सोळा आण्याच्या गोष्टी - बँडरस्नॅच - अमितव

Submitted by अमितव on 9 September, 2019 - 14:34

बिझनेस ट्रिपवर स्कॉटचा रायनची तब्येत अचानक बिघडल्याचा फोन आला आणि एमा लगोलग विमान रिस्केज्योल करुन वेगस एअरपोर्टला पोहोचली. सिक्युरिटी चेकला जायच्या आधी जेसनला घट्ट मिठी मारताना एमाच्या डोळ्यात आता ही ओढाताण सहन होत नाहीये चे भाव, आणि जेसनच्या नजरेतही नात्यांचा गुंता सोडवायला पहिले पाश बाजुला करण्याशिवाय गत्यंतर नाही चे भाव स्पष्ट दिसत होते. "मी वि़केंडचे दोन इव्हेंट आटपून सोमवारी परत येतो, तोपर्यंत तू काही करू नको" असं एमाला बजावून जेसन पार्किंगकडे वळला. (७२)

<1. HUD (Heads Up Display) पॉप्स अप: जेसन गाडीत बसला असेल का?>

<1. A. हो> जेसनने गाडी चालू केली.. 'लास्ट नाईट युवेर इन माय रूम, नाव माय बेडशिट स्मेल्स लाईक यू.' दाबुन धरलेला आसू ओघळलाच. काटा काढून सुख मिळेल? पण मुलगा तर मिळेल! (२८)

<1. B. नाही> टीएसए-प्रि मधून झटकन गेटवर पोहोचणं आवश्यक होतं. लॅपटॉप बाहेर काढायची गरज न्हवतीच. एमाला प्लेनमध्ये बसू देणं म्हणजे जेनीफरच्या लवकरच एक्झिक्युट होण्यार्‍या विलमधून फुटकी कवडी ही न मिळण्यची शाश्वतिच! (२८)

-------------------------------------------------------------------------------------------------------------
टीप१ - संयोजकांनी कथेचे परिक्षण करणे मान्य नसल्याने जोवर सालाबादप्रमाणे लोकशाही पद्धतीने मतदान होत नाही तोवर कृपया ही कथा स्पर्धेतून बाद समजावी.

टीप२: वाचकांना हो/नाही स्वरुपाचा प्रश्न विचारून २८ शब्दांत कथेचा शेवट बदलायचा असेल तर यु आर वेलकम! < > मधील प्रश्न आणि शब्द जमेस धरलेले नाहीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजकांनी कथेचे परिक्षण करणे मान्य नसल्याने जोवर सालाबादप्रमाणे लोकशाही पद्धतीने मतदान होत नाही तोवर कृपया ही कथा स्पर्धेतून बाद समजावी.
>> मतदान पद्धतिने हि कथा जिंकने अवघड वाटत आहे, संयोजकानी परिक्षण केले तर जिन्क्न्याची शक्यता आहे.

स्कॉट आणि एमा नवरा बायको आहेत आणि रायन त्यांचा मुलगा.
जेसन आणि स्व. जेनिफर नवरा बायको होते.

जेसन आणि एमाचे अफेयर आहे आणि ते लास वेगास मध्ये त्यांच्या सोकॉल्ड बिझनेस ट्रिपवर एकत्र रहात आहेत. कदाचित कलिग असतील.
त्या दोघांनी आपापल्या जोडीदाराला संपवायचे प्लॅन्स बनवले आहेत. कदाचित जेसनने जेनिफरला ऑलरेडी संपवलेले आहे (किंवा ती नॅचरली मेली आहे) आणि आता एमा स्कॉटला संपवणार आहे. (जेसनचे जेनिफरवर प्रेम असावे आणि ती नॅचरली मेली असेल असे मला वाटते.)

एमा स्कॉटला मारून मुलगा आणणार आणि जेसन जेनिफरच्या मृत्यूवरून तिच्या विलचे मिळणारे पैसे, असे दोघांचे ठरलेले असावे.

पण जेसन अशा कॅच २२ सिच्युएशन मध्ये सापडला आहे की आता जेनिफर मेल्यानंतर एमा लगोलग त्याच्याकडे आली तर त्याच्यावर काही कारणाने जेनिफरच्या विलचे पैसे सोडण्याची वा खर्च करण्याची वेळ येऊ शकते किंवा कदाचित जेनिफरच्या अकाली मृत्य्यूचा संशय सुद्धा येऊ शकतो.
जेसनला मूल हवे आहे जे जेनिफर त्याला देऊ शकली नाही पण एमाने मूल आणले तर विलचे पैसे मिळणे दुरापास्त होऊन जाईल.

