infinity

Submitted by जव्हेरगंज on 9 September, 2019 - 14:37

त्या पटरीवर अंधाराचे साम्राज्य होते. काळोखी झुडपे भयाण भासत होती. बोचऱ्या थंडीने पाय लटपटत होते. दूरवर कुत्री भुंकत होती. मधूनच एक रानडुक्कर पळालं आणि मी सिगारेट काढली.

सिगारेट! बस एक सिगारेट! सालं पेटवायला माचीस नाही.

चरफडत चालत राहिलो. इथली शांतता किती भयाण आहे. कुण्या एकेकाळी वापरात असलेली आणि जिचा भयानक अपघात झाला असावा अशी वाटणारी एक मालगाडी यार्डात उभी होती. प्लॅटफॉर्मवर एक माणूस दिसेल तर शप्पथ. दिवे मात्र अजूनही जळत होते. लख्ख प्रकाश.

बघितलं तर एक छोटसं स्टेशन पण टापटीप दिसत होतं. मी प्लॅटफॉर्मवर चढलो. एका बाकड्यावर एक मुलगी बसलेली आढळली. पॉश वाटत होती. मोठ्या शहरातली असावी. कानात हेडफोन घालून गाणी ऐकत बसलेली.

"ओ मॅडम.." मी आवाज दिला. पण ढिम्म हलली नाही.

मग मी बराच जवळ गेलो. एक उच्च पर्स तिच्या जवळ होती. विशेष म्हणजे एवढ्या थंडीत तिने जॅकेट घातले नव्हते.
"ओ मॅडम... कुठं जायचंय..?" यावेळी मी जरा जोरातच आवाज दिला.
अचानक तिनं माझ्याकडे बघितलं. "what the hell. कौन है आप?" कानातले हेडफोन काढून तिनं विचारलं.
"क्या चाहिए?"
"कुछ नही बस, आप अकेली यहा नजर आयी. सोचा कुछ प्रॉब्लेम है.." मी एका खांबाला रेलून उभारलो.
"नही तो. मगर आप यहा क्या कर रहे है?" बाकड्याजवळ उभी राहून ती थेट माझ्या डोळ्यात बघत होती.
"सॉरी मै भूल गया मै यहा क्यू आया था.. आप कही जा रही है?"
"हा. रात देड बजे की ट्रेन है.."
"यानी की अभी एक घंटा बाकी है.." मी घड्याळाकडे बघितलं.
"वो तो है.." ती आता सावरली असावी.
"देखा जाए तो, ऐसे सुनसान जगापे अकेले रहना ठिक नही है.. " मी मगाचीच ती सिगारेट बाहेर काढली.

"जानती हू.. मगर क्या करे.." ती खांदे उडवत म्हणाली. थोडीशी हसलीही. असं वाटत होतं ती डोळ्यांनीच बोलत होती. थेट धडक पाहत होती.

"अगर आप चाहे तो मै यहा रूक सकता हू. आपकी ट्रेन जो है.." कळस आहे हा. एवढ्या थंडीत एक गोड मुलगी पुढे आहे. आणि सिगारेट पेटवायचा माचीस नाही.

"नहीं उसकी कोई जरूरत नही. मगर आपके पास अगर वक्त है तो आप रूक सकते है.."

"अगर आप चाहे, तो मै पूरी रात यहा रूक सकता हू..." मी तिच्या नजरेला नजर भिडवत म्हणालो. थेट. धडक.

तेवढ्यात वॉशरूमचा दरवाजा उघडला गेला. रूमालाने तोंड पुसत आतून एक हँडसम वाटावा असा एक तरुण बाहेर आला.
"कुछ प्रॉब्लेम है?" त्यानं तिच्याकडेच बघत विचारलं. तिचे डोळे मात्र थेट माझ्या काळजाला भिडत होते. मी हाताची घडी करून खांबाला रेलून तसाच उभा होतो.

