काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो..समोर ती दिसते.
मी भावनातिरेकाने तिच्या कुशीत शिरते. तिला विचारते - 'कुठे असतेस गं आई, मला गरज असते तेंव्हा कुठे जातेस? मला खरंच वाटलं या अंधारात एकटीच चाचपडणार मी'....
ती किंचित हसते, डोक्यावर हात ठेवून म्हणते "देहाचा दरवाजा उघडलास तेंव्हा सगुणातली मी दिसले, मनाचा उघडशील तेंव्हा समजेल की मी तुझ्या अंतरातच आहे, मग कसला अंधार आणि कशाचं एकटेपण?"
'कविता'
तुझ्या चाहुलीचा
रक्तिमा गाली
तुझे भास स्पर्श
तुझ्या चांद वेळी
तुझे हसणे ते
किती शब्द वेडे
झरावे ओठातुनी
तुझे गीत थोडे
तुझ्या धुंद श्वासात
क्षण मी गुंफते
अन् नकळत
तुझी कविता जन्मते
- प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.
______________________________________________
'तू दिलेला चंद्र'
तू दिलेला चंद्र सख्या
घट्ट उराशी जपलेला
किती घेतली त्याची काळजी
तरीही थोडा कोमेजला
कारण पुसले जेंव्हा त्याला
खिन्न उदाससा तो हसला
दावला त्याने आरसा मज
अगदी माझ्यापरी दिसला
तू दिसताच खुलला चेहरा
म्हणाला आता पहा स्वत:ला
फार काही बदलल नाहिये तुमच्या जाण्याने....
आता मेसेज होतात कमी नी फोनच जास्त
तरीही बिल आता आटोक्यात असतं
थँक्स, सॉरी चा रतिब लावलाय
पण शिव्या घालायला कोणीही नसतं
दिवसभर चहाचे लाखो कप रिचतात
एका कंटीगसाठी भांडणार्यांना फिदीफिदी हसतात
गाडीतलं पेट्रोलही टाकीभर वाहतय
वीकेंड असेच रूममध्ये पडल्या पडल्या संपतात
मॉलमधे आवडेल ती गोष्ट माझी होतेय
तुळशीबागेतली बार्गेनिंग मलाच वेडावतेय
वस्तू माझी, इच्छा माझी कोणाचाही कल्ला नसतो
कोणास ठाऊक चॉईस तरीही अनोळखी का वाटतेय
लंचमध्ये डब्बा आता शेरिंगविनाच संपतो
नाक्यावरला वडापाव कधी कधी खुणवतो
एका वडापावची ऑर्डर मोठ्या तोर्यात देते
गुरू ठाकूरची क्षमा मागून... खेळ मांडला...
संदर्भ : http://www.maayboli.com/node/35791 
तुझ्या काळेवाडी कोणी सान थोर न्हाई
साद प्रेक्षकमाऊलींची तुझ्या कानी जाई
तरी देवा संपनाही सिरियल कशापायी
हरवली कथा त्यात काही लॉजिक नाही
चवताळून खरडतो बाफ मायबापा
माबोवरी धागा पेटला
छळ मांडला ...... छळ मांडला... छळ मांडला
माई आजी, ज्ञाना सवे ती कुहू नि प्रभुटला
राजवाडे कंपनीने छळ मांडला
सोडूनी कामधाम हिंडे वल्लभ आणि दिग्या काका
माझ्याच टिव्हीने माझा छळ मांडला…
हरवली अमेरिका अशी आधार कुणाचा न्हाई
तुटलेल्या हृदयाने घना लॅपटॉप फॉर्मॅटींग करी
बळ दे बघायाला, संयमाची ढाल दे
आधी हे वाचलय का?
http://www.maayboli.com/node/36279
----------------------------------------------------------------------------------------
आल्या आल्या तूला खिडकी बाहेरचा पाऊस न्याहाळताना पाहिलं आणि वाटलं चार वर्षमागे फ़िरवावं आयुष्य.तीच तू, तोच मी आणि तसाच हा पाऊसही.
आपली पहिली भेट. तुला सांगू त्या दिवसाआधी मला पाऊस कधीच नव्हता आवडला. पण त्यादिवशी रिक्षात भिजायला लागू नये म्हणुन तू आत सरकता सरकता तुझ्याही नकळत मला खेटून बसलीस आणि तेंव्हा पासून मला पाऊस अचानक आवडायला लागला. तो नसताच तर तुझं बावरलेलं ते रूप मला इतक्या जवळून पहाताच आलं नसतं.
