गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषातराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन याचिका बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे.
आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!'
माझ्याकडे नोकियाचा ५२३३ हा टचस्क्रीनचा फोन आहे. यात सिम्बियन ओएस आहे. फर्मवेअर व्यवस्थित अपडेटेड आहे.
या फोनवर मला एसेमेस किन्वा नोट्समधे मराठीत कसे लिहीता येईल?
आयेमी वगैरे काही आहे का? माझ्या फोनला असलेल्या पूर्ण क्वर्टी कळफलकाचा उत्तम उपयोग करता येईल...
मदतीच्या अपेक्षेत.
ग्रामिण
हल्ली बरेच जण ऑनलाईन पुस्तकं वगैरे वाचतात. मला मात्र आजही पुस्तक हातात धरून वाचायला आवडतं. पुस्तक, मासिक असं काहीही. एक तर ते जवळ बाळगता येतं. डोळ्याला उजेडाचा त्रास नाही. लोळत वाचता येतं. सगळ्यातमहत्वाचां म्हणजे दीर्घ कथा असेल तर कुठपर्यंत आलीय कथा हे पान क्रमांक पाहून किंवा मार्कर, पेन, पेन्सिल असं काहीही ठेवून लक्षात ठेवता येतं. थोड्या वेळानं मग पुढची कथा कंटिन्यू करता येते.
देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)
नमस्कार! सर्वसाधारणपणे अापण नेहमी अमुक शब्दाचा ‘अपभ्रंश’ तमुक अाहे असे म्हणतो. जसे की अॉफिस चा अपभ्रंश होअुन हापिस हा शब्द. हॉस्पिटल चे अीस्पितळ, िअ. वरील अुदाहरणे िअंग्रजी शब्दांची अाहेत. मात्र मराठी शब्दांतही असे बदल घडुन येतात. जसेः जाहला – झाला. पण हे सर्व अपभ्रंश अुच्चाराबाबत अाहेत. अपभ्रंशाची सोपी व्याख्या म्हणजे ‘भ्रष्ट नक्कल’. भ्रष्ट म्हणजे जी मूळ प्रतिशी समरुप नाही अशी.
मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार्या ऑटो करेक्ट म्हणजे काय हे नव्याने सांगायला नको. त्यात adn असे टंकित केले की आपोआप and असे होते. अशीच सुविधा ओपन ऑफिसमध्ये इंग्रजीसाठी देखील उपलब्ध आहे. मराठीत स्वयंसुधारणा (एटो करेक्ट) ही सुविधा ओपन ऑफिससाठी मोफत व मुक्त स्रोत पद्धतीने वितरीत करायचा माझा प्रयत्न आहे. हे सॉफ्टवेअर आता ८०% पूर्ण झाले असून मोफत उपलब्ध आहे.
http://extensions.services.openoffice.org/en/project/AutocorrectMarathi
वर दिलेल्या पत्त्यावरून acor_mr-IN.dat ही फाइल उतरवून घ्या. व ती खाली दिलेल्या फोल्डरमध्ये साठवून ठेवा. आणि रायटर पुन्हा चालू करा.
मराठीत काही टंकायचे म्हणजे शुद्धलेखन ही एक कायमची डोकेदुखी बनून राहते. फायरफॉक्स हा न्याहाळक वापरत असाल तर मात्र यातून एक मार्ग आहे. फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहूया.
फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी डिक्शनरीचे एड-ओन जोडून घ्या.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/