नातीगोती

सांग ना

Submitted by ashishcrane on 12 September, 2013 - 03:38

सांग ना

मनाचेच आहेत हे खेळ सारे,
क्षणात जाणले मी, तरी तुला इतका वेळ का रे?

झोंबले मला अन् तुला स्पर्शतही नाहीत हे वारे?
एकटीच सोसू का मी हे शहाऱ्याचे भारे?

गणित सारखे आपुले, तरी आकडे वेगळे का रे?
होता धरलास हात जेव्हा, तेव्हाच हिशोब जुळले ना रे?

मिटल्या पापण्या की दिसे आपल्या स्वप्नांची दुनिया,
तू कसा परका स्वप्नांना? खरंच झोपतोस ना रे?

धृतराष्ट्र होता अंध खरा, पण तू बनलास गांधारी का रे?
माझ्या प्रश्नांचं उत्तर म्हणुनी तरी तू माझाच ना रे?

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

सेकण्ड हेंन्ड

Submitted by तनवीर सिद्दीकी on 4 September, 2013 - 06:44

मुंबईची एक साधी-रोजसारखी दुपार....सगळे जण आपापल्या दैनंदिनिंत मग्न...परक्यासारखे... तोच गजबजाहट ..गोंधळ..गर्दी....असंच काहीतरी..

आणि वर आभाळातून मात्र 'अरुण' देव आग ओकत - आपल्या सामर्थ्याची जाग देत रोजप्रमाणे खाली बघून हसत सगळी गंमत पाहत होता..

'इतना खर्चा क्यो आ रहा है भाई?' - मी चिंतातूर झालो.
'क्लच वायर खराब है..ओईल भी डालना पडेंगा..टायर घीस गये है...

.....माझी मोपेड तेवढ्या विशेषणाला सार्थ नसूनही आणि मी पण घाई गडबडीत असल्याने त्याचे पुराण ऐकणे टाळत असूनही त्याची 'मोपेड' गाथा वाढतच चालली होती आणि त्यासोबत माझ्या घामाच्या धाराही आणि अंत:करणाचा पाराही...

जराशी गंमत

Submitted by अंड्या _ ऋन्मेऽऽष on 2 September, 2013 - 12:22

मध्यरात्र उलटून गेल्यानंतरची गाढ झोपेची वेळ, पण तरीही सदानकदा बिछान्यात चुळबुळत पडलेला सदा. इतक्यात डोळ्यासमोर अचानक लक्ष लक्ष काजवे चमकल्यासारखे झाले अन तो दचकून बिछान्यातच उठून बसला. पाहतो तर समोर एक तेजस्वी सिद्धपुरुष ज्याच्या शरीरातून निघणार्‍या प्रकाशाने बेडरूमच्या डिमलाईटच्या प्रकाशाला पुरते झाकोळून टाकले होते. आपण स्वप्नात तर नाही ना हे बघण्यासाठी म्हणून सदा स्वताला चिमटा काढायला जाणार इतक्यात समोरूनच आवाज आला, "अरे राजा, स्वप्न पडण्यासाठी आधी झोप तरी यायला नको का?" .... हे मात्र सदाला पटले, गेले कित्येक दिवस त्याला मनासारखी झोप लागली नव्हती..

पिंक-कलर्ड रुईया फाईल

Submitted by ललिता-प्रीति on 31 August, 2013 - 04:13

"दुसरं काहीतरी लिही," मॅडमनी सांगितलंय.
का म्हणून?
उद्या म्हणाल....उद्या म्हणाल....काय बरं?

शब्दखुणा: 

बापू..

Submitted by दुसरबीडकर on 12 August, 2013 - 06:47

बालपणीचा काळ खरचं सुखाचा असतो..मग ते बालपण कितीही गरिबीतले असले तरिही..आमच कुटूंब खर्या अर्थान फार मोठ्ठ होत...जवळपास वडिल धरुन सहा चुलत्यांचा विस्तार..सगळ्याच्या चुली वेगळाल्या पण बाकी कारभार सगळा एकत्र..सगळ्याच्या एका रांगेत दोन दोन खोल्या होत्या..अन बाहेर एक ऊंबराच आभाळ कवेत घेणार एक मोठ्ठ झाड..आणि त्या झाडाखाली एक बांबूची,सणकाड्यांनी शाकारलेली झोपडी असायची अन तिथे रहायचा या सगळ्या खटल्यावर लक्ष ठेवणारा 'सम्राट'..बापू..आमचे आजोबा..!!

हल्ली गावी जात नाही

Submitted by तनवीर सिद्दीकी on 6 August, 2013 - 23:09

गेल्यावर
तिच्या पाठीला कणा फुटतो
मागच्या वेळचेच जाताना हातात कोंबलेले
शंभर रुपये निघतात
धुणीभांडीची चार दिसांची सुट्टी निघते
''मी नसल्याच्या'' संप्रेरकांनी जपून ठेवलेले सण निघतात

अस्वस्थता येते

आणि
सांगायची लाज वाटते
की आई
हे बघ

या पुस्तकाच्या सातव्या पानावर तुझ दु:ख छापून आलंय

हे त्यातलेच शंभर रुपये ग
ठेव

********************
कधी कविता आणि आई
दोघांना
सांगताच आले नाही
की

''मी यासाठी शहरात आलेलो नाहीये ''
आणि

पूर्णविराम

Submitted by ashishcrane on 28 July, 2013 - 12:34

पूर्णविराम

(भाग पहिला... नेहाच्या मनातला)

"करर्र्र्र" दरवाज्याच्या आवाजासकट तो आत आला. मधुचंद्राची रात्र होती त्याची. टिव्हीमध्ये दाखवतात तसा बिछाना सजवलेला नव्हता किंवा टेबलावर दुधाचा ग्लास नव्हता. सर्वसामान्य माणसाच्या घरातला मधुचंद्र बिछान्याच्या कर्र्रर्र आवाजासकटच साजरा केला जातो.
बिछान्यावर नेहा स्तब्ध बसली होती. शवात आणि विचारांच्या भोवऱ्यात खोल बुडालेल्या माणसात फक्त श्वासाचाच फरक असतो.

शब्दखुणा: 

जीवन

Submitted by vaiju.jd on 12 July, 2013 - 14:45

॥ श्री ॥

चालता चालता पायात रुततो कधी काटा
म्हणून कां कोणी सोडून देतो चालत जाणं वाटा.

लखलखता विजेचा लोळ कधी उतरून जाळतो
सौंदर्यातला दाहकपणा त्यातूनच कळतो.

कधीतरी अडवणूक करतो कोसळणारा पाऊस
म्हणून ’पाऊस नकोच!’ असा करतं कां कोणी नवस?

मध्य़ान्हीचा तळपता सूर्य, पावलांना जाळी
पण जातं कां आयुष्य कॊणाचं बसून छपराखाली?

तापला तवा देऊन जातो चरचरीत चटका
आपसूकच पुढच्यावेळी फिरतो हात नेटका!

चुकुन फिरतं धारधार पातं लागते रक्ताची धार
म्हणून त्यावर आघात करून करत कां कोणी प्रतिकार?

प्रिय मुलास

Submitted by दाद on 5 July, 2013 - 05:37

प्रिय मुलास....

तुझी-माझी पहिली भेट... तुला आठवत नसणारचय असं गृहीत धरतेय... मी विसरूच शकले नाहीये.
तान्ह्याला पहिल्या आठेक दिवसांत कोवळ्या उन्हात न्यावं म्हणे... म्हणून मी घरातल्या गाऊनमधेच तुला घेऊन आईच्या घरी मागे अंगणात तुळशीपाशी उभी आहे. तुला मी नवीन.... पण मलाही तू नवीनच, की.
... मऊ, मवाळ उन्हाची तुझ्या कोवळ्या कायेशी सलगी होतेय असं बघत... तुला झुलवत मी काहीबाही बोलतेय, दाखवतेय. आकाश, माड, पेरूचं झाड, शेवग्यावरला ऐकू येणारा काऊ, मलाही न दिसलेली चिऊ, मधेच डोकाऊन गेलेले आबाजी, वरच्या मजल्यावरल्या भाभीनं सक्काळीच वाळत घातलेलं रंगेबीरंगी पातळ... असलच काहीबाही.

एकत्र कुटुंबाचा तिढा कसा सोडवायचा ????

Submitted by मिताली on 1 July, 2013 - 19:27

नमस्कार मायबोलीकर.

घरातल्या सगळ्या प्रकारामुळे अत्यंत अस्वस्थता आली आहे, नैराश्याच्या वाटेवर आम्ही दोघे (मी आणि नवरा) चाललो आहोत.
कुणाशी तरी बोललं तर मन हलकं होईल म्हणून इथे लिहीत आहे. जाणकार सल्ल्यांची आणि मार्गदर्शनाची गरज तर आहेच.

आमच्या लग्नाला दहा वर्षे झाली. नवरा-४० वर्षे, मी ३४ वर्षे. गेल्या ७-८ वर्षांपासून आम्ही दोघे शिक्षण, नोकरी अशा सबबींवर बाकीच्या कुटुंबापासून वेगळे राहत आहोत.आम्हाला ७ वर्षांचा एक मुलगा आहे.

गावाकडे ९ लोकांचं कुटुंब आहे.
१. सासू - ६५ वर्षे,
२. सासरे- ७२ वर्षे

Pages

Subscribe to RSS - नातीगोती