पेचप्रसंग

Submitted by अमृताक्षर on 21 December, 2019 - 10:12

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिला तिच्या प्रेमातील फोलपणा समजावून सांगा.विवाहित व्यक्तीवर प्रेम करणे कसे अयोग्य आहे हे सांगा.तिला competitive exam ला बसवा म्हणजे अभ्यासातून विचार करायला वेळ मिळणार नाही.

होते असे तरुण वयात. अनेकजण यातून जात असतात किंवा गेलेले असतात.

या बाबत त्या व्यक्तीने स्वत:बाबत कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी दोन पायऱ्या. चुकीच्या व्यक्तीसोबत प्रेम झालेय आणि त्याला भविष्य नाही हे स्वीकारणे हि पहिली पायरी. आणि हे एकदा स्वीकारले कि मग त्यातून बाहेर कसे यायचे हि दुसरी पायरी. त्यासाठी शक्य असल्यास त्या व्यक्तीच्या सहवासात पुन्हा येऊ नये म्हणून सध्याचे शहर/गाव सोडून दूर ठिकाणी (अन्य गावी वगैरे) शिकायला जाणे शक्य आहे का पहा. जेणेकरून सानिध्य कमी होईल. तिथे इतर छंद जोपासले (वाचन वगैरे) व चांगले मित्र मैत्रिणी झाल्या कि कालांतराने हे अयोग्य ठिकाणी झालेल्या प्रेमाचे भूत मनावरून उतरेल.

मन चुकीच्या दिशेने धावतेय असे लक्षात येताच त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आपण आपलेच "कठोर शिक्षक" व्हावे लागते. ठरवून काही गोष्टी मनात आणाव्याच लागतात. स्वयंशिस्त हाच यावर प्रभावी उपाय आहे.

स्वत:हून त्यांना यातून बाहेर पडायची इच्छा नसेल, "आपण अयोग्य मार्गाने जात आहोत व त्यातून बाहेर पडून योग्य साथीदार मिळू शकतो" असे वाटत नसेल तर मात्र अवघड आहे. याबाबत औषधे वगैरेंचा कितपत उपयोग होईल माहित नाही. काही चांगले मानसोपचारतज्ज्ञ आहेत त्यांच्याशी सल्लामसलत केल्यास निश्चित उपयोग होईल.

शुभेच्छा!

आम्ही सद्या competitive exams चा च अभ्यास करतोय मी तिला स्वतः माझ्या हॉस्टेल ला काही दिवस ठेऊन अभ्यास करून घेतला पण त्यांची आठवण आली की ती अजूनही खूप रडते माझ्याजवळ.. मला काही बोलताच येत नाही मग..

धन्यवाद..atulpatil.. तीला तिच्या गावी पाठवण्याचा विचार चालू आहे पण गावी गेली तर पुढचं शिक्षण बंद होऊन घरचे तीच लग्न करून देतील..त्यामुळे ती रिस्क घ्यावी की नको यावर आमचं एकमत होत नाहीये..बाकी चे तुम्ही सांगितलेले प्रयत्न नक्की करून पाहिलं..

धन्यवाद कनिका..मी तिला माझ्यासोबत ठेऊनच अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न करतेय..

विज्ञानाच्या विद्यार्थिनी आहात कि नाही हे माहित नाही. पण न्यूटनचा गतिविषयक नियम ठावूक असेल तर पहा. हा नियम सांगतो "विश्वात एखादी वस्तू एखाद्या दिशेने जात असेल तर ती त्याच दिशेने जात राहते. जोवर अन्य एखादे बाह्य बल त्या वस्तूवर परिणाम करत नाही तोवर"

हा नियम मनाला तंतोतंत लागू पडतो. जे खूप यशस्वी झालेत ते उद्यमशील असतात. रात्रंदिवस त्यांच्या डोक्यात तोच एक विचार सुरु असतो. व्यवसाय, राजकारण, कला, क्रीडा, संशोधन, तंत्रज्ञान, समाजसेवा... क्षेत्र कोणतेही असो. ध्यास घेतला (पक्षी मनाला त्या दिशेने गती दिली व धावायला लावले) कि त्यांचे मन त्याच दिशेने धावत राहिलेले असते. त्यालाच ध्यास म्हणतात. म्हणून त्या क्षेत्रातच त्यांचे अखंड प्रयत्न सुरु असतात.

