असावे असे असे

Submitted by तनवीर सिद्दीकी on 4 March, 2013 - 05:09

आक्रोश, किंकाळ्या पेपरात नाहीत ?
थांबा, ' लिहीणारा' लिहीत असावा

मतदाराच्या हातावर शाईच नाही !!
नक्कीच हात त्याचा 'दहीत' असावा

यावेळी आंदोलनाला येत नाहीये तो ?
(मागच्या निर्णयाच्या 'सही'त असावा)

का शोधायचा शेतकरी निकालदिनी ?
दाखला तर कचेरीच्याही वहीत असावा

रोज तीच तीच इज्जतीची माय ताई
या शहरांत हा उपक्रम विहीत असावा

अरेरे !! त्यांना पुन्हा मुलगीच झाली ?
परत पाळणाही बारसा रहीत असावा

आजही कोणीतरी भररस्त्यात मेला ना ?
मग सुट्टीचा अर्ज 'बंद' सहीत असावा !!

सर्व भिकारी आता देवस्थळीच बसतात
त्यांना मध्यमवर्गी खिसा गहीत असावा

सर्वांकडेच मांजरकान, शब्दघोडे, गरुडडोळे ?
हमखास आवाज इंद्रियांचा अहीत असावा

तनवीर सिद्दीकी

Group content visibility: 
Public - accessible to all site users