तगमग

तगमग

Submitted by बेफ़िकीर on 14 August, 2013 - 08:53

एका टेकडीवरच्या रानात जायचं आहे. तिथे एक बाई असते, तिला भेटायचं आहे. ती साठ भूमिका जगते. तिला स्वतःला धरून एकसष्ट! मी बासष्टावा! त्या साठ भूमिका लिहायच्या आहेत. टेकडीला पायर्‍या नाहीच आहेत. पण टेकडी चढायला वाटही नाही आहे.

भूमिकांचं काही एवढं नाही. लिहिण्याचंही काही एवढं नाही. टेकडीच्या वर पोहोचण्याचंही काही एवढं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मार्ग निघू शकतोच.

पण अवघड वाटते ते हे, की हे मी करू शकणार आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

तगमग

Submitted by पुरंदरे शशांक on 3 March, 2013 - 22:12

तगमग

देणे पावसाचे कसे
वेडे ओलावले मन
पान पान आठवांचे
गेले पार बिथरून

मेघ गर्जती बाहेर,
आत विजेचा थरार
वारा फोफावला स्वैर,
उर धपापला पार

पडे पाऊस जोरात,
आत उसळे आकांत
झाकोळले सारे काही,
मन काळोखी नहात

पडे पाऊस पाऊस
जरा शांत स्थिरावला
थेंब थेंब रुते आत,
डोह पुरा डहुळला........

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - तगमग