वाळवंटतला दुष्काळ

Submitted by विजय जोशी on 3 March, 2013 - 19:36

।। वाळवंटतला दुष्काळ ।।

उन्हाळ्याचा कहर झालाय
उष्णतेचा पारा वाढलाय
विहिरी, तलाव सुद्धा तहानल्या
सर्व परिसर भकास झालाय
जणू काही वाळवंटातच दुष्काळ पडलाय ।।

गाई-गुरांचा पान्हा आटलाय
जमिनीलाही भेगा पडल्यात
शिवारातल्या झाडांनी माना टाकल्यात
निसर्गाचाच कोप झालाय
जणू काही वाळवंटातच दुष्काळ पडलाय ।।

कमिशन शिवाय काम नाही
माणुसकीचा लवलेश नाही
नात्यातलं अंतर वाढत चाललाय
मायेचा ओलावा केव्हाचा संपलाय
जणू काही वाळवंटातच दुष्काळ पडलाय ।।

वस्तूंचे भाव गगनाला भिडले
महागाईचे चटके बसू लागले
जमा-खर्चाचे गणित बिघडले
त्यातच अधिक महिना आलाय
जणू काही वाळवंटातच दुष्काळ पडलाय ।।

गरिबी-बेकारी हातात हात घालून आलेत
घातपात-अपघात रोजचेच झालेत
राजकारण्यांनी पाश आवळलेत
पुढे जायचा मार्गच थांबलाय
जणू काही वाळवंटातच दुष्काळ पडलाय ।।
------------------------------------------------------------
विजय म. जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.