मुरुड-जंजिरा

आठवणीतला गणेशोत्सव

Submitted by वावे on 23 August, 2020 - 14:16

लहानपणी मी दरवर्षी गणपतीसाठी आईबरोबर आजोळी मुरुडला जायचे. मुरुड म्हणजे जंजिरा-मुरुड. आमच्या गावाहून आधी एसटीने किंवा कधी बाबाही सोबत असतील तर मोटरसायकलवर, दिघीला जायचं. तिथे लॉंचच्या धक्क्यावर पोचलं, की ’आगरदांडा की राजपुरी’ असा एक पर्याय असायचा. राजपुरीला जाताना लॉंच जास्त हलायची, कारण ते खुल्या समुद्राच्या जास्त जवळ आहे. अर्थात अगदी लहानपणापासून हा प्रवास अनेकदा केल्यामुळे लॉंच कितीही डुचमळली, तरी मला कधीच भीती वाटली नाही. लॉंच चालवणारी माणसं तर लीलया मोटरसायकली, स्कूटर्स लॉंचच्या टपावर वगैरे चढवायची.

Subscribe to RSS - मुरुड-जंजिरा