मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.
नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी
झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.
हे लक्षात ठेवा -
शकुंतला देवींवर काही दिवसांपूर्वी चित्रपट आला. त्यावर चर्चाही झाली. त्यात त्यांच्या जादूवर कमी भर आणि कौटुंबिक गोष्टींवर जास्त वेळ दिल्याने काही लोक जरा खट्टूही झाले असतील. 'त्यांनी हे कसं बरं केलं असेल?' अश्यासारखी विचारणा मायबोलीवरही झाली. त्यांनी स्वतः ते काही कुठं फार लिहून ठेवलेलं नाही. त्यांच्या १-२ युक्त्यांबद्दल त्यांनी लिहिलं आहे. त्यांची एक मोठी जादू कशी केली असेल, असा प्रश्न मलाही पडला. त्याची उकल करण्याचा हा एक फावल्या वेळातला प्रयत्न आहे. थोडीशी मजा म्हणून.
नव्हते जेव्हा पाहत कुणिही ...
रडलो होतो
झगमगताना पायतळीच्या अंधारी...
तगमगलो होतो
बेमालुमसा प्रतिमेमागे...
दडलो होतो
उजेड नाकारून अंधारा...
भिडलो होतो
श्रेयस प्रेयस तुंबळात..
सापडलो होतो
रुजताना उन्मळलो...
आतून किडलो होतो?
का कुणास ठाऊक पण नभ दाटून आले होते आणि
वारा तुफान वहात होता.
आभाळाच्या छताखाली एक कागद उंचच उंच उडत होता.
मी त्याच्याकडे बराच वेळ पाहत बसलो. मग शेवटी कंटाळलो.
नंतर बऱ्याच वेळाने पुन्हा बाहेर आलो. एक कुत्र्याचं लहानसं पिल्लू रस्त्यावर मनसोक्त बागडत होतो. मी बराच वेळ पाहत बसलो. पण शेवटी कंटाळलो.
तसा फारसा वेळही जात नव्हता. आणि मी आळसावलो होतो.
गेल्या दोन दिवसांत काहीच न लिहीता आल्याने पुरता वैतागलो होतो.
#दिग्याच्या_लेखणीतून
दि. २६.०३.२०२०
Self Quarantine Day ६
खालील कोडे सोडवता आले तर पहा:
एकाएकी कुठून कैशी
कल्लोळातुन उमटे ऐशी
हीन स्वरांची शुभ्र रेष ती
अजाणत्या त्या विहरी वेली
क्षत्रपतीच्या कुरणावरुनी
रविकुहरातील बनुनी छाया
सरसावुनी मग येई रावा
मरुभूमीकणघृत रगडाया
जराजीर्ण त्या जरासंध-सम
लचके समस्त एकवटाया
नाद जोडुनी प्रतिपदमात्रे आरंभीचा
ही कविता मग अधर दिशेने बोधे वाचा
(२०१० मध्ये इतरत्र प्रकाशित)
धर्म इथे बेताल झाला
उठतासुटता जहाल झाला
वापरले कैक रंग त्याने
कोथळा बाहेर येताना मात्र लालच झाला ...
किती चढले सुळावर त्याच्यानावे ,
मारणारे गनीम आणि मरणारेही ..........
पाळणारे , जाळणारे , बघणारे अन भडकवणारे
पण .........जो तो हलाल झाला
जन्नत नसीब झाली कुणा
तर कुणी स्वर्गात पोहोचले
अरे पण त्यांचे काय झाले असेल ?
ज्यांच्या जाण्याने , उभे घर पोळले
अपराध कुणाचा , कुणी भोगला
कामकऱ्याला जागेवरी ठोकला
मर्दुमकीचा झेंडा मिरवुनी
हिरवा भगवा पुढे नाचला
हिजडे हरामी धर्मवेडे
सतत व्हाट्सप/फेसबुकवर कुणाचे तरी मेसेज यावेत, फेसबुकवर आपल्या पोस्टला रिप्लाय यावेत, लाईक यावेत असे वाटत असते. सातत्त्याने व्हाट्सप फेसबुकवर चेक करणे सुरु असते. फेसबुकवर दोन तीन अकौंट ओपन केली आहेत. वेगवेगळे टाईमपास ग्रुप्स जोईन केलेत. एक झाले कि दुसरे अकौंट लोगिन करतो. कुठे कुठे पोस्टी टाकतो. सगळे झाले कि व्हाट्सअप बघतो. मग पुन्हा फेसबुक. मग अधूनमधून मायबोली. तोवर पंधरा वीस मिनटे जातातच. कि मग पुन्हा फेसबुक .... असे चक्र सुरु आहे. धड पंधरा मिनटेसुद्धा फोन पासून दूर राहता येत नाही. अगदी ठरवून राहिलोच जास्त वेळ बाजूला तर बेचैनी वाढते. कश्यातच लक्ष लागत नाही. मग डोके दुखायला लागते.