आता आकाश जांभळे

Submitted by निखिल मोडक on 19 July, 2023 - 14:17

आता आकाश जांभळे, दिस होतील सावळे
पानोपानी जीवनाचे, पुन्हा येतील उमाळे

आता साचतील तळी, पाणी झरेल ओहळी
शुभ्र कागदाची नाव त्यात सोडतील बाळे

चुडा सजेल हिरवा, ऋतू बहरेल नवा
नव्या काकणाचा नाद, साऱ्या देही सळसळे

काही झुरतील जीव, काही मिलना आतुर
आता उभरत्या वया, नव नवल डोहळे

©निखिल मोडक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदरच.

बालपण-तारुण्य झाले. आता वृद्धांचीही दखल घ्यावी म्हणुन -

काही जुनी खोडे आता, पुन्हा उभारी घेतील
नव्या पोपटफुटीने मनी आशा पालवेल

_/\_

अतिशय सुंदर! कविता आवडली.

वरचं सामो यांचं कडवंही छान आहे. विशेषतः त्यातला 'पोपटफुटी' हा शब्द आवडला.