$मन माझे$....

मन

Submitted by सदा_भाऊ on 25 August, 2018 - 10:26

चंचल चिंतीत साशंक
मुढ भयस्थ लाचार
सतत भ्रमित विचार
अशांत मन विकार

उद्विग्न घायाळ बेफाम
कोमल भावुक बेभान
अतृप्त उत्छृंकल रौद्र
अस्थिर मन क्रौर्य

विकृत विक्षीप्त विचित्र
भयंकर कुटील संत्रस्त
अगम्य द्विधा उथळ
दुर्बल मन सकळ

दयाळू शांत विनोदी
अलिप्त धैर्य कर्मीक
उत्सुक सखोल विचार
सशक्त मन सुंदर

शब्दखुणा: 

आपुलाची वाद आपणासी

Submitted by किल्ली on 5 June, 2018 - 08:41

"हाय! कसा आहेस?"
"हाय! मी मस्त, तू?"
"मी पण मजेत. बऱ्याच दिवसांनी चक्कर मारली इकडे? आज मुक्काम आहे की नेहमीप्रमाणे उडती भेट?"
"आहे थोडा वेळ. काय करणार, वेळच मिळत नाही हल्ली. मलाही इथे राहण्याची इच्छा होते गं! इथल्या शांत वातावरणात रममाण होण्यासारखं सुख नाही. ही जागा घाई, गडबड, गर्दी, व्याप ह्या सगळ्यापासून मुक्त आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वीकएंड आणि वीकडेच्या चक्रात आयुष्य फिरतंय, बाकी काही खास होत नाही बघ. वीकेंड आला की मुठीत पकडलेल्या वाळूप्रमाणे निसटून जातो आणि वीकडेझ सरता सरत नाहीत."

विषय: 
शब्दखुणा: 

क़्युबेक सिटी & मोन्टरीयल ( The City Of Heritage Buildings & Castles ) Canada.....:)

Submitted by Trushna on 12 August, 2013 - 23:32

क़्युबेक सिटी आणि मोन्टरीयल खूप सुंदर ठिकाण आहे फिरण्यासाठी असे बऱ्याच जणांकडून (कॅनेडियन मैत्रिणीन कडून ) ऐकल होत. लॉंग विकेंड असल्यामुळे आमचाही बेत ठरला मग क्युबेक मोन्टरियल जाण्याचा. ३ दिवस मस्त फिरायचं म्हणून मीही खूप एक्सैटेड होते आम्ही दोघे मी आणि माझे अहो व त्यांचे ऑफिसमेट असे आमचा ७ जनांचा ग्रुप ठरला दूरचा पल्ला असल्या कारणाने रेन्टने कार आणण्याचे ठरले शनिवारी सकाळी ते (माझे अहो ) व त्यांचा मित्र रेन्टने मस्त रेड डज (Charger ) व ब्ल्याक इम्पाला कार घेऊन आले आणि आमची जर्नी सुरु झाली ५ तासाचा पल्ला गाठून आम्ही क़्युबेक सिटीत पोचलो हॉटेलवर ब्याग्ज ठेवून क़ुएबेक फिरायला निघालो.

शब्दखुणा: 

पेरियार वाईल्ड लाईफ सान्चुरी ( केरला )

Submitted by Trushna on 31 July, 2013 - 11:38

पेरियार वाईल्ड लाईफ सान्चुरीचा प्रवास सुरु झाला तो जलसुंदरी नावाच्या बोटीने सर्वच खूप मस्त वाटत होत दूरवर पसरलेले निसर्गरम्य डोंगर जिकडे नजर पडेल तिकडे हिरवा शालू पांघरलेली धरती अनी तिज रूप आणखीन खुलवणार निळसर हिरवगार पाणी आणी या मनमोहक वातावरणात त्याचा मनसोक्त आनंद लुटणारे प्राणी व पक्षी हे सार कॅमेऱ्यात कैद करण्यास मी सुरवात केली.
आमचा प्रवास जलसुंदरीतून सुरु झाला सर्वच कुठे एखादा प्राणी पक्षी दिसेल म्हणून सर्वत्र नजर फिरवत होते तोच थोड्या अंतरावर गेल्यावर हरणांचा एक कळप चरताना आम्हाला दिसला त्याने साऱ्यांच्याच नजरा वेधल्या आणी आमच्या वाईल्ड लाईफ सफारीला खरी सुरवात झाली.

