काय घडणार?, काय होणार, कोण ठरवणार, तुम्ही की आम्ही?

Submitted by Mi Patil aahe. on 13 December, 2018 - 21:05

राजकीय घडामोडी पाहता पुन्हा एकदा कांग्रेस विराजमान सध्या ४राज्यात झाली आहे,हे पाहता लवकरच कांग्रेस सत्तेत परतत आहे,हे फक्त राज्यात होत आहे की भारताची सत्ता ही पुन्हा कांग्रेस च्या हाती जाणार---- मग पंतप्रधान कोण असेल कांग्रेस चा?????
की पुन्हा कमळ उगवणार,सत्तेत?
की लोकशाहीत काहीही होऊ शकते,याची पुन्हा प्रचिती येणार की राजकीय मंडळी घेणार, की जनता-जनार्दन देणार?
भारताचा पंतप्रधान पुढील 5 वर्षांसाठीचा कोण होणार?
हे कोण ठरवणार?
लोकशाही?
पक्षशाही?
मायबाप मतदार?
तुम्ही की आम्ही?
पक्षनेता की पक्षाध्यक्ष?
सामान्य कार्यकर्ता?
चालू घडामोडी?
गतकाळातील घडामोडी?
भारताचा पुढील ५वर्षांसाठीचा पंतप्रधान कोण होईल?
काय सांगावे कदाचित ती जोखिमपूर्ण जबाबदारी तुमच्याही खांद्यावर येऊ शकेल!!! B carefully!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काँग्रेस मध्ये जोवर गांधी फॅमिली आहे तोवर कुणी दुसरे स्वप्नात तरी पंतप्रधान व्हायचा विचार करू शकते का

लाल बहादूर शास्त्रीना संधी मिळाली ती शेवटची. त्यानंतरच्या दोघांना संधी मिळाली ती सोनिया पंप्र होऊ शकत नव्हती म्हणून. आता गांधी घरात उमेदवार आहे. याला अद्याप मुले नसली तरी प्रियंकाला आहेत. त्यामुळे काँग्रेसचा पंप्र उमेदवार कोण हा प्रश्न गांधी फॅमिली असेतो चर्चिण्यात काहीही अर्थ नाही.

मनमोहन सिंग यांच्यानंतर निलंकेणी यांचे नाव चर्चेत होते २०१४ला. बहुतेक ते स्वत: राजकारणातुन बाजुला झाले किंवा रागा साठी त्यांना हटवण्यात आले असावे. जसे अडवाणींना हटवण्यात आले.

सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता आणि वैयक्तिक कामगिरीचा ऊंचावलेला आलेख पाहता राहुल गांधीच बेस्ट पर्याय आहेत.

अर्थात जे व्हॉटसप फॉर्वर्ड आणि फेसबूकवरच राजकारणाचे धडे गिरवतात त्यांना हे पटणार नाही.

<< भारताची सत्ता ही पुन्हा कांग्रेस च्या हाती जाणार---- मग पंतप्रधान कोण असेल कांग्रेस चा????? >>
------- लोकसभेत ज्या पक्षाचे बहुमत असेल त्या पक्षाचे खासदार ठरवतील प्रधानपदावर कोणाला बसवायचे.

सुयोग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदारांना शुभेच्छा...

त्यानंतरच्या दोघांना संधी मिळाली ती सोनिया पंप्र होऊ शकत नव्हती म्हणून >> सोनिया गांधी का होऊ शकत नव्हत्या तेही सांगा..

त्यामुळे काँग्रेसचा पंप्र उमेदवार कोण हा प्रश्न गांधी फॅमिली असेतो चर्चिण्यात काहीही अर्थ नाही. >> धाकर्त्यने कोण होईल विचरले आहे. उगा गांधी घरण्याच्या नावाने गळे का काढताय?

रामदेव बाबा
सगळे सकाळी उठुन योगासने आणि कपालभाती करतील.

संपूर्ण राष्ट्र निरोगी बन जायेगा.
आणि केवळ पंतजली एकही ब्राण्ड होगा पुरे भारत वर्ष में
जुते से लेके पगडी तक और सुबह के चायसे लेकर रात को लेने के लिये पेट साफ करने वाले चूर्ण तक!
पतंजली ट्र्क से लेकर पतंजली की पीन तक..

अजून बरेच काही ह्या यादीत समाविष्ट करता येईल बघा....

