.............दोन्ही क्षण ..............
घटना घडत जातात, निर्णय घेतले जातात.
एखाद्यावर विश्वास ठेऊन आपण निर्धास्त असतो...
परिस्थिती आपल्याच बाजूने निकाल देईल याची खात्री असते....
कारण परिस्थितीच्या उनाडपणापेक्षा आपल्याला आपल्या माणसाच्या वेडेपणावर जास्त विश्वास असतो.
पण..
कधी कधी अंदाज चुकतात.
आपण समोरच्याला आपले वेड न लावता आपणच जास्त वेडावलो होतो याची प्रचिती येते.
परिस्थिती जिंकते...समोरचं माणूस स्वत: खेळून आपल्याला हरवून जातं...
जमिनीनेच आसरा देण्यास नकार दिल्यास पाय ठेवायचे कुठे ? अपेक्षा उपेक्षा होतात...
'आजवर आपण जे काही जगलो, मानलं ते सगळं खोटं होतं.
आजवर आपण उघड्या डोळ्यांनी हि काहीच पाहू शकलो नाही.' याची जाणीव होते...
अश्या क्षणी कुणी तिसरंच माणूस धावून येतं...उब देतं....सांभाळून घेतं.
ज्या मागे आजवर धावलो ते माणूस हे का नव्हतं ?
आधी आलेली व्यक्ती हि ह्या नंतर आलेल्या व्यक्तीला भेटवून देण्यासाठीच आपल्या आयुष्यात आली होती का?
हा प्रश्न पडतो...
कधी कधी परक्यात आपलं आणि आपल्यात परकं सापडतं...
दोन्ही क्षण धक्याचेच...एक सुखद आणि एक दुखद...