे
असे काही वेड दे रे

दत्ता दत्ता माझा हो रे
देह तुझ्या काजा घे रे
मी पणे जडावला हा
असह्यसा बोजा ने रे

भजतांना तुज दत्ता
भजणेही सरू दे रे
सारे जिणे माझे तुझ्या
पदी लीन होवू दे रे

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

विषय: 

दत्त चित्ताचा अंकुर

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 15 May, 2019 - 11:39

दत्त चित्ताचा अंकुर
************

आला मायेला भेदून
दत्त चित्ताचा अंकुर
खोल जीवात दडली
आस प्रकाश आतूर ॥

मोक्ष वसंता चाहुल
दत्त मनाचा मोहर
भक्ती रसात ओघळे
गंध मदिर सुंदर ॥

दत्त जाणिवेचे फुल
येई हळू उमलून
माझे पणात आलेला
मज मी पणा कळून ॥

नाम गंधात भिजली
दत्त वायूची लहर
माझ्या चित्तात वसली
प्रभू प्रेमाचीच कोर ॥

तृष्णा तापल्या जीवास
दत्त मृगाचा पाऊस
तया एकरूप होता
सरे जीवनाची हौस ॥

|| विठू दादा ||

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 July, 2017 - 12:55

|| विठू दादा ||

भीमेचीया तटा
उभा विठू दादा
रोवूनिया पदा
युगे युगे ||

काळाला करडा
असे त्याचा धाक
पाप वाहे भाक
दूर पळे ||

दु:खात सावूली
धरे डोईवरी
कर्तव्य कसुरी
नावडे त्या ||

हसतो खेळतो
संगतीने येतो
जीवनाला देतो
अर्थ गोड ||

हाती नसे चक्र
अथवा की गदा
प्रेमाने सर्वदा
मार्ग दावी ||

कृपाळू दयाळू
सदा लोकपाळू
होई कनवाळू
प्रियजना ||

विक्रांते जाणला
हृदयी धरिला
म्हणुनी कळला
काही पथ ||

विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!

Submitted by अभय आर्वीकर on 8 July, 2014 - 14:56

विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!

Pandharpur

बोला! पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...!!

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

Submitted by पाषाणभेद on 24 December, 2013 - 20:34

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ||

गेलो तुळशी मंजीरा घ्याया
तेथे न तू गावला राया ||१||

गेलो राऊळी शोधाया
शोध व्यर्थ गेला वाया ||२||

चंद्रभागेकाठी तू न सापडेना
तुझ्याविण मन शांत होईना ||३||

शोध घेतला शोध घेतला
अंती नाही तू भेटला ||४||

पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे
चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५||

- पाभे

" धन्य आज दर्शनाने तुझ्या - "

Submitted by विदेश on 19 July, 2013 - 03:21

नाम जपलं विठ्ठलविठ्ठल, मी तुला पहाया
रोज मूर्ति बघणे छंदच मनातून माझ्या ||

आज दर्शनाने झाली धन्य धन्य काया
डोळियाचं फिटलं पारणं जीव नाही वाया ||

चाल चालुनी शिणली रे जर्जर ही काया
ध्यास घेतला होता मी, काळजामधुनी या ||

तूच ध्यानि तूच मनी रे पंढरिच्या राया
शेवटी मला पावला देवा तूच विठू राया ||

व्हावं सोनं देहाचं ह्या, वाटले मना या
डोळियाचं पाणी माझ्या, गेलं नाहि वाया ||

धन्य आज दर्शनाने तुझ्या पंढरीत मी या
आनंदानं लोटांगण हे पायावर तुझिया ||

.

शब्दखुणा: 

भक्तीगीतांचा संग्रह

Submitted by महेश on 25 January, 2013 - 05:25

नमस्कार,

नुकतेच एक जुने हिंदी भक्तीगीत ऐकायला मिळाले.
मुझीमे रहके मुझीसे दूर,
ये कैसा दस्तूर रे मालिक ये कैसा दस्तूर

विषय: 

उपहार संकष्टीसाठी

Submitted by pradyumnasantu on 2 February, 2012 - 11:38

सज्जनांचा रक्षक, तू सुखस्मृती
दुर्जनांस सदैव रे तुझी भिती
सर्वांना प्रिय असे तुझीच आरती
तुझ्या दर्शनाने हो इच्छापूर्ती
तुझ्या दर्शनाने हो इच्छापूर्ती, दु:ख दूर माझेही करा गणपती

शेंदुराची ऊटी सर्वांगावरती
देते तुझ्या सामर्थ्याची प्रचिती
मोत्यांची कंठमाळ दावी श्रीमंती
तुझ्या दर्शनाने हो इच्छापूर्ती
तुझ्या दर्शनाने हो इच्छापूर्ती. दु:ख दूर माझेही करा गणपती

रत्नकांत! माता तुझी पार्वती
केशरी कुंकुम, तशी सजली ऊटी
घुंगरू दुर्जनांस धडकी भरविती
तुझ्या दर्शनाने हो इच्छापूर्ती
तुझ्या दर्शनाने हो इच्छापूर्ती, दु:ख दूर माझेही करा गणपती

लंबोदर तू का, हे गणपती

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - भक्तीगीत