धाकर्त्यने कोण होईल विचरले आहे. उगा गांधी घरण्याच्या नावाने गळे का काढताय?>>>

धागा नीट वाचा हो. काँग्रेस पार्टी आली तर कोण हा प्रश्न आहे/होता. आता त्यांनी विषय बदलला असेल तर माझे कमेंट डिलीट करते.

सोनिया गांधी जन्माने भारतीय नाही म्हणून पंप्र होऊ शकत नाही हे तेव्हा वाचले होते. नंतर हा अडथळा दूर केला गेला का हे माहीत नाही.

राजकीय घडामोडी पाहता पुन्हा एकदा कांग्रेस विराजमान सध्या ४राज्यात झाली आहे,हे पाहता लवकरच कांग्रेस सत्तेत परतत आहे,हे फक्त राज्यात होत आहे की भारताची सत्ता ही पुन्हा कांग्रेस च्या हाती जाणार---- मग पंतप्रधान कोण असेल कांग्रेस चा?????

हा मूळ विषय आहे.

काँग्रेस मध्ये जोवर गांधी फॅमिली आहे तोवर कुणी दुसरे स्वप्नात तरी पंतप्रधान व्हायचा विचार करू शकते का>>>>>> अगदी!

<< सोनिया गांधी जन्माने भारतीय नाही म्हणून पंप्र होऊ शकत नाही हे तेव्हा वाचले होते >>
------ मी पण असेच वाचले होते... आणि त्या काळी माझा असाच समज झाला होता.

आता वाचलेले खरे असतेच असे नाही म्हणुन क्रॉस रेफरंन्स शोधतो... पडताळणी करतो... आणि मग ठरवतो. पण प्रधान पदासाठी जन्माने भारतीयच असायला हवे असा काही नियम नाही. लोकसभेचा/ राज्यसभेचा कुठलाही सभासद, बहुमत सिद्ध करुन, प्रधान होण्यास पात्र आहे.

सोनिया गांधीनी भारतीय नागरिकत्व घेतले नव्हते म्हणून त्या पंप्र होऊ शकल्या नव्हत्या.त्यांच्या इटालियन नागरिकत्वावर त्यावेळी टीका झाली होती.

भारताचा पुढील ५वर्षांसाठीचा पंतप्रधान कोण होईल?
Submitted by Mi Patil aahe. on 14 December, 2018 - 07:35

२०२४ नंतर हा धागा काढा. २०१४ मध्ये प्रचारादरम्यान मोदींनी जनतेकडे १० वर्षांकरिता राज्य चालवायला मागितले होते. त्यांना मत देणार्‍या बहुसंख्य मतदारांनी (तुम्ही त्यांना भक्त म्हणा किंवा समर्थक किंवा आणखी काही) त्यांचे हे अपील स्वीकारुनच त्यांना मतदान केले होते. ते पुन्हा त्यांनाच मत देतील. राज्यातील विधानसभा निवडणूकीशी यांचा संबंध नाही. १९९५-९९ काळातील शिवसेना भाजप यूतीला महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेत नाकारले होते तरीही त्याच वेळी झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रात भाजप-सेनेला जास्त जागा मिळाल्या होत्या. एक्झिट पोल घेणार्‍यांना दिसून आले होते की मतदान केंद्रात गेलेला मतदार एकाच वेळी राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या उमेदवारांना तर लोकसभेकरिता युतीच्या उमेदवारांना मत देऊन बाहेर पडत आहे.

२००४ साली कलाम यांनी सोनियांना पंतप्रधानपदासाठी बोललण्याची तयारी केली होती. पण सोनियांनीच मनमैहनसिंग यांचे नाव दिले.
त्यांच्या जन्माने भारतीय धसण्याचा मुद्दा कलाम यांच्यासमोर अजिबात नव्हता. ( हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे)
त्या खासदार होत्या म्हणजे नागरिक झाल्या असणारच.
सुब्रमण्यम स्वामींच्या सुरस कथांमुळे लोकांना वाटतं की सोनिया पंतप्रधान होऊ शकत नव्हत्या..
त्यांचा एकेरी उल्लेख लक्षणीय आहे.

मनमोहन सिंग दहा वर्षं पंप्र होते, त्यांना गांधी घराण्याने दत्तक घेतले होते बहुतेक.

@ मानव पृथ्वीकर : प्रणव दा, खरोखर च सुयोग्य व्यक्ति होते, मुळात हुषार, मितभाषी परंतु अत्यन्त शिस्तीचे... आणि म्हणुनच ते कॉन्ग्रेस ला डोइजड
होत होते बहुदा, म्हणुन काँग्रेस ने त्यांना सरळ राष्ट्रपती बनवले... एक्दा इतक्या सर्वोच्च पदावर माणुस बसला कि तो काहि केल्या पुन्हा पं.प्र वगैरे होउ शकत नाहि... थोड्क्यात राजकिय जीवनाचा शेवट Wink काँग्रेस मध्ये काहि व्यक्ती खरोखर अभ्यासु आहेत्/होती, परंतु आपल्या निष्ठा गांधी-नेहरु घराण्याला आणि लाचारी ला वाहायल्या मुळे सगळं मुसळ केरात गेलयं

मोदी कसे आहेत आणि रा.गा. काय आणि किती पाण्यात आहे हा विचार एक वेळ बाजुला ठेउ या.... मुळात प्रोब्लेम हा आहे कि सध्या काँग्रेस कडे एक हि असा चेहेरा नाही जो काँग्रेस ला एकहाती सत्ता मिळवुन देईल. त्या मानाने मोदींचे पारडे जड आहे. मुळात माणुस अभ्यासु आहे, कष्टिक आहे, प्रपंच नसल्याने देशाशिवाय दुसरा विषय डोक्यात नाहिये Wink

२००४ साली राहुल गांधी अ‍ॅक्टीव न्हवते. सोनिया गांधी का नाही झाल्या त्याबद्दल माह्ति नाही.
२०१९ जर कॉग्रेसला २०० च्या वर जागा मिळाल्या तर राहुल गांधी . नायडु आणि जेडीयस मिळुन ३० जागा देतिल .मग बहुमतासाठी बाकीच्या मिळायला त्रास नाही.
१५० जागा मिळाल्या आणि कॉग्रेस नंबर १ चा पक्ष असेल तर १९९०-९१ मध्ये चंद्रशेखर किंवा त्यानंतर देवीगौडा जसे पंतप्रधान झाले तसे कोणीही होउ शकते. अगदी शरद पवार, मायवती, ममता, मुलायम ह्या सगळ्याना समान संधी आहे.
त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर माझा पास.

प्रपंच नसल्याने??

मध्यंतरी गुजरातेत कुठल्यातरी स्त्री वर पाळत ठेवल्याचा प्रपंच चालू होता कोणत्या तरी 'साहेब' साठी.

प्रपंच नसल्याने देशाशिवाय दुसरा विषय डोक्यात नाहिये >>
हे रागांच्या बाबतीत पण सत्य आहे!

आणि मुळात पक्षाचे निवडून आलेले सदस्य (नियमानुसार) / पक्षाध्यक्ष(बर्‍याचदा) ठरवतात.
त्यामुळे कुणीही होऊ शकते..

कमळ नाही फुलले तर अरविंद देखिल होऊ शकतात! Wink

>> हे रागांच्या बाबतीत पण सत्य आहे! << अहो पण त्या बावाजी च्या बेसीक मध्येच लोचा आहे हो Lol

प्रपंच नसल्याने देशाशिवाय दुसरा विषय डोक्यात नाहिये >>

जामच हसायला आले.... मायवतीपण आहेत की .. प्रपंच आहे म्हणून जितके भाजपे आहेत सगळ्यांना कामचुकार घोषित करायला हवे. किंबहुना त्यांना प्रपंच आहे म्हणून मोदींनाच धावुन्धावुन सगळ्या मंत्र्यांची कामे स्वतः करावी लागत आहेत.

प्रपंच नसल्याने देशाशिवाय दुसरा विषय डोक्यात नाहिये>>>>> Lol Lol Lol Lol Lol तरीच बोललो तो सलमान खान बिग बॉसचा शो संपल्यावर प्रत्येक वेळी देश का नाम रोशन करो का बोलत असतो सारखा.

इंदिरा गांधींनंतर राजीव गांधींचीही हत्या झाल्याने अमिताभ बच्चन ने परिवाराला सल्ला दिला की आता बास, पंतप्रधानपद दुसऱ्याला द्या

सोनिया ह्या परदेशी असल्याचे कारण दाखवुन जाणत्या राजांनी निराळा पक्ष काढला व सत्ता जातीय हे बघून त्या परदेशी पाहुण्यांशीच हातमिळवणी करून राज्य देशोधडीला लावून पुन्हा जाती-आधारित मोर्च्यांबाबत प्रक्षोभक विधाने करायला व पुतण्याच्या जिभेवर व सिंचन प्राकरणावर लगाम ठेवता येत नाही हे सांगायला मोकळे झाले

त्यामुळे ते आता कायमचे मांडलिक झाले व ह्यावर उदय ह्यांचे संतुलित व संभ्रमित प्रतिसाद येणार ह्यात वाद नसून त्यांचा प्रतिवाद नाही केला तरी पाच सहा अनियमित व दोन तीन नियमित झमपट त्यावर पोस्टी ओतणार हे नक्की

पुढील पंतप्रधान जर मोदी होऊ शकले नाहीत तर राहुल गांधी होतील आणि ह्या देशाची राहुल गांधी पंतप्रधान असण्याची संपूर्ण योग्यता आहे

ते पंतप्रधान झाले की चिनी राजदूतांना उजळ माथ्याने भेटणे, उजळ माथ्याने वार्षिक पंचावन्न दिवस थाई सुट्टी घेणे, जमावातील स्त्रिया खळ्यांवर भाळून चुंबन घ्यायला धावल्या तरी ढिम्म न हलणे ह्या गोष्टी शक्य होतील व शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी हे प्रश्न चुटकीसरशी सुटतील

विविध महादेव मंदिरांबाहेर रांगा लागतील व ओवेसी परराष्ट्र मंत्री होऊन देशाच्या सर्व सीमा सुरक्षित होतील

-'बेफिकीर'!

>>ओवेसी परराष्ट्र मंत्री होऊन देशाच्या सर्व सीमा सुरक्षित होतील
हे भारी आहे. Proud थोडक्यात राधिका च्या जागी शनाया ला बसवले तर सर्वच प्रश्ण मुळासकट संपतील असे म्हणण्यासारखे. Proud

राहुल पंतप्रधान होण्याच्या शक्यतेनेच इतका तडफडाट होतोय. झाल्यावर मुंडण करून चणे खाऊन जमिनीवर झोपण्यासारखा काहीतरी कार्यक्रम हाती घ्यावा लागेल बहुतेक.

काँग्रेसमुक्तच्या वल्गना करता करता एकदम राहुल गांधींना पंतप्रधानपदी बघू लागलेत भक्त आणि त्यांचा पक्ष. अरेरे! इतक्यात हवा गेली? त्या ५६ इंची फुग्यात हवा कोण भरणार?

राहुल च्या "खळ्यांचा" काल पासून झालेला दुसरा उल्लेख.
माझ्या नेत्याहून तुमचा नेता देखणा दिसतो म्हणून इतकी पोटदुखी?

आता शारीरिक बाबींबद्दल बोलणे सुरू झालेच आहे ,तर न्यूनतम लिमिट काय असावी हे ठरवून टाका, म्हणजे त्यापुढे अडमीन ना हाक मारायला बरे.

विविध महादेव मंदिरांबाहेर रांगा लागतील व ओवेसी परराष्ट्र मंत्री होऊन देशाच्या सर्व सीमा सुरक्षित होतील

या अशा खुदगर्ज वाचाळपणामुळेच ही वेळ आली आहे. असा तोंडाळपणा करण्याची ही मोडस ऑपरेंडी यावेळी फॉर अ चेंज म्हणून उलटली . सतत गळे काढणे . सतत लंब्यागप्पा, सतत शहीदगिरी, सतत मुद्दा सोडून भलतेच व्हर्चुअल काव्यात्म छप्पन इंची बोलणे ..तुमचे लीडर तुम्हाला फक्त यामुळे आवडतात, त्यांनी काहीतरी चांगले केले म्हणून नाही ,, हेच वाईट आहे आणि यासाठीच धोक्याची घंटा वाजली आहे.
तरी बरं अजून फार काही नाही बिघडले .इनमीन ३-४ राज्ये .. त्यातली १-२ कमी फरकाने आणि ओव्हरऑल मतांची टक्केवारी तर टक्करच आहे जवळजवळ ..तरी तुमचे लिव्हर हार्ट ब्रेन सारे एकाच वेळी गंडले .धीर धरण्याची, ,वाट पाहण्याची ,सबुरी ठेवण्याची इच्छा नाही कुवत नाही

मोदेंची बॉडी लँग्वेज काही वर्षांपुर्वी प्रॉमिसिंग वाटलेली असेल जनतेला आणि आता राहुलची वाटली ..दोघांचे गेल्या काही दिवसांतले बोलणे शेजारी शेजारी ठेऊन बघा बघू ... राहुल सुधरला आणि आणखी सुधरेल असे जनतेला वाटले असेल. मोदी आहेत त्याहून आणखी जास्त सुधराणार नाहीत अशी परस्पर खात्री करून घेतलीत का स्वतःची ? साहजिक आहे म्हणा .

ती साठ वर्षे त्यांना त्याकाळच्या करमदरिद्रि जनतेमुळे मिळाली असे एकवेळ समजून चलू.. पण आता या पाचनंतर काय खरे नाही असे का वाटू लागले ????जरा स्वतःला खोलीत कोंडून घेऊन थंड पाण्याचा ग्लास हातात धरून शांत बसून विचार करून बघता का ..एवढी देशाची आणि सीमांची काळजी आहे म्हणून म्हणले //

धोक्याची घंटा वाजतेयच, ज्यांच्यासाठी वाजतेय त्यांना ती त्यांच्यासाठी वाजत होती हे कळायला अजून काही वर्षे जावी लागतील. सुदैवाने मी तेव्हा नसेन. त्यामुळे नो फिकर.

धोक्याची घंटा वाजतेयच, ज्यांच्यासाठी वाजतेय त्यांना ती त्यांच्यासाठी वाजत होती हे कळायला अजून काही वर्षे जावी लागतील. सुदैवाने मी तेव्हा नसेन. त्यामुळे नो फिकर

कशाला काळजी करताय मग? अजून वर्षे गेलीच नाहीत का? केवळ गर्भित सूचक बोलणयाने फोबिया निर्माण करून मन नाही भरले अजून ९० वर्षात? येतेच आहे इस्लामी राजवट अजून तुमची... चांगल्या चांगल्या लोकांच्या मनात विष कालवून आयुष्य खराब करून समाधान मिळाले नाही? आपण आपली पोरे तर परदेशात पळून जातात इथे आगी लावून...

SC finds no irregularities in purchase of Rafale jets,

>>

चितळे मास्तरांच्या धाग्यांवर व्यवस्थित दिसला असता प्रतिसाद. इकडे पुढचा पंप्र कोण ह्याची चर्चा.

काँग्रेस मध्ये जोवर गांधी फॅमिली आहे तोवर कुणी दुसरे स्वप्नात तरी पंतप्रधान व्हायचा विचार करू शकते का
<<
साधना यांचे प्रतिसाद लय भारी आहेत.

ज्या आडवाणी यांचे नांव माजी "भावी पंतप्रधान" म्हणून अजरामर आहे, त्यांचा जन्म भारतात झालेला होता का? की पाकिस्तानात?

बेफि, साधना या भाजप्यांची तद्दन खोटे रेटून बोलायची सवय कधी जाणारे कुणास ठाऊक.

न्यायालयाने 'प्रोसेस फॉलो झाली' म्हटले. भ्रष्टाचार केला की नाही माहित नाही म्हटले. याचा अर्थ क्लीन चिट असा होऊच शकत नाही.

पण जशी मोदीला दंग्यांतून न्यायालयाने क्लीन चिट दिली असे भासवले जाते, तसेच हे ही भासवणे सुरू झालेय ऑलरेडी.

***

सुदैवाने मी तेव्हा नसेन. त्यामुळे नो फिकर.
<<
अरे वा! बर्‍याच सुदैवी आहात की!

<<<थंड पाण्याचा ग्लास>>>
त्यापेक्षा दुसरे एखादे द्रव्य घ्या ग्लासात. बरे वाटेल.
मला तर वाटते प्रियांका चोप्राला पंप्र करा! ती आजकाल फार प्रसिद्ध आहे. शिवाय तिचा नवरा गोरा आहे.
किंवा मग सलमान का कोण तो त्याला.

राहुल गांधी ला करा नि लगेच त्याची ट्रंपशी भेट ठेवा. मग दोघे जे बोलतील ते ऐकून हसून हसून पुरेवाट!

न्यायालयाकडुन क्लीनचीट

>>

२जी वाल्यांना पण क्लीनचीट मिळालाच होता हो. (आता उकरू नये, पण तरीही) २००२ च्या बाबतीत हि साहेबांना क्लीनचीट मिळालाच.

<< प्रपंच नसल्याने देशाशिवाय दुसरा विषय डोक्यात नाहिये>> >>
------- "यांना मोदी कधी समजणारच नाही... " असे कालच मायबोलीवर वाचले आहे आणि ते खरे आहे असे आता वाटायला लागले आहे. Happy

Pages