"टिया, क्या वो यहा है?" अतिशय दबक्या आवाजात तो पुटपुटला. तीनं केवळ मान हलवली.
"कहॉ? कहॉ खडा है वो?" आजूबाजूला नजर फेकत तो म्हणाला. एक बोट माझ्याकडे दाखवत ती स्तब्ध हसली.
त्याने भेदक नजरेनं माझ्याकडे पाहिलं. "क्या वो हमे देख रहा है?"
"जी" तिच्या चेहऱ्यावर अजूनही हास्य कायम होते.
"क्या बातचित हुयी तुम्हारी.. कुछ बोल रहा था?"
"बस.. यूही.. जान पहचान थोडा टाईमपास.." किती मनमोकळं बालते ही.
"क्या तुम जानती हो उसे?"
"नही विक्रम. जिंदगीेमे पहली बार इसे देखा है.." कुठेतरी हरवत चालल्यासारखी ती म्हणाली.

"मुझे लगता है अब हमे यहॉसे चलना चाहिए..." तिची पर्स उचलत तो म्हणाला "लेटस ग... लेटस गो.."

दूरवर पसरलेल्या प्लॅटफॉर्मवर ते सरळ चालत निघाले.तिच्या सँडलचा आवाज स्टेशनवर घुमत राहिला. टक ..टक ..... टक.. टक.. "ओ मॅडम... आपकी ट्रेन?" खांबाला रेलूनंच मी म्हणालो. तिनं मागं वळून केवळ एक हास्य दिलं.

पुन्हा एकदा स्टेशन शांत झालं. अवजड बोजड मालगाडीचे डबे अंधारात किती विचित्र दिसतात. तो तरूण, विक्रम का कुणी किती विचित्र होता. त्याला मी दिसतंच नव्हतो. म्हणजे मी काय त्या मुलीलाच फक्त दिसू शकतो? कसं शक्य आहे? कोण आहे मी? तिचा केवळ एक भ्रम?

माझी छाती धडधडू लागली. पाय लटपटायला लागले. थंडी एवढी वाजायला लागली की मेंदू गारठून गेला. मी सिगारेट काढली. एक माचीस! एक माचीस नाही हिला पेटवायला....

"गेली का ती?" मला अगदीच जवळून आवाज आला. मी बघितले. माझी बायको जवळ उभी होती.
"तू इथं कधी आली?"
"मी इथेच आहे. पूर्णवेळ मी इथेच उभी होते. तुझ्या शेजारी.." खांद्यावरची पर्स सावरत ती म्हणाली.
"तू माझा पाठलाग केलास.." मी नापसंती दर्शवत म्हणलो.
"त्याशिवाय इलाज नाही." ती माझ्या समोरंच येऊन उभी राहिली. दबक्या आवाजात डोळे भिडवत म्हणाली. "ती अजून इथेच आहे की गेली?"
ती नक्की कशाबद्दल विचारत होती याची मला पूर्ण कल्पना होती.
"त्या तिथे.. प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकाला गेलीय. तिच्याबरोबर.. एक तरूणपण होता " मी बोट दाखवत म्हणालो.
"बघताहेत का ते आपल्याकडे?" तो तरूण आणि ती मुलगी आता प्लॅटफॉर्मवरून उतरून पटरीवर चालत असल्याचे मला दिसत होते.

"मागे वळून बघितलं तिनं आत्ताच..."

"Don't worry विक्रम. it will be fine. आपल्याला आत्ता निघावं लागेल. लेटस गो. लेटस गो.." ती माझ्या हाताला ओढतंच म्हणाली. आम्ही चालत पोर्चमध्ये आलो.

"ऐक. माझी तुला एक रिक्वेस्ट आहे. मी एक माचीस विकत आणतो. मग आपण लगेच निघूया. सिगारेट न पिल्याने मला खूप विचित्र वाटतंय.."
"अरे इथे कुठे माचीस भेटणार?"
"डोन्ट वरी. आय वील बी राइट बॅक" रूळाच्या त्या बाजूला तरी एखादी पानटपरी असेलंच. मी पटरीवर उडी घेतली.
एक माणूस दिसेल तर शप्पथ. त्या बाजूला एकही दुकान उघडे नव्हते. मालगाडीचे तुटके फुटके डबे मात्र चौफेर पसरले होते. दूरवर थोडासा उजेड दिसत होता. किमान तिथेतरी मिळेल.
"मी तिकडे जाऊन येतो. तू इथेच थांब." मी पटरीवर चालत बायकोला म्हणालो.
"ओके.." प्लॅटफॉर्मवर ती शांतपणे उभी राहून म्हणाली.
मग मात्र मी चालतंच राहिलो. एक दोन वेळा मी मागे वळून पाहिलेसुद्धा. मला उगाचच वाटलं कि ती पाठीमागून येतेय.

त्या पटरीवर अंधाराचे साम्राज्य होते. काळोखी झुडपे भयाण भासत होती. बोचऱ्या थंडीने पाय लटपटत होते.

मी चालतंच गेलो. चालतंच राहिलो. चालून चालून पाय तुटायला आले. हा थेट लोहमार्ग आयुष्याचा सारीपाट बनून गेला आहे.

एक स्टेशन दिसलं .... तुटक्या फुटक्या मालगाडीचं.... स्टेशनवर बसलेली एक मुलगी....कानातले हेडफोन.... लख्ख प्रकाश..... मी खांबाला रेलून विचारलं....."मॅडम"

"what the hell. कौन है आप?"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवा,हल्ली माबो च्या कथा काहीही समजेना झाल्यात,
हाडाळीच्या आशिका ही पण समजून सांग रे बाबा

हाडाळीच्या आशिका ही पण समजून सांग रे बाबा >>> हसू आवरेचना मला!
बाकी भयकथा / रहस्यकथा जे काही आहे ते मस्त लिहिलय.

देवा,हल्ली माबो च्या कथा काहीही समजेना झाल्यात,
हाडाळीच्या आशिका ही पण समजून सांग रे बाबा>≥>>

आमालाबी सांगा. हाडळीच्या आशिकालाच कसा सुगावा लागतो माहीत नाही.

इन्फिनिटी पर्यन्त हे चालु राहनार .>>>>
चालुद्या, आक्षेप घेणारे आम्ही कोण? फक्त हे असे का चालू आहे ते सांगा.

कथेत सगळी भुते असली तरी ती सगळीच एकमेकांना दर्शन देत नाहीत.

मॅट्रिक्स रिवोल्युशन्स मध्ये नीओ असाच त्याचे बॉडीविरहोतत माईंड मॅट्रिक्स मध्ये आणि बॉडी मशीन वर्ल्ड मध्ये राहिल्याने ईंफिनिटी काळासाठी ट्रेनस्टेशनमध्ये अडकून पडतो आणि ट्रिनिटी त्याला सोडवायला येते.

अजून नीट, सलग वाचायला जमली नाही, वाचून विचार करतो.

वेळेच्या मोबिअस लूपचा प्रकार दिसतोय. अशी एक कथा धनजयमध्ये का नवल मध्ये वाचली होती, मस्त!! पण वेळेला लूपमध्ये बांधता येईल का?

अन मेमरी लॉस का होतेय त्याची? फिरून फिरून कम्प्लिट डिसओरिएंट झाला वाटत!!

कथेत सगळी भुते असली तरी ती सगळीच एकमेकांना दर्शन देत नाहीत.>>> अपघाती मालगाडी,ती मुलगी वगैरे वाचून ती भुते असणार असे वाटलेच पण हेच समजले नाही की ती एकमेकांना दिसत का नाहीत?

भारी आहे. आधी मला वाटलं की स्किझोफ्रेनियाची गुंतागुंत आहे. निवेदक मुलीच्या कल्पनेत आहे. मुलगी आणि विक्रम निवेदकाच्या कल्पनेत आहेत. निवेदकाची बायको एकतर खरी आहे किंवा निवेदकाच्या अजून एका वेगळ्या कल्पनाविश्वात आहे. मुलगी आणि निवेदक एकमेकांना दिसतात.

पण नंतर अजून एक कथा आठवली. हस्तलिखित बाड की असंच काही तरी नाव होतं. त्यात असा एक इन्फाइनाइट लूप होता.

ओके, लेट्स टेक अ स्टॅब एट धिस वन.

मला वाटतं हे एका कथालेखकाचे स्मोकिंगचे विड्रॉवल सिम्पटम्स आहेत.

नायक एक कथा किंवा पटकथा लेखक आहे आणि तो चेनस्मोकर सुद्धा आहे. रेल्वे स्टेशनवरचा प्रसंग तो लिहित आहे ज्यात टिया आणि विक्रम आहेत. लख्ख लाईट्स असणे, प्लेटफॉर्मवर लोक नसणे हे एखाद्या सिनेमा सेटसारखे वातावरण वाटते. टिया हे कॅरॅक्टर लेखकाच्या कह्यात आले आहे. म्हणजे ते कसे वागते बोलते त्याचा लेखकाशी संवाद जुळून आला आहे. टियाचे कॅरॅक्टर लेखकाच्या बायकोचे मॉड वर्जन आहे.... जिची खांद्यावरची साधी पर्स बदलून ऊच्च होते,ती ईंग्लिश बोलते, एक गेली की दुसरी येते, लेखजाचा पाठलाग करते वगैरे. पण विक्रमचे कॅरॅक्टर अजून लेखकाच्या कह्यात आलेले नाही.
लेखकाचा, तो लिहित असलेल्या कथे/प्रसंगामागची त्याची प्रेरणा आणि त्याला त्याच्या डोक्यात घडतांना दिसत असलेली अ‍ॅक्चुअल सिनेमॅटिक स्टोरी ह्यात आत बाहेर प्रवास चालू आहे.
आणि जोवर त्याला माचीस मिळून सिगरेट प्यायला मिळत नाही तोवर तो ह्या ईन्फिनिटितच अडकून पडणार आहे. थंडी वाजून येणे, पाय लटपटणे, हॅल्युसनेशन होणे वगैरे कदाचित त्याचे विड्रॉवल सिंप्टम्स आहेत.
बहुधा त्याने सिग्रेट सोडली आहे आणि जवळ माचीस नसणे हे त्याचे टेम्पटेशन टाळ्ण्याचे लक्षण आहे.
माचीस मिळून सिग्रेटचा झुरका घेणे हेच त्याच्या ईन्फिनिटीतून बाहेर येण्याचे दार आहे.

> Submitted by हायझेनबर्ग on 10 September, 2019 - 20:21 > नो स्मोकींग सिनेमात आहे का हे असं? मी बघितला नाहीय.

ही कथा मला समांतर विश्व + इन्फिनिटी लूप वाटली होती?

मी नो-स्मोकिंग सिनेमा पाहिलेला नाही. पण आधी म्हणालो तसे लख्ख, माणसे नसलेल्या ट्रेन स्टेशनमध्ये कायमसाठी अडकणे आणि फिरून फिरून त्यातच येणे हा मॅट्रिक्स मधला 'प्रोग्राम्समध्येही त्यांच्या गोल व्यतीरिक्त ईमोशन्स असू शकतात हे समजावणारा' एक फेमस सीन आहे.

ही कथा मला समांतर विश्व + इन्फिनिटी लूप वाटली होती? >> असू शकते. जव्हेरगंज माझ्यामते कथा समजावण्याच्या वगैरे भानगडीत न पडणारे नसल्याने जशी आपल्याला कळाली त्याच थीममध्ये अजूनाजून डिटेल्स भरत आपणच आपल्या कथेची अंडरस्टँडिंग पूर्ण करत रहायची.

कथाबीज उत्तम, कल्पनाशक्ती उत्तम, पण माझ्या आवडीसाठी ही कथा जड आणि एकूणच ठीक ठीक.
पण नेहमी मात्र या लेखकाचं लिखाण आवडतं. Happy

> मी नो-स्मोकिंग सिनेमा पाहिलेला नाही. पण आधी म्हणालो तसे लख्ख, माणसे नसलेल्या ट्रेन स्टेशनमध्ये कायमसाठी अडकणे आणि फिरून फिरून त्यातच येणे हा मॅट्रिक्स मधला 'प्रोग्राम्समध्येही त्यांच्या गोल व्यतीरिक्त ईमोशन्स असू शकतात हे समजावणारा' एक फेमस सीन आहे. > अच्छा. मी मॅट्रिक्स पाहिला नाही.

> जव्हेरगंज माझ्यामते कथा समजावण्याच्या वगैरे भानगडीत न पडणारे नसल्याने जशी आपल्याला कळाली त्याच थीममध्ये अजूनाजून डिटेल्स भरत आपणच आपल्या कथेची अंडरस्टँडिंग पूर्ण करत रहायची. > खरंय Happy