माहिती

Submitted by Prachi_Patil on 20 October, 2019 - 15:51

नमस्कार,
माझ्या मिस्टरांची 2 महिन्यां साठी पॅरीस येथे बदली झाली आहे.
आम्ही इकडे नवीन आहोत त्यामुळे कुठे काय आहे आणि कुठे काय मिळतं काही माहित नाही. आपल्यापैकी कोणी इकडे रहात आहे का?
आमची यंदाची दिवाळी इकडेच जाईल त्यामुळे दिवाळीचं सामान किंवा फराळ किंवा फराळाचं सामान कुठे मिळेल का?
आणि माझी 8 महिन्याची मुलगी आहे तर तिच्यासाठी सेरेलॅक किंवा फाॅरम्युला मिल्क कुठे मिळेल का?
प्लिज जरा माहिती सांगा...
धन्यवाद

Group content visibility: 
Use group defaults

https://www.maayboli.com/node/1859
येथे काही माहिती आहे.
या ग्रुपचे मेंबर व्हा व तेथे धागा काढा. बघा अद्याप कोण आहे का?

पॅरिस महाराष्ट्र मंडळ अश्या नावानी गुगल / फेसबुक / इन्स्टा सर्च केलात तर काहीतरी लीड नक्की मिळेल. मग तिथे कॉन्टॅक्ट करून बघा. इनडिअन्स इन पॅरिस, मराठी / महाराष्ट्रीयन इन पॅरिस अश्या रँडम नावाने सर्च केलत तर फेसबुकवॉर नक्की काहीतरी माहिती मिळेल.

महाराष्ट्र मंडळ फ्रांस इथे मदत मिळेल.
तुम्ही धाग्यात तुमचा इमेल दिलाय तो तुमच्याच सुरक्षिततेसाठी, कृपया काढून टाका. मायबोलीकर विचारपूस आणि संपर्क सुविधा वापरुन तुम्हाला माहिती देवू शकतात.

बरं चालेल
धन्यवाद सगळ्यांना...