भटकंती

दिल्ली व आग्रा ट्रिप बद्दल माहिती हवी आहे

Submitted by राजेंद्र on 13 July, 2019 - 05:15

आम्ही या दिवाळीत दिल्ली व आग्रा येथे जाणार आहोत(५ दिवस). दिल्ली व आग्रा येथील बघण्याची ठिकांणांची माहिती कृपया द्या.

विषय: 

इंद्रवज्र - Indravajra

Submitted by शुद्ध रक्त राजा on 6 July, 2019 - 13:49

आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजात शॉर्ट फिल्मची स्पर्धा असायची. त्यात भाग घेतला होता. तेव्हा स्पर्धेचे परीक्षक म्हणून रानवाटाचे स्वप्निल पवार आले होते. त्यांनी हरिश्चंद्र गडावरून दिसणाऱ्या इंद्रवज्राबद्दलची शॉर्ट फिल्म दाखवली आणि तेव्हा पहिल्यांदा इंद्रवज्राबद्दल कळलं. त्याआधी मी हरिश्चंद्रगडावर जाऊन आलेलो असल्याने आपण तेव्हा इंद्रवज्र बघितलं नाही याचं वाईट वाटलं होतं. पण नंतर कळलं की त्याला काही काळ वेळ असते. पावसाळ्याआधी येणारे ढग कोकणकड्यावर अडकतात आणि आपल्याला हे नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं.

Good bye from मीना उत्तरा

Submitted by मीना उत्तरा on 27 June, 2019 - 08:05

नमस्कार मंडळी,
मी मायबोली या संकेतस्थळाला रामराम म्हणण्यापूर्वी, सहज म्हणून प्रतिसाद बघत होते आणी काहिशी स्तब्ध झाले 40 जणांनी माझं लेखन डोळ्याखालून घातलं...आपुलकीने सुचना व प्रोत्साहन दिले खूप छान वाटलं...त्याच जोडीला ट्रोल करणे म्हणजे काय ? रॅगिंग नेमके काय असते ? याचा जवळून अर्थ कळला. JayantiP यांचे विशेष करून आभार कारण त्यांच्याशिवाय हे कळले नसते, या अनुभवामुळे माझे काऊंसेलर म्हणून असलेले काम अजून संवेदनशीलपणे मला करता येईल. आपल्या सगळ्यांशी अजून संवाद साधायला आवडला असता पण हे व्यासपीठ माझ्या साठी नाही. त्यामुळे लोभ असावा.
मीना उत्तरा

षटकार पृथ्वी प्रदक्षिणांचा - कॅप्टन च्या जहाजातून

Submitted by मीना उत्तरा on 22 June, 2019 - 09:49

नमस्कार मंडळी.

मी सुरवात करत आहे छोट्या लेख मालिकेला.

माचीप्रबळ येथील कॅम्पिंग

Submitted by सौमित्र साळुंके on 13 June, 2019 - 02:44

पनवेल जवळील शेडुंगच्या साधारण दहा किलोमीटर पूर्वेला प्रबळगड स्थित आहे. यापूर्वीही अनेकदा इथे जाणं झालं होतं मात्र तेव्हा इथे येणाऱ्यांची संख्या तुरळक होती.

पायथ्यापासून साधारण दीड तासांत आपण माचीप्रबळ या पाड्यावर/पठारावर येतो. कलावंतीण दुर्ग अथवा प्रबळगडावर जाण्यासाठी हा बेस.

विषय: 
शब्दखुणा: 

चक्राता - ८ टायगर फॉल्स, ग्वासापूल

Submitted by साक्षी on 5 June, 2019 - 14:13

या आधीचा भाग इथे वाचा.

कॅम्पचा शेवटचा दिवस होता. टायगर फॉल्सला ५ किमी चालतच जायचं ठरलं होतं पण रात्री खूप मोठा वादळी पाऊस झाल्याने वाटा निसरड्या झाल्या असणार होत्या. शिवाय ग्रुप मधे ट्रेकर्स तर नव्हतेच पण अगदी लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकही होते. त्यामुळे गाड्यांनीच तिथे जायचं ठरलं. आणि गाड्यांनीच जायचंय तर आधी तरी पाय मोकळे करू म्हणून आम्ही ६:३० वाजता रिसॉर्टच्या रस्त्यावरून पुढे ग्वासापूल म्हणजे साधारण १.५ किमी पर्यंत गेलो.

Pages

Subscribe to RSS - भटकंती