काय छोट्या दोस्तांनो?
कसे आहात सगळे?
बाप्पा आले म्हणून खुश ना सगळे?
कित्ती मजा असते ना बाप्पा आले की! छान छान खाऊ, गंमत खेळ, आरत्या, सगळी मित्रमंडळी मिळून धम्माल येते अगदी!
तुमच्या आनंदात भर टाकायला घेऊन येत आहोत आपला आवडीचा चित्रे रंगवा उपक्रम.
तुम्हाला मोबाईल किंवा कोणत्याही स्क्रीन ची गरज नाहीये रंग भरण्यासाठी, आपले पेटीतले कोणतेही रंग उचला, स्केचपेन, खडू किंवा जलरंग, दिलेल्या विषयायचं चित्र काढा किंवा तयार छापील कोरं चित्र घेऊन सुंदर रंगवा.
इतकी मजा येईल ना!
विषय पण मजेदार आहे, तुमच्या आवडीचं कोणतंही कार्टून कॅरक्टर (पात्र)निवडा, त्याचं चित्र घ्या आणि मूळ रंग सोडून इतर कोणत्याही रंगात रंगवा. म्हणजे कसं? तर समजा मिकी माउस असेल तर लाल काळा न वापरता दुसरा रंग घ्या, डोरेमॉन असेल तर निळा नको, पेपा पिग असेल तर गुलाबी सोडून कोणताही चालेल.
ह्यामुळे तुमचं आवडतं पात्र तुम्हाला तुमच्या आवडत्या रंगात रंगवता येईल! गंमत ना!
धाग्याचे शीर्षक खालीलप्रमाणे असावे.
चित्रकला उपक्रम : माझे आवडते कार्टून - तुमचा मायबोली आयडी - छोट्यांचे पूर्ण नाव
नियम-
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) वयोगट - छोटा गट 0 ते ६ वर्षे पर्यंत.
४) चित्र स्वतः रंगवलेले असावे. रंग कोणतेही वापरा.
५) चित्रं गणेश चतुर्थीपासून, २७ ऑगस्ट २०२५(भारतीय प्रमाण वेळ) ते ७ सप्टेंबर २०२५ (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
६) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२५" अशी शब्दखूण द्यावी
७)प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २७ ऑगस्ट ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
८)'मायबोली गणेशोत्सव २०२५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
९)याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२५ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरू नये).
छोट्या दोस्त मंडळींनो, पाठवताय ना मग तुम्ही रंगवलेली छान छान चित्र ?
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
छान उपक्रम.. मुलांच्या
छान उपक्रम.. मुलांच्या आवडीचा विषय
मला वाटते गेल्या वर्षी सुद्धा माझे आवडते कार्टून होते ना..