इथे आव्हान फक्त एकच असते. मनाची धावण्याची दिशा बदलणे. चुकीच्या दिशेने (ज्या दिशेला फलनिष्पत्ती काहीच नाही उलट नुकसानच अधिक आहे) मन धावत असेल तर त्यास योग्य दिशा देणे. न्यूटनच्या नियमानुसार त्यासाठी आपल्याला फार जोर लावावा लागतो. हे स्वत:शी कठोर राहून निग्रहाने ठरवूनच करावे लागते. पण एकदा का मनाची धावण्याची दिशा बदलली कि झाले.

अविरत मेहनत घेऊन सतत कार्यमग्न राहून यशस्वी झालेल्या व्यक्तींची आत्मचरित्रे त्यांना वाचायला सांगा. शंतनुराव किर्लोस्कर, वर्गीस कुरियन, टाटा, कलाम व इतर अनेक उदाहरणे आहेत. मनाची दिशा बदलण्यासाठी जे बल हवे ते नक्की मिळेल. बिल गेट्स, स्टीव जॉब्स वा तत्सम लोकांची भाषणे ऐकायला पाहायला सांगा. स्फूर्ती मिळते. आजकाल युट्युब वगैरेसारखी माध्यमे आहेत. हाताच्या बोटावर जगातल्या महान व्यक्तींची भाषणे उपलब्ध आहेत. नक्की फरक पडेल. उपयोग करून घ्या.

मैत्रिणीच्या घरच्यांशी बोला, ते तिच्या लग्नाचे बघतील लगेच. 25 म्हणजे लग्नाचे वय तसेही झालेच आहे आणि मैत्रिणीची मानसिक स्थिती पाहता ती करीयर, आर्थिक स्वातंत्र्य, पुढचे आयुष्य याबाबत अजिबात गंभीर नाहीय हे उघड आहे.

तिचा असा गैरसमज झालाय की त्यांचं देखील तिच्यावर प्रेम आहे फक्त लग्न झालंय म्हणून ते मला स्वीकारायला तयार नाहीत..
त्यामुळे तिला वाटतं की ते तिला कधीतरी नक्की स्वीकारतील...
ती कधी कधी तर त्यांच्या क्लास बाहेर एकटीच जाऊन तास न तास उभी राहते..मी ही गोष्ट तिच्या ताईच्या कानावर घातलिये पण तिने सुद्धा काही दिवसाने लक्ष द्यायचं सोडून दिलंय..तिची अवस्था आता पाहवत नाहीये..

साधना तिने दोन वेळा एमपीएससी ची मेन्स दिली आहे ती खरच खूप हुशार आहे..मी पहिल्यांदा तीच अस रूप पाहिलंय..नाहीतर य आधी तिच्या इतकं dedicated कदाचितच कुणाला मी पाहिलं असेल..

मैत्रिणीला एकदाच आणि ठाम निक्षून सांगा की
"बाई ग तू इथे कशाला आली आहेस मला माहीत नाही पण मी इथे अभ्यास करून, परीक्षा छान मार्कांनी पास होऊन, स्वतःच चांगलं भविष्य घडवायला आले आहे. तू तुझं रडगाणं माझ्यासमोर गाणं पूर्ण बंद कर. नाहीतर मी तुझ्या घराच्याना फोन करून तुझ्या वागण्याबद्दल सांगेन.मग ते तुला घरी घेऊन जातील आणि तुझे लग्न लावून देतील, मग तू बस चूल-मुलं करत."

आणि जर तिने तिचे रडगाणे चालूच ठेवले तर तिच्या घरच्यांना खरंच फोन करून सांगा सगळं.

जर रडगाणे बंद केले तर तिचं तिला काय करायचंय ते करुद्या. तुम्ही स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा.

धन्यवाद ॲमी..हा पर्याय योग्य वाटतोय पण तिची लक्षण पाहता कधी कधी भीती वाटते तिने स्वतःला काही करून घेतल तर..