जेसन एमाला जाऊ देतो की धावपळ करून तिला थांबवतो ? मूल की पैसे?

७२ शब्दाचा मूळ प्रसंग आहे आणि पुढे २८ शब्दांचे २ शेवट सुचवलेत त्याने. त्यातला कुठलाही एक शेवट घेऊन अर्थ लावायचा आहे किंवा २८ शब्दांमध्ये नविन शेवट सुचवायचा आहे. मला दोन्ही शेवट नाही कळले Sad अंधाधून आहे नुसती. Wink

कल्पना भन्नाट आहे पण.

> स्कॉट आणि एमा नवरा बायको आहेत आणि रायन त्यांचा मुलगा.
जेसन आणि स्व. जेनिफर नवरा बायको होते.
जेसन आणि एमाचे अफेयर आहे आणि ते लास वेगास मध्ये त्यांच्या सोकॉल्ड बिझनेस ट्रिपवर एकत्र रहात आहेत. कदाचित कलिग असतील. > हे एवढं कळलं होतं

> त्या दोघांनी आपापल्या जोडीदाराला संपवायचे प्लॅन्स बनवले आहेत. > 'नात्यांचा गुंता सोडवायला पहिले पाश बाजुला करण्याशिवाय गत्यंतर नाही' म्हणजे मला वाटलं की आपापल्या जोडीदारला खरं काय ते सांगून घटस्फोट घेण्याबद्दल बोलताहेत.

> कदाचित जेसनने जेनिफरला ऑलरेडी संपवलेले आहे (किंवा ती नॅचरली मेली आहे) > 'जेनीफरच्या लवकरच एक्झिक्युट होण्यार्या विल' म्हणजे जेनिफर अजून जिवंतही असू शकते.

> आणि आता एमा स्कॉटला संपवणार आहे. > किंवा जेसन "मी विकेंडचे दोन इव्हेंट आटपून सोमवारी परत येतो, तोपर्यंत तू काही करू नको" म्हणतो तेव्हा "आपण दोघे एकत्र बसूनच स्कॉटशी बोलू. तू एकटीने काही बोलू नकोस. ककल्ड पुरुष वायोलन्ट होऊ शकतो" असे सांगत असेल.

> जेसन गाडीत बसला असेल का? हो. जेसनने गाडी चालू केली.. > मला वाटलं हे स्कॉटचे विचार आहेत. जेसनच्या गाडीत त्याने बॉम्ब फिक्स केलाय. गाडी चालू केली की तो फुटणार.
> 'लास्ट नाईट युवेर इन माय रूम, नाव माय बेडशिट स्मेल्स लाईक यू.' दाबुन धरलेला आसू ओघळलाच. काटा काढून सुख मिळेल? पण मुलगा तर मिळेल! > हेपण स्कॉटच म्हणतोय. त्याला आपल्यासोबतच मुलगा हवाय आणि एमाला घटस्फोट द्यावा लागल्यास मुलगा तिच्याकडे जाईल असे त्याला वाटते. म्हणून तो जेसनला संपवतो.

>><1. B. नाही> टीएसए-प्रि मधून झटकन गेटवर पोहोचणं आवश्यक होतं. लॅपटॉप बाहेर काढायची गरज न्हवतीच. एमाला प्लेनमध्ये बसू देणं म्हणजे जेनीफरच्या लवकरच एक्झिक्युट होण्यार्या विलमधून फुटकी कवडी ही न मिळण्यची शाश्वतिच! (२८) >> हे काये ते कळत नाही.

हे काय शंभर शब्दात लिहायचं अन नंतर पब्लिकला समजत नाही तर पॅरा पॅरा लिहीत बसायचं.

कुछ जमा नै गड्या. प्लिज मेक इट या नाईस शॉर्ट स्टोरी! लेखकाच्या गोष्टी लोकांना समजावून सांगाव्या लागताहेत, हे फार वाईट आहे.

ही कथा तर आजिबात कळाली नाहीये. Sad
माबोवरच्या ह्या शशक वाचण्याआधी मी एवढी मठ्ठ असल्याची फीलींग कधीही आली नव्हती.
प्रत्येक कथेवर हाय्जेनबर्ग जे स्पष्टीकरण देतात ते वाचुन कथा कळताहेत Happy तर हायजेन्बर्ग यांनाच विजेता घोषित करावं असं मला वाटतंय. Happy Light 1

प्रत्येक कथेवर हाय्जेनबर्ग जे स्पष्टीकरण देतात ते वाचुन कथा कळताहेत तर हायजेन्बर्ग यांनाच विजेता घोषित करावं असं मला वाटतंय. >>>> हे भारीये Happy
हायझेनबर्ग इतका गुंतागुंतीचा विचार करतात की अजुन एका कोण्त्यातरी शशकमधे, ती सरळ अर्थाची होती तरी त्यांनी त्यातही गुंतागुंतीचा अर्थ काढला. Happy कोणती ते शोधते.

प्रत्येक कथेवर हाय्जेनबर्ग जे स्पष्टीकरण देतात ते वाचुन कथा कळताहेत तर हायजेन्बर्ग यांनाच विजेता घोषित करावं असं मला वाटतंय. >>> +१

पण या कथेत अ‍ॅमीचं स्पष्टीकरण जास्त पटतय.

हायझेनबर्ग इतका गुंतागुंतीचा विचार करतात की अजुन एका कोण्त्यातरी शशकमधे, ती सरळ अर्थाची होती तरी त्यांनी त्यातही गुंतागुंतीचा अर्थ काढला.. >>> जव्हेरगंजची 'लॉटरी'

> जेसनला मूल हवे आहे जे जेनिफर त्याला देऊ शकली नाही पण एमाने मूल आणले तर विलचे पैसे मिळणे दुरापास्त होऊन जाईल. > रायन जर स्कॉट आणि एमाचा मुलगा असेल तर तो जेसनला कशाला हवा? कोणत्या पुरुषाला दुसऱ्या पुरुषाचा अंश असलेले मुल हवे असते?

कोणत्या पुरुषाला दुसऱ्या पुरुषाचा अंश असलेले मुल हवे असते? >> अ‍ॅमी, असतात की असे लोक. बायकोच्या पहिल्या अपत्याला आपलं मानतात.
माधव, बरोबर. ‘लॉटरी’ च Happy

> बायकोच्या पहिल्या अपत्याला आपलं मानतात. > अन् ते ' त्या दोघांनी आपापल्या जोडीदाराला संपवायचे प्लॅन्स बनवले आहेत. कदाचित जेसनने जेनिफरला ऑलरेडी संपवलेले आहे आणि आता एमा स्कॉटला संपवणार आहे.' असला प्लॅनदेखील बनवू शकतात?

तुम्हाला खुनाचा प्लान करणारे ‘आपले’ मानतील का असे विचारायचे असेल तर मला माहीत नाही मानतील का?

मला ते विधान जनरल आहे असे वाटले होते म्हणुन लिहीले, असे पुरुष असतात.

धन्यवाद प्रतिसादांसाठी.
हाब आणि अ‍ॅमी दोघांनी बर्‍यापैकी मला जे वाटत होतं ते लिहिलंय.
मला बॅंडरस्नॅच स्टाईल इंटरॅक्टिव्ह शेवट बदलत जाणारी आणि प्रत्येक वेळी कंडिशन बदलली तर पहिली अझंप्शन्स नल आणि व्हॉईड करून पुन्हा विचार करणारी गोष्ट लिहायची होती. पण १०० शब्दात.
मी जमेल तसा शेवटचा प्रश्न बदलुन पण कथेचा पहिला भाग तोच ठेवून आणखी काय करता येऊ शकेल ते लिहिणारे. तुम्हाला काही सुचत असेल तर नक्की लिहा.
परत एकदा धन्यावाद Happy

जर <१ A> घडलं असेल, तर रायनचा बायोलॉजिकल बाप जेसन असेल. त्याला स्कॉटला बाजूला सारायचं आहे, एमा आणि रायनला मिळवण्यासाठी. पण तो पापभिरू आहे. आपण चांगल्या कुटुंबाला तोडतोय अशी एक बोच ही त्याला आहे. हे असं करून आपल्याला फिजिकली मुला बरोबर रहाता येईल पण त्याने आपण नक्की सुखी होऊ का? त्याला सगळं हवं तर आहे, पण वाईटपणा न घेता. या केस मध्ये त्याचं बहुदा लग्न झालं नसावं.
जर <१ B> घडलं असेल, तर एमाला लवकरात लवकर आहे ते रिलेशन ब्रेकप करायचं आहे. आणि जेसन तिला स्लो डाऊन व्ह्यायला सांगत असेल. ती टोकाचं पाऊन उचलणार अशी जेसनला भिती आहे. तो तिला बजावतो की काही करू नको. पण त्याला तिची खात्री नाही. मिलेनिअर जेनि बहुतेक मरणासन्न आहे. एमा जर आत्ता इकडे आली तर जेनी विल अर्थात जेसनला फुटकी कवडी ही देणार नाही. आता त्याला त्या विलच्या पैशाचा ही लोभ आहे आणि एमा त्याच्या बरोबर आलेली त्याला हवी आहे, पण आत्ता इमोशनल नाही तर कोल्ड ब्लडेड विचारपूर्वक स्टेप घेणं एमासाठी अशक्य बनत चालणंय. आता एमा घरी पोहोचण्याआधी काही तरी स्टेप घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तो लवकरात लवकर गेटवर पोहोचुन काही 'इंतजाम' करता आला तर बघणारे. एमाच्या सवयी/ सायकॉलॉजी त्याला माहित आहे, बघुया एअरपोर्ट सारख्या ओपन जागी त्याला काय जमतंय!

