काव्यलेखन

बनाव...

Submitted by Girish Kulkarni on 4 March, 2013 - 09:40

**************************************
**************************************

खेळलो-दमलो-सांडलो, बेमालुम तुझे डांव झाले
शिकार झाली मनाजोगी तुझेही केव्हढे नांव झाले

केव्हढी सफाई तुझ्या शस्त्रात होती आयुष्या
नको तेंव्हाच सारे....निकराचे घांव झाले

कुठे कसे पोचलो शोधीत सुवास फुलांचे..कळेना
अवघडल्या श्रद्धांनी थांबलो जेथे तेच गांव झाले

आणा-भाका-फसगतीची चर्चा आता कशाला
उजाड-उनाड क्षणांचे नटरंगी बनाव झाले

किती बेमालुम तुझी सुरावट बदलून गेली
चिरडून दाद जेंव्हा मैफीलीत उठाव झाले

तुझ्यासाठी.....

Submitted by Trushna on 4 March, 2013 - 09:07

crying girl_0.jpg
आयुष्यातला प्रत्येक क्षण तुझ्या सोबत चालत होते
आणि आज नजरे आड होताना तुलाच मी पहात होते
भावनांचा कल्लोळ मनातून वाहत होता
वेदनांचे वादळ क्षण-क्षण सहन करत होते
भरभरून दिलास तू अन तूच रिक्त केलस
सुख देता देता आज दुखाही तूच दिलस
डोळ्यातले पाणी माझ्या ओंजळीत घेत होते

शब्दखुणा: 

असावे असे असे

Submitted by तनवीर सिद्दीकी on 4 March, 2013 - 05:09

आक्रोश, किंकाळ्या पेपरात नाहीत ?
थांबा, ' लिहीणारा' लिहीत असावा

मतदाराच्या हातावर शाईच नाही !!
नक्कीच हात त्याचा 'दहीत' असावा

यावेळी आंदोलनाला येत नाहीये तो ?
(मागच्या निर्णयाच्या 'सही'त असावा)

का शोधायचा शेतकरी निकालदिनी ?
दाखला तर कचेरीच्याही वहीत असावा

रोज तीच तीच इज्जतीची माय ताई
या शहरांत हा उपक्रम विहीत असावा

अरेरे !! त्यांना पुन्हा मुलगीच झाली ?
परत पाळणाही बारसा रहीत असावा

आजही कोणीतरी भररस्त्यात मेला ना ?
मग सुट्टीचा अर्ज 'बंद' सहीत असावा !!

सर्व भिकारी आता देवस्थळीच बसतात
त्यांना मध्यमवर्गी खिसा गहीत असावा

तुझ्या भूतकाळाशी असती तुझे बांधले धागे..

Submitted by रसप on 4 March, 2013 - 04:52

किती धावलो तरी सावली येते मागे-मागे
तुझ्या भूतकाळाशी असती तुझे बांधले धागे

मेहनतीच्या पैश्यासाठी कुणी न झिजतो आता
चोर झोपतो निवांत रात्री धनी बिचारे जागे

विठ्ठलदर्शन घेण्यासाठी अनवाणी मी गेलो
तिथे पाहिले रखुमाईशी तोही फटकुन वागे !

'गजानना*ने कधी फुंकली चिलीम होती' कळता
श्रद्धा-भक्ती चुलीत जाते, व्यसन तेव्हढे लागे

खोऱ्याने ओढावा पैसा तरी पुरे ना पडतो
आणि कुणाचे भिक्षा मागूनही व्यवस्थित भागे !

….रसप....
४ मार्च २०१३

*गजानन महाराज - शेगांव

जादू हवीहवीशी..

Submitted by पुरंदरे शशांक on 4 March, 2013 - 00:54

जादू हवीहवीशी..

परीराणी नाजुकशी
हातात छडी जादूची

मुकुट छान सोनेरी
गालावरती गोड खळी

छडी लावे झाडाला
"जेम्स"चा पाऊस आला

छडी फिरे वरती खाली
रंगीत फुगे भोवताली

सोनू झाली चकित फार
आईस्क्रीम हवे गारेगार

उडता येईल का मला
ढगांवरुन भटकायला

छडी फिरली भराभर
सोनू उडते हवेत वर

वॉव, कस्ली मज्जाए
जादू तुझी भारीए

हे काय गार गार गालावर
आईस्क्रीम इथे सांडले तर

आई म्हणते सोनाला
उठा उठा लौकर बाळा

हात अस्सा गालावर
अज्जून जर्रा ठेवतर

किती हा पसारा !

