माझी संस्मरणीय भटकंती - सौलवँग! - छंदीफंदी

Submitted by मीस्वच्छंदी on 2 September, 2025 - 16:08

सँटा बार्बरा होऊन सॅन फ्रान्सिस्कोला येताना मध्ये एक गाव लागतं सोलवान नावाचं. हे एक डॅनिश संकल्पनेवर आधारित अगदी छोटसं छान टुमदार गाव आहे. इथे आलेल्या डॅनिश लोकांनी 1911 मध्ये वसविलेलं. हे छोटं टुमदार गाव आजकाल मुख्यकरून घरांच्या वेगळ्या आर्किटेक्चरमुळे, डॅनिश बेकरी पदार्थांमुळे, तसेच घोडागाडी आणि रंगेबिरंगी सजविलेली छान दुकाने ह्यासाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

सॅन फ्रान्सिस्कोला जाताना किंवा येताना मध्ये थांबून तेथील बाजारपेठेत फिरावे, बेकरी मध्ये थांबून स्वादिष्ट डॅनिश पदार्थावर ताव मारावा, बालगोपाळ बरोबर असतील तर घोडागाडीत सैर करावी, चोखंदळ रसिकांनी इकडची वारुणि चाखावी काही‌ तास मजेत घालवावे आणि मार्गस्थ व्हावं.

आम्ही साधारण दुपारी जेवायच्या वेळी सोलवांगला पोहोचलो. गाव पर्यटकांनी फुलून गेलं होतं. आम्हाला सपाटून भूक लागली होती कारण सोलवांग मधील प्रसिद्ध डॅनिश पदार्थ चाखायचे म्हणून सकाळचा नाश्ता जेमतेम केलेला.

बेकरीमध्ये ही भलीमोठी रांग. आमच्या मागे काही नंबर सोडून एक बाई होती, तिने आम्हाला विनंती केली तुमचा नंबर माझ्या आधी आहे, त्यांच्याकडे एकच क्रिंगल (एक खूप मोठा ब्रेड सदृश्य पदार्थ असतो त्याच्या आत बऱ्याचदा बदामही पेस्ट/ क्रीम असे भरलेले असते. अतिशय रुचकर लागतो) राहिलाय तर तुम्ही ते माझ्यासाठी घ्याल का? एव्हढ्या शिस्तप्रिय आणि नियमांच काटेकोर पालन करण्याबाबत अतिशय दक्ष असलेल्या ह्या देशात, एक प्रौढ महिलेने एका पदार्थासाठी अशी विनंती करावी? अगदीच अनपेक्षित होते ते...
अर्धा एक तास रांगेत उभं राहून आम्ही काही पेस्ट्रीज घेतल्या, अर्थात तो क्रिंगल काही शिल्लक राहिला नव्हता.
एका बेकरीत हे छोटे बाहुले भातुकलीतील बेकिंग करत होते. त्याचा व्हिडिओ

त्यानंतर तिकडची वेगळ्या आकाराची, रुपड्याची, ढंगाची घरे, पवनचक्क्या बघत थोडे हिंडलो.
बहुतांश पर्यटन स्थळी असतात तशीच इकडेही खूप सुंदर आणि सुबक गोष्टी आकर्षकरित्या मांडलेली दुकाने होती. त्यातील रांगेबीरंगी दिवे- काही अल्लादिनच्या गोष्टीची आठवण करून देणारे तर काही सिंड्रेलच्या - अगदीच मनमोहक दिसत होते.

बाजारात एक फेरफटका मारून, फोटो काढून आम्ही तिकडून निघालो.

साधारण ऐकून होतो की २-३ तास भटकायला हे खूप छान गाव आहे पण ते इतक देखणं आणि रांगेबिरंगी असेल ह्याची कल्पना नव्हती.
तसं तर ती आमची सोलवांगला दिलेली धावती भेट होती सहज जाता जाता जमवलेली, पण तरीही त्या परिकथेत शोभणाऱ्या गावाची सैर चांगलीच लक्षात राहिली आणि राहील.

---

IMG_20221224_135444098~2.jpg

---

IMG_20221224_143253287.jpg

----
IMG_20221224_143533335~2.jpg

----
IMG_20221224_143051821.jpg

----
IMG_20221224_132024502~2.jpg

----
IMG_20221224_135123105~2.jpg

---
IMG_20221224_135148140~2.jpg

---
IMG_20221224_135134968~2.jpg

---

IMG_20221224_142619668~2.jpg

--
2527893f-0870-42dc-bf69-515791093db7_3654x2055.jpg
---

PastriesBavaroisse10 (1).png

हे शेवटचे दोन फोटो आंतरजालावरून घेतले आहेत..

Group content visibility: 
Use group defaults

मस्त वर्णन केले आहेस. अमेरिकेत अशी टुमदार गावे असतात खरी. त्यांच्या त्यांच्या ४ जुलाइ वगैरे परेडस असतात. त्यांची सुंदर रंगिबेरंगी दुकाने, त्यातील वस्तू, सुशोभिकरण, फुलबागा मस्त असतं सगळं.
मला चीज डॅनिश आवडते. म्हणजे खूप आवडते Happy तो बहुतेक डॅनिश पदार्थ असावा.

धन्यवाद सामो. मजा येते अशा ठिकाणी भटकायला.
बेकरी - सगळेच पदार्थ आवडतात . विशेषकरून ज्या छोट्या छोट्या बेकऱ्या असतात त्यात खूप रुचकर आणि ताजे पदार्थ मिळतात.

कदाचित तू गेली असशील, फिली जवळ अमिश गाव ( गावे?) आहेत. त्याविषयीही बराच ऐकून आहे.

सुंदर.

छान लिहलयस! आम्ही बर्‍याच वेळेला गेलोय.. ख्रिसमस मधे फेस्टिव्ह वातावरण , लायटिन्ग, ओपर एअर म्युझिक वैगरे असत.
बेकरित पेस्ट्रिज तर आहेत्च पण तिथे फार सुदर फज मिळतो.
इन्स्टा वर्दी फोटोज काढायला चिक्कार स्पॉट आहेत .अ‍ॅडरसन म्युझियम, विन्टेज मोटारसायकल म्युझियम पण चान्गल आहे.
तिथुन जवळच १० मिनिटावर एक स्टेट पार्क आणी वॉटरफॉल हाइक करता येते.

प्राजक्ता आणि अंजू धन्यवाद!

वाह प्राजक्ता, एव्हढी माहिती नव्हती काढली. मध्ये वाट वाकडी करून २-३ तास गाव/ बेकरी बघावेत असा विचार होता.

ते शेवटच्या चित्रात आहे तसे मार्झीपेन मिठाई घेतलेली.. फज चे नाव जास्त कुठे दिसले नव्हते वाटतं.

बहुदा पदार्थ खूप जास्त चविष्ट नसावेत (जेव्हढे ते उत्कृष्ट दिसत होते त्यामानाने) .. कारण ते गाव जेव्हढ लक्षात राहिलय तेव्हढ पदार्थ नाही लक्षात राहिले.
पण त्या बेकरीचा amience, गर्दी, त्या दुकानातल्या मुलींनी घातलेले ते जुन्या पद्धतीचे ड्रेसेस वगैरे जास्त डोक्यात राहिलं..

२ तास बेकरीच्या रांगेत उभे नसतो राहिलो तर कदाचित अजून काही बघून झालं असत , असं वाटतंय आता Lol

पुढच्या वेळी Happy