काव्यलेखन

का शुन्यही उरेना. ( मतलाबंद गजल )

Submitted by निशिकांत on 16 August, 2020 - 13:32

केले तुला वजा तर, का शुन्यही उरेना?
हातात हात नसता पाऊल चालवेना

झाली लिहून सारी, मतला मला सुचेना
गजलेस पूर्ण करण्या जमल्यास तूच येना !

पाहून वाट थकलो फुलता कळी फुलेना
निर्माल्य व्हावयाचा शोकांत तिज रुचेना

हरली प्रकाश किरणे अंधार पेलवेना
आश्चर्य गर्भगृहिचा का दीप पाजळेना

पाहून खूप गर्दी देवासही कळेना
भरतात दानपेट्या, पण भक्त का दिसेना?

मी गुंतलो न मोही मुक्ती तरी मिळेना
पिंडास आज माझ्या का कावळा शिवेना ?

रेखीव मस्त बांधा हे स्वप्न सोडवेना
निष्ठूर माय पान्हा बाळास पाजवेना

लॉकडाउन इफेक्ट

Submitted by Mangesh Pandav on 16 August, 2020 - 11:41

नुकतीच सुचलेली एक कविता व्हाट्सअप स्टेटस ला ठेऊन (त्याच्याशिवाय तुम्ही कवी आहात असं लोक आता मानत नाहीत) मी माझ्या कामात व्यस्त झालो. थोड्या वेळाने मोबाइल स्क्रीन वर  माझी नजर गेली तेव्हा नोटीफीकेशन मधे मेसेज होता "मला माहित न्हवत तू इतकं छान लिहितोस" माणुस कौतुकाने हुरळून जातो(आणि त्यातली त्यात जर ते एखाद्या मुलीने केल असेल तर विचारायलाच नको). हातातलं काम खाली टाकुन मी मेसेज कुणाचा आहे ते पाहील तर ती माझी शाळेतली मैत्रीण होती आणि आज पहिल्यांदाच ईतक्या वर्षाने तिने मला मेसेज केला होता.

शब्दखुणा: 

आईसाठी काही

Submitted by Mangesh Pandav on 16 August, 2020 - 11:34

आज लिहावं म्हणतोय तिच्याविषयी काही,
नवलच ये कारण असं वाटलं न्हवतं याच्या आधी काही,
लिहिण्याआधी वाटलं होतं किती लिहिल आणि किती नाही,
लिहिताना मात्र प्रश्न पडला काय लिहु आणि काय नाही,
किती राबते ती आमच्यासाठी हे लिहू की
किती जिव आहे तिचा आमच्यावर हे लिहू,
तिची प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी हे लिहू की
तिच अस्तित्त्वच हरवलीये ती आमच्यात हे लिहू,
छोट्या छोट्या गोष्टीत तिचं सुख मानन लिहू
की संकटांना सामोर जाताना तिचं खंबीर होन लिहू,
आज लिहावं म्हणतोय तिच्याविषयी काही,
'आई'च लिहू शकलो फक्त.. पुढे पेन उचललाच नाही..

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

अपराधी

Submitted by Santosh zond on 16 August, 2020 - 08:58

अपराधी
तुला तर जग जिंकायच होत ना
मग का मध्येच तु स्वतःशीच हरलास
लढायच होत तुला अन्यायाविरुद्ध
पण आपलेच विरोधी बघुन तु थांबला
जणु काही समाज नावाच्या हत्तीचा पाय
आपल्याच पिल्यावर पडला .....
अरे 'जगाच्या खुर्चीचे चार पायही तुला
क्षणभर नाही सांभाळू शकले आणि
तु ,तु त्यांना वाचवायला निघाला जे
स्वतःस्वतंत्र,हींमतवान असुन मदतीची अपेक्षा करतात.....
शेवटी तु कितीही प्रयत्न केले, कितीही लढलास,कितीही संघर्ष केला आणि भुकेल्यांशी तहानलेल्यांशी कितीही दया दाखवलीस तरीही तुला ते फक्त अपराधीच म्हणतील,हो अपराधी.......