तर हायजेन्बर्ग यांनाच विजेता घोषित करावं असं मला वाटतंय. >>> विजेत्या गोष्टीचा लेखक कुणीही असो, माझे मत (देता आले नाही तरी) हाबलाच.

शशक गंडलं आहे का याची कल्पना नाहि, पण त्यावरचे प्रतिसाद नक्किच गंडले आहेत. एमा आणि जेसन एकमेकांच्या जीवावर उठलेले आहेत. एक्मेकांचा काटा काढण्याच्या दृष्टोकोनातुन त्यांनी आपापले प्लॅन्स बनवले आहेत. वर दिलेले ऑप्शन्स अनुक्रमे एमा आणि जेसन यांचं स्वगत (प्लॅन) आहे...

ऊप्स! मी लिहिता-लिहिता अमितवचा प्रतिसाद आला. तो तर एक्दम टँजंट... Lol

वर दिलेले ऑप्शन्स अनुक्रमे एमा आणि जेसन यांचं स्वगत (प्लॅन) आहे... >>>>>
<1. A. हो> जेसनने गाडी चालू केली.. 'लास्ट नाईट युवेर इन माय रूम, नाव माय बेडशिट स्मेल्स लाईक यू.' दाबुन धरलेला आसू ओघळलाच. काटा काढून सुख मिळेल? पण मुलगा तर मिळेल! (२८)

जेसनने गाडी चालू केल्यावर, गाणं त्याच्या गाडीत आणि पर्यायाने त्याच्या कानात वाजेल ना? ते एमाच्या स्वगतात का येईल?
मुलगा तरी मिळेल असे एमा का म्हणेल? तो तिचाच आहे ना त्याला अजून काय मिळवायचे?
मुलगा तरी मिळेल हे तो ज्याच्याकडे नाहीये तो म्हणेल ना... म्हणजे जेसन.

>>जेसनने गाडी चालू केली..<<
निव्वळ एक घटनाक्रम, माझ्या मते. पॉइंटलेस.

>>'लास्ट नाईट युवेर इन माय रूम, नाव माय बेडशिट स्मेल्स लाईक यू.' दाबुन धरलेला आसू ओघळलाच. काटा काढून सुख मिळेल? पण मुलगा तर मिळेल! (२८)<<
एमा अजुन गुंतलेली आहे जेसन मधे; बट रियॅलिटी सक्स. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नात्यातला गुंता सोडवायचा आहे - दोघांनाहि. काटा काढुन सुख मिळेल का, या संभ्रमात एमा आहे पण अप्साइड इज जेसन गेल्यावर मुलावरचा त्याचा हक्क - हा प्रश्न निकालात निघेल...

आधी कळली नाही नीट Happy मग प्रतिक्रिया वाचून कळली.
चला या निमित्ताने लेखकु झालास तू अमित! येऊ द्या मग आता!! Happy

निव्वळ एक घटनाक्रम, माझ्या मते. पॉइंटलेस. >> पॉईंटलेस कसे? आपल्याला जेसनच्या गाडीतून एमाच्या विमानात तिचं स्वगत ऐकण्यासाठी जायला घटनेची कंटिन्यूटी हवी ना?

एमा अजुन गुंतलेली आहे जेसन मधे; बट रियॅलिटी सक्स. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नात्यातला गुंता सोडवायचा आहे - दोघांनाहि. काटा काढुन सुख मिळेल का, या संभ्रमात एमा आहे पण अप्साइड इज जेसन गेल्यावर मुलावरचा त्याचा हक्क - हा प्रश्न निकालात निघेल... >> एमा बाय हर ओन चॉईस एका अनफेथफूल गोष्टी मध्ये ईन्वॉल्व आहे. ती ऑन हर ओन अकॉर्ड स्कॉटला चीट करत आहे. आणि ते थाबवणं तिलाच शक्य आहे त्यासाठी ज्याच्याबरोबर ईन्वॉल्व्ड आहे त्याचाच खून का करायचा? जो नको आहे (स्कॉट) त्याचा खून करणार ना? लीगल सेपरेशनमध्ये मुलगा गमावण्याची रिस्क आहे जी एमाला घ्यायची नाहीये, म्हणून ती जेसन आणि रायन एकाचवेळी मिळ्वण्यासाठी स्कॉटला मारणार.

जिथे दोघांना म्युचुअल ब्रेकअप करणे शक्य आहे (कारण हे लीगल रिलेशन, कस्टडी बॅटल वगैरे नाही) तिथे त्यांना एकमेकांचे खून पाडायची काय गरज आहे?

सस्मित, साधना तुमच्याशी सहमत!
ही सर्वात कठीण कथा होती माझ्यासाठी! एकेक शशक वाचून समजून घेता घेता मेंदू पार शिणून गेला बै Proud
...आणि परिणामी इतर साध्यासुध्या कथांत पण काळंबेरं दिसायला लागलय!

>>तिथे त्यांना एकमेकांचे खून पाडायची काय गरज आहे?<<
लिविंग नो लूझ एंड्स बिहाइंड. यु नीड टु वॉच मोर मुविज इंवॉल्विंग ड्रामा... Proud

यु नीड टु वॉच मोर मुविज इंवॉल्विंग ड्रामा... Proud >> देअर आर मुवीज ईन्वॉल्विंग सेन्सिबल अँड लॉजिकल ड्रामा अँड देन देअर आर... वेल यू नो दॅट पार्ट बेटर दॅन आय डू. Proud

> जर <१ A> घडलं असेल, तर रायनचा बायोलॉजिकल बाप जेसन असेल. > हो हा एक अंदाज होता. पण मग त्या केसमधे रायन भरपूर लहान असायला हवा, आणि मग एवढ्या लहान बाळाला स्कॉटसोबत ठेऊन एमा बिझनेस ट्रिपला जाईल का? आणि जेसन-एमा काहीतरी निर्णय घ्यायला इतके दिवस थांबतील? जर जेसन खरंच पापभिरू असेल +त्याचं लग्न झालेलं नसेल तर तो एमा गरोदर झाल्याझाल्या लगेच स्कॉटशी घटस्फोट प्रक्रिया चालू करायला लावेल.

> जर <१ B> घडलं असेल, तर एमाला लवकरात लवकर आहे ते रिलेशन ब्रेकप करायचं आहे. आणि जेसन तिला स्लो डाऊन व्ह्यायला सांगत असेल. ती टोकाचं पाऊन उचलणार अशी जेसनला भिती आहे. तो तिला बजावतो की काही करू नको. पण त्याला तिची खात्री नाही. मिलेनिअर जेनि बहुतेक मरणासन्न आहे. एमा जर आत्ता इकडे आली तर जेनी विल अर्थात जेसनला फुटकी कवडी ही देणार नाही. आता त्याला त्या विलच्या पैशाचा ही लोभ आहे आणि एमा त्याच्या बरोबर आलेली त्याला हवी आहे, पण आत्ता इमोशनल नाही तर कोल्ड ब्लडेड विचारपूर्वक स्टेप घेणं एमासाठी अशक्य बनत चालणंय. आता एमा घरी पोहोचण्याआधी काही तरी स्टेप घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तो लवकरात लवकर गेटवर पोहोचुन काही 'इंतजाम' करता आला तर बघणारे. एमाच्या सवयी/ सायकॉलॉजी त्याला माहित आहे, बघुया एअरपोर्ट सारख्या ओपन जागी त्याला काय जमतंय! > जेसन एमाला मारायचा प्लॅन करतोय? की फक्त घरी जाऊ न देण्याचा?
जेसनने एमाच्या बॅगेत स्फोटक किंवा तत्सम काही ठेवलंय, ज्यामुळे ती सिक्युरिटी चेकमधे अडकेल, घरी जाऊ शकणार नाही <- अस वाटलं होतं पण that will cause too much scandal आणि मग यात स्कॉटपन अडकेलच. मग जेनिफरचे पैसे कुठून मिळणार?