ए बाहेर बघ ना रे! आजही तो आलाच... जुन्या आठवणी म्हणलं की त्याचं येणं स्वाभाविकच म्हणा. कसा मोक्याच्या क्षणी येतो ना हा द्वाड!
आठव.. कॉलेजचा पहिला दिवस... बावरलेली मी आणि तितकीच धिटाई अंगात भरलेला तू. बसची वाट पाहत मी बस स्टँडला उभी होते आणि इतक्यात तू जवळ आलास. "कॉलेजचा पहिला दिवस वाट्टं" कसल्या आगावपणे विचारलेलस ना तू? आधीच बावरलेली मी त्यात अजुन गडबडले. हो म्हणे पर्यंत तुझा पुढचा प्रश्न "कुठलं कॉलेज?" आणि कॉलेजचं नाव ऐकताच "हायला तू माझ्याच कॉलेजातेस की..चल ऑटो करुन जाऊ" हा तू दिलेला आदेश!
देव भेटलेला माणुस!
रविवारचा दिवस, हातात मस्त कॉफी..आणि सोबतीला वर्तमानपत्र....!
तस हे वर्णन आमच्या घरातल्या कुठल्याही सकाळसाठी फिट बसेल कारण पेपर वाचल्या शिवाय माझा दिवस पुढे सरकतच नाही. लहानपणी अनेकदा त्यावरुन आईचा मारही खाल्लायं. "सकाळी सकाळी कामधाम सोडुन पुरुषासारखा पेपर काय वाचत बसलियेस कार्टे?" हा आजीचा प्रश्न इतक्या वर्षात काहीच बदल न झाल्याने "पारच वाया गेलीये ही मुलगी!" हा भाव असलेल्या सुस्कार्यांमध्ये बदललाय इतकाच काय तो इतक्या वर्षाच्या सकाळमध्ये झालेला बदल.
असच काही सुचलेलं .........
तू जवळ असलास की
शब्द माझे ओठावरच विरून जातात
खरचं.....
स्पर्शालाही भाषा असते
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तुझी आठवण...
नक्की म्हणू काय?
चंद्र म्हणू तर दिवसाचा विरह
सूर्य म्हणू तर रात्रीचा.....
तुझी आठवण म्हणजे माझा श्वास
तो थांबला की मी संपले
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आजकाल डोळे माझे
मलाच दगा द्यायला लागलेत
हृदयामधल्या गोष्टी सरळ
एक सर इवलीशी
एक सर इवलीशी
दावी रुपे किती किती
धागा गुंफते मनाचा
त्यात आठवांचे मोती
एक सर इवलीशी
गूज आईचे सांगते
मातीतच मिसळते
गंध मातीलाच देते
एक सर इवलीशी
रूप "बा"चे ती दावते
प्रेम बरसवे सारे
स्वत: होऊनिया रिते
एक सर इवलीशी
अशी मला बिलगते
जशी खट्याळ बहीण
माझ्या पदरी लपते
एक सर इवलीशी
सखीपरीस भासते
स्पर्शानेच शब्दाविन
सांगी अनेक गुपिते
एक सर इवलीशी
"त्या"च्या सारखी लबाड
येता आनंद पाझरे
जाता अश्रुंचे घबाड
"सृष्टी "
एक कथा ही गमतीची
पृथ्वीच्या निर्मितीची
विधात्याची सुंदर कृती
नाव होते तिचे सृष्टी
घेऊन गेला ग्रहांकडे तिज
कोण असावा योग्य आधार?
प्रश्न पडला त्या कर्त्याला
जो तो म्हणे मीच थोर
ग्रह पहिला बुध बोले,
"नाते जवळचे भास्काराशी
प्रकाशमान ती राहील नेहमी
ठेऊन द्यावी माझ्यापाशी".
ग्रह दुसरा गुरु बोले,
"सगळ्या ग्रहात मीच मोठा
सृष्टी द्यावी माझ्यापाशी
कधी न तिजला कुठला तोटा".
ग्रह तिसरा बोले शन,,
"माझ्या भोवती आहे कडे
संरक्षणाची नसेल चिंता
सृष्टी द्यावी माझ्याकडे".
ग्रह चौथा बोले मंगळ,
"लाल लाल मी आहे सुंदर
माझ्यापाशी ठेऊन द्यावे