शक्ती

स्त्री स्तवन

Submitted by आर्त on 27 August, 2021 - 04:17

अचानक त्वचेवर प्रलयपात झाले,
बटांचे तुझ्या रेशमी घात झाले. 
 
सखे ठेव ताब्यात ती लांब वेणी,
किती ठार प्रत्येक झोक्यात झाले.
 
कसे तरसलेले खुळे हे दिवाणे,
तुझा गंध धरण्या पुढे हात झाले.
 
परम भाग्य तू माळल्या मोगऱ्याचे,
अमोदित तुझ्या पुष्पगंधात झाले.
 
तुझ्या अस्मितेचाच ताऱ्यांस हेवा,
जळजळून ते उजळ गगनात झाले.
 
निघालीस बाहेर या निग्रहाने,
जुने पुरुषप्राधान्य हे मात झाले.
 
जरी काल हरलीस तू ती लढाई,
तुझे शौर्य विश्वात विख्यात झाले.
 
गुलामी लथडलीस तू कुंडलीची,

शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

Submitted by salgaonkar.anup on 2 May, 2016 - 23:59

लाडक्या राजकन्येला सुयोग्य वर लाभावा म्हणून राजाने स्वयंवराची घोषणा केली.
राजकन्येच्या स्वयंवराचा दिवस उगवला आणि राजमहाल दुमदुमू लागला.
जागोजागी दिव्यांची आरास, फुलांच्या रांगोळ्या, सुवासिक अत्तरे, झेंडूची तोरणे या सा-याने वातावरण आगदी प्रसन्न झाले. अनेक देशो- देशीचे शूरवीर योद्धे, राजपुत्र राजदरबारात उपस्थित झाले. राजहत्तीला दरबारातील रिंगणात उभ करण्यात आलं आणि "जो कुणी पुरुष राजघराण्याच्या राज हत्तीची सोंड आणि पुढचे दोन पाय वर करून दाखवेल त्याच्याशी राजकन्येचा विवाह होईल आणि त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दिलं जाईल." अशी घोषणा झाली.

शब्दखुणा: 

समर्थशक्ती

Submitted by टाकाऊ on 20 August, 2010 - 12:03

एखादी नवनिर्मिती होण्यासाठी काही विशिष्ट रसायनं किंवा योग जुळून यावे लागतातच असे नाही. वर्तमानातील सद्यस्थिती किंवा भूतकाळातील घडलेली एखादी घटनासुद्धा ठिणगी पाडून जाते. प्रस्तुत काव्य लिहिण्याआधी मात्र यापैकी काहीच झालं नव्हतं. नेहमीप्रमाणे माझी कृष्णा घोडी मी कचेरीतून वाड्याकडे फेकली आणि मजल दरमजल करत हायवेवर आलो. डोक्यात नेहमीप्रमाणे विचारांचे गोंधळी त्यांची कला सादर करत होते. पण काय झालं ठाऊक नाही अचानक विचार आला की समजा परिस्थितीने गांजलेला, नशिबाने अवकृपा केलेला एखादा आत्मसमर्पण करायला निघालाय आणि त्याला समर्थ भेटले तर?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शक्ती