भटकंती

अक्षी येथील गद्धेगळ (भाग-१) [Ass- Curse stone Akshee part-1]

Submitted by shantanu paranjpe on 20 June, 2018 - 13:53

द्धेगळ वर वाचल्यानंतर बरेच दिवस आक्षीला जायचे मनात होते पण बेत काही जमत नव्हता, पण दिवाळीच्या निमित्ताने तिकडे जाता आले आणि बर्यापैकी सुस्थितीत असलेली गद्धेगळ पाहायला मिळाले. तर आजचा लेख हा त्याच गद्धेगळ वर!

सुरुवात करण्यापूर्वी अक्षी गावाची थोडी माहिती सांगतो! अक्षी हे गाव अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर, अलिबाग पासून साधारण ६ किमी अंतरावर असलेले हे गाव ओळखले जाते ते त्याच्या सुंदर समुद्र किनार्यामुळे. शनिवार-रविवार ओसंडून गर्दी असलेला हा परिसर इतर दिवशी मात्र शांत असतो. नारळ-पोफळीच्या वाड्या, प्रेमळ माणसे आणि भरभरून इतिहास असणारा हा प्रदेश कोणत्याही भटक्याला भुरळ पडतो.

शब्दखुणा: 

आज दिनांक २३ जून

Submitted by अंबज्ञ on 19 June, 2018 - 23:54

मुंबईहुन रत्नागिरीच्या मंडणगडला बदली झाल्याने तो जरा नाराजच होता. पण नविन नोकरी टिकवताना आलीया भोगासी म्हणत मंडणगड़च्या त्या गावरान वातावरणात सामावून जाण्याशिवाय काही ईलाजच नव्हता. रविवारचा बकार्डी हैंग ओव्हर वेळेत न संपल्याने आज उशिराच जाग आली. वड़ापची सूमो अर्थातच चुकली. ऑफिस वेळेत गाठणे आवश्यक होते. त्यामुळे समोर आलेल्या लाल डब्याच्या गर्दीचा एक भाग होण्यावाचुन त्याला पर्यायच नव्हता. आपली कड़क इस्त्री अन् टाय बूट वगैरेची पर्वा न करता शेवटच्या बाकड्यावर खिड़कीतल्या सिटवर बसकण मारण्यात त्याने धन्यता मानली.

रायगडावर जेंव्हा पहाट उजाडते...

Submitted by राजेश्री on 15 June, 2018 - 22:09

रायगडावर जेंव्हा पहाट उजाडते ....

पायीर घाट, कोकणदांड, बैल घाट आणि फोदोंडीची वाट

Submitted by योगेश आहिरराव on 11 June, 2018 - 03:49

पायीर घाट, कोकणदांड, बैल घाट आणि फोदोंडीची वाट

विषय: 

नैनिताल/चैनीताल

Submitted by मंजूताई on 27 May, 2018 - 09:40

नैनिताल्हुन परत आले आणि विचार करू लागले खरंच कशासाठी गेलो होतो ? एरवी आपण फिरायला जातो ते मजा आणि चैन करायलाच ना! मग केली मजा तर काय बिघडलं… इत्यादी इत्यादी हे खरंतर उतू जाऊ द्या वर लिहायच होतं पण लिहीता लिहीता लक्षात आलं की अगदीच सगळं काही वैताग आणणारं नव्हतं चांगल्याही गोष्टी झाल्या आणि ते इतकं मोठं झालं की शेपरेट लेखच झाला.

शब्दखुणा: 

दारा, रानशीळ आणि हिरड्याचं दार

Submitted by योगेश आहिरराव on 11 May, 2018 - 02:27

दारा, रानशीळ आणि हिरड्याचं दार

विषय: 

न्यूझीलंड-२ : Unique to New Zealand... हे फक्त इथेच!

Submitted by ललिता-प्रीति on 6 May, 2018 - 08:57

न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!!

----------

न्यूझीलंडला जायचं तर नेचर-टुरिझमसाठी, असं तिथे जाऊन आलेल्यांकडून ऐकलेलं होतं. आमचंही नेचर वॉक्स, जंगल-ट्रेल्स, समुद्रकिनारे यांनाच प्राधान्य होतं. मानवनिर्मित स्नो-वर्ल्ड, डिज्नी-वर्ल्ड, अम्युझमेंट पार्क्स असल्या गोष्टींवर आम्ही आधीपासूनच फुली मारलेली होती. मात्र जगभरात केवळ न्यूझीलंडमधेच अस्तित्त्वात असणार्‍या काही नैसर्गिक गोष्टी असू शकतात, त्यांचा शोध घ्यावा, हे काही डोक्यात आलेलं नव्हतं. तो उजेड पडला TripAdvisor मुळे.

भटकंती उत्तरपूर्वीय भारताची...

Submitted by निक्षिपा on 28 April, 2018 - 07:00

पूर्वतयारी_उत्तरपूर्वीय_भारताची - १

एकटीनेच टूरला जाणार!! युहू... हा 'आज में उपर, 'आसाम' निचे' या अवस्थेचा आवेग ओसरल्यावर आणि खरोखरची तयारी करायला घेतल्यावर जाणवतं, फक्त बॅग भरणे म्हणजे सहलीची पूर्वतयारी नाही! आधी मनाचे एकेक कप्पे रिकामे करावे लागतात, त्यातील नाती, जबाबदाऱ्या घडी घालून नीट मार्गी लावाव्या लागतात आणि मग डोकं पूर्ण ताळ्यावर ठेवून सहलीची पूर्वतयारी सुरू करावी लागते!

एक असतं, मनातलं द्वंद्व - माझा मुलगा माझ्याशिवाय दोन आठवडे कसा राहील? इथपासून ओह शीट! तो खरंच आजोळी माझ्याशिवाय आनंदाने राहायला तयार आहे?? कुठे गेले माझ्यावरचे प्रेम??

माझी सैन्यगाथा (भाग १०)

Submitted by nimita on 19 April, 2018 - 02:04

Armed forces मधे काही customs पाळल्या जातात. जसं की- जेव्हा एखादा ऑफिसर युनिट सोडून बाहेरगावी जातो (posted out) किंवा दुसऱ्या गावाहून युनिट मधे येतो (posted in) तेव्हा युनिट मधले इतर ऑफिसर्स त्याला (आणि त्याच्या फॅमिली ला) आपापल्या घरी जेवायला बोलावतात. यामागे मुख्यत्वेकरून दोन उद्देश असतात-
युनिट मधे नवीन आलेल्या ऑफिसर आणि त्याच्या फॅमिलीला नव्या जागेत, नवीन लोकांमधे रुळायला मदत होते. They become a part of the unit family.

न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!!

Submitted by ललिता-प्रीति on 14 April, 2018 - 00:58

माओरी - हे न्यूझीलंडचे आदिवासी, हे शाळेत असताना कधीतरी वाचलेलं लक्षात होतं. दूर जगाच्या एका कोपर्‍यातल्या चिटुकल्या देशातल्या आदिवासी लोकांशी या पलिकडे आपला का म्हणून संबंध यावा? नाही म्हणायला माओरींशी आपल्याकडच्या क्रिकेटप्रेमींचा आणखी एक बारीकसा संबंध मानता येईल. न्यूझीलंडचा एक बॅट्समन रॉस टेलर माओरी वंशाचा आहे हे आपण ऐकत आलेलो आहोत. तरी आम्ही न्यूझीलंडला जायचं ठरवलं तेव्हा तिथले माओरी काही विशेष डोक्यात नव्हते.

Pages

Subscribe to RSS - भटकंती