Submitted by निशिकांत on 4 March, 2013 - 00:18

तुझ्या आठवांचा किती हा पसारा !
पसारा जरी, तोच माझा उबारा

नको हाक देऊस इतक्या उशीरा
मनातील तुटल्यात केंव्हाच तारा

त्सुनामीत बेजार मी भावनांच्या
मनी आस नुरली मिळावा किनारा

पुन्हा प्रेम करणे मला शक्य नाही
कशाला विषाची परिक्षा दुबारा ?

किती चेहरे मख्ख शेजारच्यांचे !
कुणाचाच नव्हता मिळाला सहारा

असा लिप्त मी आज दु:खात आहे !
जुना दाह वाटे सुखाचा नजारा

मनुष्यात फोफावला स्वार्थ इतका
कुणीही कुणाचाच नसतो दुलारा

भरायास खळगी किती राबलो मी
तुझा जीवना हाच रे गोषवारा

लिहावेस "निशिकांत" तू भाग्य अपुले
स्वतःला समजतोस तू का बिचारा ?

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

कळतनकळत......

Submitted by Trushna on 3 March, 2013 - 23:50

images (2).jpg

कळतनकळत कधी झाली ओळख ते कळले नाही
कळतनकळत कसे जुळले सूर ते कळले नाही
कळतनकळत कधी धरती भेटली आकाशाला ते कळले नाही
कळतनकळत कधी नदी मिळाली सागराला ते कळले नाही
कळतनकळत कधी जुळले ऋणानुबंध कळले नाही
कळतनकळत कधी जुळली प्रेमाची नाती कळले नाही
कळतनकळत कधी स्वतास हरवून बसले कळले नाही

शब्दखुणा: 

'पराभूत'

Submitted by अमेय२८०८०७ on 3 March, 2013 - 22:29

पोटासाठी शस्त्रे पेलून जीवन अवघे पणास लावत
गोठून जिगिषा बधीर डोळे मृत्युसंगे संगर खेळत
पराभूत सैन्याचा सैनिक समरी पडतो धारातीर्थी
नाही सरण - नसते वंदन, नश्वर कोळ शवांचे उरती
जखमांची विवरे खोल, विखार थिजतो, मिटती गात्रे
कसले हौतात्म्याचे मोल, देहा लुचती कोल्हे - कुत्रे
जन्मोत्सवी जे हसले त्याच्या, आप्तसोयरे दूर राहती
जिवास जात्या निरोप नाही, मरणवृत्त ना कोणा कळती
साकळलेला रक्तथेंबचि भाळावरती लावी विभूती
रक्तचि झाले गंगौदकही, रक्तचंदनी देहाभवती
मृत्युश्लोक नशिबी नाही, किरवंतांचे आन्हिक नाही

तगमग

Submitted by पुरंदरे शशांक on 3 March, 2013 - 22:12

तगमग

देणे पावसाचे कसे
वेडे ओलावले मन
पान पान आठवांचे
गेले पार बिथरून

मेघ गर्जती बाहेर,
आत विजेचा थरार
वारा फोफावला स्वैर,
उर धपापला पार

पडे पाऊस जोरात,
आत उसळे आकांत
झाकोळले सारे काही,
मन काळोखी नहात

पडे पाऊस पाऊस
जरा शांत स्थिरावला
थेंब थेंब रुते आत,
डोह पुरा डहुळला........

शब्दखुणा: 

वाळवंटतला दुष्काळ

Submitted by विजय जोशी on 3 March, 2013 - 19:36

।। वाळवंटतला दुष्काळ ।।

उन्हाळ्याचा कहर झालाय
उष्णतेचा पारा वाढलाय
विहिरी, तलाव सुद्धा तहानल्या
सर्व परिसर भकास झालाय
जणू काही वाळवंटातच दुष्काळ पडलाय ।।

गाई-गुरांचा पान्हा आटलाय
जमिनीलाही भेगा पडल्यात
शिवारातल्या झाडांनी माना टाकल्यात
निसर्गाचाच कोप झालाय
जणू काही वाळवंटातच दुष्काळ पडलाय ।।

कमिशन शिवाय काम नाही
माणुसकीचा लवलेश नाही
नात्यातलं अंतर वाढत चाललाय
मायेचा ओलावा केव्हाचा संपलाय
जणू काही वाळवंटातच दुष्काळ पडलाय ।।

वस्तूंचे भाव गगनाला भिडले
महागाईचे चटके बसू लागले
जमा-खर्चाचे गणित बिघडले
त्यातच अधिक महिना आलाय

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन