कूटप्रश्न

आणि तो रडु लागला - परिस्थितीजन्य कोडे

Submitted by मानव पृथ्वीकर on 25 May, 2017 - 15:28

पकोडेच आहे हे. पण फरक असा की यात प्रश्न विचारायचे नाहीत. खाली एक छोटीशी घटना दिली आहे.
त्यावरुन तुम्ही नक्की काय घडले असावे हे ओळखायचे / सांगायचे आहे. उत्तरे अर्थात अनेक असतील. तर आपल्या कल्पनाशक्तीला ताण द्या आणि येऊ द्या तुमची उत्तरे.

खुर्चीत तो वाचनमग्न होता. त्याच वेळी सिगरेट मग्न सुद्धा. वाचता वाचता अधुन मधुन झुरके घेत होता, झुरके घेत अधुन मधुन तो वाचत होता.
मध्येच एका बातमीने त्याचे एकदम लक्ष वेधले. ती वाचून पूर्ण झाल्यावर त्याने झुरका घेण्यास हात पुढे आणला आणि बोटांमधील सिगरेटकडे पाहिले. काही क्षण पहातच राहिला. आणि मग तो रडु लागला.

पकोडे १ (बोगद्यातल्या मृत्यूचे रहस्य)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 12:30

दिगूनाना अन शाम ट्रेनने गावाकडे चालले असतात. मधे एक स्टेशन लागतं, ट्रेन थांबते. दिगूनाना
काहीतरी खायला घेण्यासाठी खाली उतरतात. जवळपास काही मिळत नाही म्हणून त्यांच्या डब्ब्यापासून दूर जातात. थोड्यावेळाने ट्रेन सुरू होते आणि त्यांना नाईलाजाने दुसऱ्या डब्ब्यात बसावं लागतं. इकडे अर्थातच शाम एकटा असतो. थोड्या अंतरावर घाटातला एक बोगदा लागतो. बऱ्यापैकी लांब असलेला हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये ट्रेन असतानाच शाम मरतो.
कसा ? काय घडतं. विचारा प्रश्न आणि सोडवा रहस्य.

ता.क : ते दोघे ट्रेनमध्ये बसल्यापासून ते बोगदा येईपर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना मी सांगितलेल्या आहेत.

परिस्थितीजन्य कोडे (मनातील कथा ओळखा)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 04:12

मायबोलीच्या मित्र मैत्रिणींना नमस्कार.
आज जरा एक हटके चॉलेंज घेऊन आलोय.

माझ्या ५० सुक्ष्मकथा या धाग्यावर मानव पृथ्वीकर सरांनी एक कल्पना मांडली होती. ते म्हणाले होते की Situation Puzzle वर कथेच्या दृष्टीकोनातून एक धागा काढा. तेव्हापासून ही कल्पना डोक्यात आहे. मधे जरा विसर पडला होता. परवादिवशी अक्षयने आठवण करून दिली अन एकदाचा हा धागा काढला.
परिस्थितीजन्य कोडं म्हणजे काय भानगड आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असणारच. सांगतो.

शब्दखुणा: 

कटप्पाने बाहुबलीला का बरे मारले असावे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 April, 2017 - 16:04

कटप्पाने बाहुबलीला का बरे मारले असावे? सैराट झाला होता का तो? का येडं लागलं होत त्याला?

गेले वर्षभर हा प्रश्न सर्वांच्या डोक्यात घोंघावत आहे. उद्याचा शुक्रवार संपता संपता सर्वांना याचे उत्तर मिळाले असेल. भले तुम्ही चित्रपट पाहिला असेल नसेल तरीही, आणि तुमची ईच्छा असो नसो तरीही, व्हॉटसपवर येणारा एखादा मेसेज याचे उत्तर तुम्हाला सांगून जाणारच. आणि वर्षभर जे तर्कवितर्कांचे उधाण आलेले त्याला पुर्णविराम मिळणार....

सद्गुरू आणि स्मोकिंग!

Submitted by अदित्य श्रीपद on 3 April, 2017 - 06:21

(Disclaimer- हा लेख विनोदी, उपहासात्मक, व्यंगात्मक वगैरे वगैरे आहे म्हणजे थोडक्यात यात सांगितलेल्या गोष्टी सिरीयसली मनावर घेणार असाल तर परिणामांना अस्मादिक जबाबदार असणार नाहीत. अस्मादिक ह्याचा अर्थ शब्दकोशात नीट पाहून घ्या. विशेषत: जे लोक शंकर महाराजांचे किंवा अन्य कोणत्याही महाराजांचे निस्सीम वगैरे उपासक आहेत त्यांनी हा लेख वाचू नये किंवा आपल्या जबाबदारीवर वाचवा.)

Deleted

Submitted by .... on 20 January, 2017 - 10:35

.........__--१--------१११--l१------------

Deleted

.........__--१--------१११--l१------------

रिसेलमध्ये घर खरेदी करताना जर बाजारभावापेक्षा कमी किंमतीत घर घेतले तर कोणकोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात?

Submitted by निल्सन on 26 November, 2016 - 05:10

आम्ही एक रिसेलमध्ये फ्लॅट घेत आहोत जो आम्हाला बाजारभावापेक्षा १८ लाखाने कमी किंमतीत मिळत आहे. आमच्या CA चे म्हणणे आहे की जर आम्ही कमी किंमतीत ते घर घेतले तर वरच्या १८ लाखावरसुद्धा आम्हाला ३०% टॅक्स भरावा लागेल. किंवा दुसरा पर्याय असा की अ‍ॅग्रिमेंट व्हॅल्यु संपुर्ण दाखवून (बाजारभावाप्रमाणे) मालकास संपुर्ण पेमेंट करुन वरील रक्कम मालकाकडुन रोख स्वरुपात परत घ्यावी. उदा. आमचा व्यवहार २० लाखाचा तर बाजारभाव ३८ लाख आहे. तर ३८ लाखाचे अ‍ॅग्रीमेंट करुन मालकास १९ लाख बँक लोनने तर उरलेले १९ चेक पेमेंट करावे. त्यानंतर मालकाकडुन रोख रक्कम १८ लाख परत घ्यावे.

इफ्तार पार्ट्यांचं आयोजन करणारे नेतेमंडळी दिवाळी फराळाचं आयोजन करताना का दिसत नाहीत?

Submitted by निखिल झिंगाडे on 31 October, 2016 - 00:57

ते न्हवं आपली एक शंका
.
.
.
.
.
.
स्पर्धा लावून मोठमोठ्या इफ्तार पार्ट्यांचं आयोजन करणारे नेतेमंडळी दिवाळी फराळाचं आयोजन करताना का दिसत नाहीत?

आपणा सर्वांना काय वाटते?
खूप सार्या लोकाना कळत देखील नाही की दिवाळी म्हणजे नेमके काय.....

Pages

Subscribe to RSS - कूटप्रश्न