infinity
त्या पटरीवर अंधाराचे साम्राज्य होते. काळोखी झुडपे भयाण भासत होती. बोचऱ्या थंडीने पाय लटपटत होते. दूरवर कुत्री भुंकत होती. मधूनच एक रानडुक्कर पळालं आणि मी सिगारेट काढली.
सिगारेट! बस एक सिगारेट! सालं पेटवायला माचीस नाही.
चरफडत चालत राहिलो. इथली शांतता किती भयाण आहे. कुण्या एकेकाळी वापरात असलेली आणि जिचा भयानक अपघात झाला असावा अशी वाटणारी एक मालगाडी यार्डात उभी होती. प्लॅटफॉर्मवर एक माणूस दिसेल तर शप्पथ. दिवे मात्र अजूनही जळत होते. लख्ख प्रकाश.