शब्दखुणा: 

मनाची व्यथा ४

Submitted by अरविंद डोंगरे on 16 August, 2020 - 08:39

तुझ्या आठवणीच्या पावसात भिजताना
मन माझं प्रफुल्लित होते ।
जसं जीवनाचं सारं रहस्य
तुझ्यात बंदिस्त असावं।
तुझी आठवण प्रत्येक छणी
नवीन अनुभूती देते ।
जसं हृदय माझं तुझ्या प्रितीत
चिंब भिजलं असावं।
तुझ्या आठवणींची सरिता बघ ना
किती ओसंडून वाहते ।
जसं त्या एका दिवसात मी
संपूर्ण आयुष्य जगलं असावं।
वाहणाऱ्या सरितेचं जिवन जसं
निर्मळ आणि पवित्र असते
तसच माझं प्रेम ही मी

शब्दखुणा: 

हो ना

Submitted by रोहितकुलकर्णी on 16 August, 2020 - 07:56

आषाढघनासम पाणी हो ना
तू भक्ताची वारी हो ना

कणाकणातुन जन्म मिळावा
आयुष्या तू माती हो ना

माझ्यासाठी माझ्यानंतर
पुन्हा एकदा माझी हो ना

मला किती कविता सुचलेल्या
सफेद कोरी पाटी हो ना

जाण्यापूर्वी वळून बघ तू
वळणावरची झाडी हो ना

नशा तुझ्या श्वासांची इतकी
जळणारी उदबत्ती हो ना

चालून चालून थकला आहे
अवघडलेली मांडी हो ना

किती पांढरे चांदण शिंपण
चंद्रकलांची व्याधी हो ना

मी बघताना चोरून तुजला
थोडी लाल गुलाबी हो ना

वादळ आहे नदीमध्ये जे
ते भिडताना होडी हो ना

देवाचे कळत नाही

Submitted by अविनाश राजे on 16 August, 2020 - 07:11

देवाचे कळत नाही चालले आहे काय
इथे मात्र कशात काय अन फाटक्यात पाय

दवाचे थेंब आणि चंद्र-तारे , इंद्रधनू
भुकेल्या पोटी भरदुपारी कामाचे काय

चल करून टाकू एखादा सत्यनारायण
लागणार नाही म्हणजे गरीबाची हाय

इथे कोण कोणासाठी काय करतो वेड्या
असे चाललेले सारेच तर स्वान्त: सुखाय

घराचा तो रेखतो आराखडा घामाने
रक्तरंग भरते त्यात त्याच्या मुलांची माय

उत्सव

Submitted by दिलफ on 16 August, 2020 - 06:15

बोटात जेव्हा येते तान्हे तुझे बोट
भान हरपते सारे मृदुल तुझा स्पर्श
व्यर्थ झाली मनातील अनेक ती द्वंद्व
अर्थहीन ते सारे अहंकार आणि गर्व

निरागस त्या हास्याने मोहून मी जातो
क्लेश सगळे तनाचे विसरून मग जातो
त्रास जीवनातील सुसह्य चांगले ते बघतो
क्षणात एकाच मी नैराश्य झटकून टाकतो

आशेवर, अनुकंपेवर जे चांगले त्या साऱ्यावर
परत एकदा विश्वास वाटतो करावा त्यावर
पुन्हा मग माणुसकीचा अभिमान मला वाटतो
माणूस मी असण्याचा साजरा उत्सव करतो

दिलीप फडके

शब्दखुणा: 

पखरण

Submitted by द्वैत on 16 August, 2020 - 03:13

पखरण

घाटाच्या वळणावरती
पाऊस असावा सोबत
झाडांची हिरवी गाणी
रस्त्याच्या हृदयी रुजवत

एक शुभ्र झरा उतरावा
घाटाच्या माथ्यावरूनी
नितळावी हिरवी राई
ह्या कडेकपारीमधुनी

झाडांनी ओढून घ्यावी
रेशीम धुक्याची चादर
गाईंच्या कळपामधूनी
बघ कृष्णसख्याचा वावर

गगनात अचानक यावा
पक्ष्यांचा दीर्घ थवा मग
सळसळ पानांची व्हावी
व्याकूळ जीवाची तगमग

कोवळ्या उन्हाच्या खाली
झाडांचा रंग खुलावा
हिरव्या पिवळ्या मातीचा
मृदगंध नभाशी जावा

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन