जादू हवीहवीशी..

जादू हवीहवीशी..

Submitted by पुरंदरे शशांक on 4 March, 2013 - 00:54

जादू हवीहवीशी..

परीराणी नाजुकशी
हातात छडी जादूची

मुकुट छान सोनेरी
गालावरती गोड खळी

छडी लावे झाडाला
"जेम्स"चा पाऊस आला

छडी फिरे वरती खाली
रंगीत फुगे भोवताली

सोनू झाली चकित फार
आईस्क्रीम हवे गारेगार

उडता येईल का मला
ढगांवरुन भटकायला

छडी फिरली भराभर
सोनू उडते हवेत वर

वॉव, कस्ली मज्जाए
जादू तुझी भारीए

हे काय गार गार गालावर
आईस्क्रीम इथे सांडले तर

आई म्हणते सोनाला
उठा उठा लौकर बाळा

हात अस्सा गालावर
अज्जून जर्रा ठेवतर

Subscribe to RSS - जादू हवीहवीशी..