संमोहन शास्त्र (विज्ञान) आहे काय ? याबाबतीत अनेक उलट सुलट दावे आहेत. काही प्रतिष्ठीत व्यक्तींकडून संमोहन हे विज्ञान आहे असे म्हटले गेलेले आहे. असे असेल तर त्याची व्याप्ती काय, मर्यादा काय आहेत, वैज्ञानिक सिद्धता व तत्त्व या संबंधात इथे चर्चा करावी ही विनंती.

भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन ह्याच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग पुढे देतो. ह्या प्रसंगाच्या अनुषंगाने आलेल्या कोड्याची मजा आपण ह्या लेखात घेऊ.
मायबोलीकडे टाईममशीन आहे हे आता वैद्यकीय , राजकीय आणि आत्मचक्रीय शास्त्रीय पुराव्याने सिद्ध झाले आहे. तज्ञांनीही ते मान्य केले आहेच.
हिम्मत असेल तर माझा पुरावा कसा चुकीचा आहे सिद्ध करून दाखवाच.
"प्रेम"
♥ !!
.
प्रेम एक वृत्ती आहे
निसर्गदत्त कृती आहे
मनुष्याचा स्वभाव आहे..
प्रेम हाच सोहंभाव आहे !
देशही दुभंगले ह्या प्रेमापोटी
धर्म पंथाची होती अटाटी
प्रेमें उभारले महाल ते किती
आणि कित्येक मनोऱ्यांची झाली माती
जीव अनेक उपजले प्रेमासाठी
आशेचे किरण वार्धक्याची काठी
काळ लोटला, ओसरले रे संचित
प्रेमासाठी बदलले येथे प्रेमाचे गणित
प्रश्न मांडला सत्यासाठी
शोध रचिला मनाकाठी
प्रेम नक्की आहे काय ?
अनाहूत दिसे हां उपाय
त्या आतल्या द्युतीला
पाहू कसे? न कळते
-जी सर्वव्यापी ऐसे
स्थलकाल भरुनी उरते
चक्षूस ना दिसे ती
पाळी न नियम कोते
क्षणमात्र लुप्त होते
क्षणि झगमगून उठते
ही तीच का मिती, जी-
-स्पर्शात रंग भरते
-ध्वनितून नव-रसांना
उधळीत गंध होते
खुणावतील तुला जटिल गणिते-
विश्वाच्या महास्फोटी प्रसववेणांची
हाकारतील तुला कोडी-
* विस्कळखाईत क्षणोकणी होणार्या
विश्वाच्या अटळ अंताची#
या अपार भूतभविष्यादरम्यान
लीलया झेपावणारा तुझ्या प्रज्ञेचा झोका
कुठे खिळवलाय, हे सव्यसाची?
तो इथेय बघ,
निळ्या पाखरपंखावर
अथक थिरकणार्या
क्षणभंगूर वर्तमानात
(*entropic end of the universe#)
खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग

काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.