शब्दखुणा: 

खरच तुझा खूप त्रास होतो

Submitted by Trushna on 31 July, 2013 - 00:54

खरच तुझा खूप त्रास होतो
केव्हाही कुठेही फक्त तुझा भास होतो
तू जवळ असतोस तेव्हा
सर जग माझ्या मुठीत असत
पण तू नसताना मात्र
सार काही भकास भासत
म्हणून खरच तुझा खूप त्रास होतो
केव्हाही कुठेही फक्त तुझा भास होतो
तुझे शब्द न शब्द मनावर प्रेमाची फुंकर घालतात
पण तू नसताना मात्र ते खूप छळतात
म्हणून खरच तुझा खूप त्रास होतो
केव्हाही कुठेही फक्त तुझा भास होतो
तू सोबत असतोस तेव्हा
माझ्या जगण्याची मजाच निराळी असते
कारण माझ्या सुखांची तार तुझ्याशीच जुळली आहे
म्हणून तुझा खूप त्रास होतो
केव्हाही कुठेही फक्त तुझा भास होतो
तुझ्या डोळ्यात स्वताला पाहताना
मन माझ भारावून जात

शब्दखुणा: 

कणा ( विडंबन )

Submitted by Trushna on 31 July, 2013 - 00:07

ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं पाणी

क्षणभर बसला, भेसूर हसला
बोलला वरती पाहून
मुंबईमधून आत्ताच आलो
आलो बॉम्ब लावून

माज चढल्या सैतानासारखा
लोकल्स मधून नाचलो
साथी सारे पकडले जातील
मीच एकटा वाचलो

वाटलं होतं बॉम्ब लावून
मुंबईची वाट लागली
मुंबईमात्र नेहमी सारखीच
पुन्हा धावायला लागली

खिशाकडे हात जाताच
वर बघून म्हटला
पैसे नकोत सरदार
मनात भकासपणा दाटला

शब्दखुणा: 

माझिया मना……. :)

Submitted by Trushna on 11 July, 2013 - 08:47

सर्व मायबोलीकरांना माझा नमस्कार ,

माझिया मना हे पान चालु करण्याचा विचार अचानक मनात आला आणि क्षणाचाही विलंब न करता मी ते केल

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

तु दिलेल्या फुलांचा सुवास अजूनही बाकी आहे

Submitted by Trushna on 4 March, 2013 - 20:35

2663075555_a0e76bd6e1.jpg

तु दिलेल्या फुलांचा सुवास अजूनही बाकी आहे
तुझा तो प्रेमळ सहवास अजूनही बाकी आहे
मनातले बालिशपण अजूनही बाकी आहे
ओंजळीतले रिते पण अजूनही बाकी आहे
हृदयातला गारवा पापण्यान आड लपून आहे
तुझ्या मिठीतला तो मंद श्वास अजूनही बाकी आहे
स्पर्श तुझा तो सुखाचा अजूनही शहारतो आहे
तू गेलास असा निघून पण परतण्याची आस अजून बाकी आहे
कारण, तु दिलेल्या फुलांचा सुवास अजून बाकी आहे .............तृष्णा

शब्दखुणा: 

सातासमुद्रा पलीकडले

Submitted by Trushna on 4 March, 2013 - 11:46

कॅनडामधील काही सुंदर ठिकाणांचे हे फोटो तुम्हाला नक्की आवडतील आपला देश तर आहेच सुंदर निसर्गरम्य वातावनाची देणगी लाभलेले अनेक ठिकाण भारतात आहेत म्हणूनच आज काही भारताबाहेरील सुंदर ठिकाणे पाहूया ........
ottawa-hindu-temple-1.jpg

शब्दखुणा: 

स्वप्न.......

Submitted by Trushna on 4 March, 2013 - 10:09

images.jpg
काही स्वप्ने खरी होत असतात
पण, एका वादळाने सारी जमीन दोस्त होतात
काही हात सावरतात ,काही दिखावे करतात
पण, एवढ्या मोठ्या जगतात खरच का कोणी आपले नसतात ?
स्वप्न पाहन हि चूक तर नाहीना ?
मग का उंच उडणार्या पक्षांचे पंखच छाटून टाकतात
तरीही धारात रडत बसायचं जिद्द बाळगून उरी
पुन्हा एक स्वप्न पहायचं तुटणार असाल तरी
पुन्हा एक स्वप्न पहायचं तुटणार असाल तरी ............तृष्णा

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - $मन माझे$....