सर तीला बोलले की त्यांचं लग्न झालंय आणि त्यांना एक महिन्याचे बाळ सुद्धा आहे..तिने जेव्हा मला हे सांगितले तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली>> यात तुमच्या पायाखालची जमीन सरकण्याचा काय कारण ? Lol

असो. तिला व्यवस्थित समजावून सांगा आणि नाहीच ऐकलं तर दुर्लक्ष करा . तुम्ही तुमच्या करियर वर लक्ष द्या . तिच्या घरचे असतीलच तिची मानसिक स्थिती सांभाळून घ्यायला . तुमच्या मैत्रिणीला शुभेच्छा . तुम्हीं तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा Happy

सरांनी काही पराक्रम करण्याआधी लवकरात लवकर तिच्या घरी सांगा. आणि तुम्हीपण फक्त mpsc एके ‌mpsc करण्यापेक्षा दुसरापण करियर ऑप्शन समोर असु द्या.

तिला वाटतं की ते तिला कधीतरी नक्की स्वीकारतील... >>

म्हणजे अपेक्षा काय आहे नक्की, त्या माणसाने स्वतःच्या बायकोला आणि मुलाला सोडून , घटस्फोट घेऊन हिच्याशी लग्न करावं की पहिलं लग्न तसंच ठेवून हिच्याशी दुसरा संसार थाटावा की हिच्याशी विवाहबाह्य संबंध ठेवावेत... ? तिन्ही गोष्टींपैकी कुठलीही गोष्ट झाली तर त्या माणसाची पत्नी आणि तिचे आईवडील आणि तुमच्या मैत्रिणीचे आईवडील - कुटुंब यांना भयंकर मनस्ताप होणार हे निश्चित आहे ... मग स्वतःच्या सुखासाठी इतक्या लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स निर्माण करायला तुमची मैत्रीण तयार असेल तर तो प्रचंड स्वार्थीपणा होत आहे , हे आधी कुणीतरी तिला समजवायला पाहिजे .

हे जर तो माणूस तिला दुसरी बायको / प्रेयसी म्हणून स्वीकारायला तयार झाला तर....

त्यांना फक्त शरीरसुख हवंय ते कधीपण तेवढच बोलून दाखवतात वगैरे. ; त्यांना विसरून जाणं मला शक्य होणार नाही आणि त्यांना हवं ते पण मी त्यांना देऊ शकणार नाही >>
तुमच्या पोस्टमध्ये सदर माणूस समजूतदार आहे , मला त्यांची काही चूक वाटत नाही इत्यादी इत्यादी एकीकडे म्हटलं आहे आणि दुसरीकडे तुमची मैत्रीण सांगत आहे - हा माणूस कुठलीही कमिटमेंट न करता फक्त फिजिकल रिलेशन ठेवू असं तिला सूचित करत आहे .... यातली खरी गोष्ट कुठली समजायची ? कारण या दोन गोष्टी परस्परविरोधी आहेत ...

जर ती व्यक्ती चांगली असेल तर ती असलं काही सूचित करणार नाही , इतकंच काय त्या मुलीला रिप्लाय देण्याच्याही भानगडीत पडणार नाही ... प्रयत्न सोडत नाही म्हटल्यावर अपमान करून / आईवडिलांना सांगण्याची धमकी देऊन / वाट्टेल त्या मार्गाने लांब ठेवील . ज्या अर्थी यामाणसाने तिच्याशी कॉन्टॅक्ट चालूच ठेवला त्याअर्थी गैरफायदा घेण्याचा हेतू असू शकतो .... इगो सुखावत असू शकतो ... मैत्रिणीला दुसरे पणाची बायको / सवत होऊन राहायचं आहे का ? त्या माणसाची बायको मुकाट्याने जाईल का त्याच्या आयुष्यातून .. यातून काहीही निष्पन्न झालं तरी कोणी ना कोणी दुखवणारच आहे , तुमची मैत्रीण शहाणपणाने ह्या सगळ्यातून बाहेर पडली नाही तर

She can possibly talk to his wife . Explain her obsessive love to her if the wife is okay with it?! they are all adults. Your friend should resolve this issue. Take her time before going on to other major decisions like career planning. From a perspective it looks like the guy is not really into her at present . Is she clear whether it is infatuation sexual attraction true love or she is seeking a lost male support figure like father guru? She has put her entire growth experience in the hands of this person . Should be prepared to face the Consequences. This will be a major learning experience for her. She will emerge stronger out of it. Best wishes

She can possibly talk to his wife .
>>

She possibly can. But then I'll be worried about the teacher. I'll be very, very worried about the teacher.
--
Given the wife isn't staying with him for about a year and may not return for another 3 or 4 months, that guy is only USING her to satisfy his ego. He's gonna ditch her soon. And then her condition will become worse.
Let her parents know. Let them know about all this before it's too late.

तुम्ही दोघी एकाच हॉस्टेल/पीजी/फ्लॅट मधे राहताय का?

• असाल तर आजच्याआज तुमच्या घरमालकांना हे सांगा.
ते तिच्या घरच्यांशी बोलून आजच्याआज तिला गावी घेऊन जा म्हणून सांगू शकतील. खरंतर तिला ऍडमिट केलं, तिच्या ताईला सांगितलं तेव्हाच उचलबांगडी करायला हवी होती.
तुमच्या घरच्यांनाही याबद्दल कल्पना द्या.

• नसाल तर तिच्या घरच्यांना सांगायचं असेल तर एकदा सांगून पहा.
नाहीतर तिच्यापासून दूर रहायला चालू करा.
ती काही तुमची जबाबदारी नाहीय. तुम्ही स्वतःचा अभ्यास-करिअरकडे लक्ष द्या.

तिला वाटतं की ते तिला कधीतरी नक्की स्वीकारतील... >>

म्हणजे अपेक्षा काय आहे नक्की, त्या माणसाने स्वतःच्या बायकोला आणि मुलाला सोडून , घटस्फोट घेऊन हिच्याशी लग्न करावं की पहिलं लग्न तसंच ठेवून हिच्याशी दुसरा संसार थाटावा की हिच्याशी विवाहबाह्य संबंध ठेवावेत... ? तिन्ही गोष्टींपैकी कुठलीही गोष्ट झाली तर त्या माणसाची पत्नी आणि तिचे आईवडील आणि तुमच्या मैत्रिणीचे आईवडील - कुटुंब यांना भयंकर मनस्ताप होणार हे निश्चित आहे ... मग स्वतःच्या सुखासाठी इतक्या लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स निर्माण करायला तुमची मैत्रीण तयार असेल तर तो प्रचंड स्वार्थीपणा होत आहे , हे आधी कुणीतरी तिला समजवायला पाहिजे .>>>>सहमत +१००

मैत्रिणीचे जाऊ द्या - तिचे नशीब जे होईल ते.. तुम्हाला माझा सल्ला - तुम्ही लांब रहा - हे बॅगेज तुम्हाला त्रास देतंय आणिtतुमचा वेळ खात आहे...
तुम्ही लांब व्हा तिच्यापासून....

आपल्या जिवाभावाच्या मैत्रिणीसाठी काही करावसं वाटतेय हे चांगल आहे. पण तुम्ही जी परिस्थिती सांगताय त्यावरून जास्त काही वाढण्याआधी तिच्या आई वडिलांना कळणे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही तिच्या पालकांना कळवा ते नक्कीच काळजी घेतील आणि काही दिवस गावी गेल्यावर ती पण भानावर येइल.
या सगळ्याचा मनस्ताप तुम्ही करुन घेऊ नका ज्यामुळे तुमच्या करिअरवर परिणाम होईल.

आपल्या जिवाभावाच्या मैत्रिणीसाठी काही करावसं वाटतेय हे चांगल आहे. पण तुम्ही जी परिस्थिती सांगताय त्यावरून जास्त काही वाढण्याआधी तिच्या आई वडिलांना कळणे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही तिच्या पालकांना कळवा ते नक्कीच काळजी घेतील आणि काही दिवस गावी गेल्यावर ती पण भानावर येइल.
या सगळ्याचा मनस्ताप तुम्ही करुन घेऊ नका ज्यामुळे तुमच्या करिअरवर परिणाम होईल. >>> +++1111

माझा सल्ला तुम्हाला कदाचित पटणार नाही पण प्रत्यक्ष उदाहरणे बघितलेत त्यावरून सांगतोय. मी कोलेजात असताना वर्गात एक मुलगी होती. अत्यंत हुशार व नेहमी ऐंशी पंच्यांशी च्या वर मार्क असत तिचे. तिचे एका सरांबरोबर संबंध होते. हे सर विवाहित होते व आम्हाला शिकवायला सुद्धा नव्हते तरीही त्यांचे कसे सुत जमले होते माहित नाही. हि गोष्ट तेंव्हा कुणालाही माहित नव्हती. कोलेज नंतर काही वर्षांनी एका घटनेमुळे ते आम्हाला समजले. पण तोवर आम्ही सगळे पासआउट झालो होतो व ती लग्न करून परदेशात निघून पण गेली होती. नंतर तिचा आमच्या कुणाशी कधीच संपर्क आला नाही.

दुसरी एक मुलगी पीजी ला होती. तिचे दोन सिनियर मुलांबरोबर संबंध होते. आणि हद्द म्हणजे कधीकधी तर ते तिघेही एकांतात एकत्र भेटून वेळ घालवत असत. आता हि मुलगी लग्न झाले आहे (तो तिचा नवरा पुन्हा कोणी वेगळाच आहे. या दोघांपैकी नाही). चांगला जोब करतेय. व्यवस्थित संसार सुरु आहे. असले काहीही ती आता करत नाही. करीयर मध्ये खूप भरारी घेतली आहे.

तात्पर्य काय तर जे काय करायचे ते करा. त्यातच अडकून पडू नका. ते करून अभ्यासवर व करीयरवर मुख्य फोकस करा. भूक लागलेली असेल तर हॉटेलच्या दारात उभे राहून दिवसभर नुसता खमंग वास घेत वेळ घालवण्यात अर्थ नाही. आत जा. मनसोक्त जेवा. बाहेर या. पुन्हा आपल्या कामाला लागा. हॉटेलवाला जेवायला आत बोलवतोय. तर हे म्हणतात, आधी बाकी सगळ्यांना बाहेर काढा मला फक्त एकट्याला जेवायचे आहे. कसे जमेल?

सरांचं निर्णय बरोबर आहे. नवीन भेटलेल्या मुलीसाठी लग्न मोडून कोणीही अफेअर करणार नाही. ते तिच्याशी एकत्र वेळ घालवायला तयार आहेत. ते तिने स्वीकारावे. फक्त समाजापासून लपवून ठेवणे हो मोठी जोखीम आहे. अशा केस मध्ये बदनामी झाल्याने आत्महत्या केल्या आहेत. कारण समाज व्यवस्था हलकट आहे. काही हपापलेले हXमी ज्यांना कोणी मिळालेली नसते असे लोक मग संस्कृतीच्या नावाने बोंब मारतात आणि प्रेमात पडलेल्यांची बदनामी करून त्यांचे जगणे मुस्खील करतात आणि आत्महत्या करायला भाग पाडतात. तेंव्हा ती काळजी आपण घ्यायला हवी बाकी काही नाही. भयंकर जोखीम आहे. ज्यांना झेपते ते करतात. झेपत नसेल तर डोक्यातून विषय काढून टाका.

जीवन इसका नाम है प्यारे तुझे है आगे चलना रे
https://www.youtube.com/watch?v=f36obvKdZGg

हे गाणे तुमच्या मैत्रीनला ऐकवा.

धन्यवाद सुजा,विरू,radhanisha, ॲमी,अमा,जावेद खान, कनिका, च्रप्स,नीलाक्षी, ssj..
सुजा - त्यांचं लग्न झालंय हे कुणालाच माहिती नव्हते त्यामुळे हीच त्यांच्यावर प्रेम करण इतकं मनस्ताप देणार नव्हत पण त्यांचं लग्न झालंय हे माहिती झाल्यानंतर सुद्धा ही त्यांच्याच विचार करतेय म्हंटल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली..
विरू - हो.. मी या वर्षीची मेन्स दिलीय निकालानंतर इतर पर्यायंचा नक्की विचार करेल..
Radhanisha- त्यांना काय हवयं हे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं ते प्रेमाचं नाटक करून तिला फसवू देखील शकले असते म्हणून मला त्यांची चुकी वाटत नाही..ही त्यांना सारखं काँटॅक्ट करून त्रास देतेय ही मी स्वतः पाहिलंय..
Ama-तिचे निर्णय रोज बदलतात आज तिला त्याला विसरायचं असत उद्या आठवण येत असते परवा अभ्यास करायचा असतो..she is not stable right now..
जावेद खान - exactly..
त्यांच्या वाइफ ला सांगितलं तर त्यांचे भांडणे होतील शिवाय त्यांना बाळ सुद्धा आहे..आणि चुकी माझ्या मैत्रिणीची जास्त आहे अस मला तरी वाटतं..
ॲमी - आम्ही एकत्र राहत नाही..काही दिवस आणलेलं तिला माझ्याकडे..तुमच्या सगळ्यांचे विचार ऐकून मी खरेच तिच्याकडे लक्ष न देण्याचं ठरवलंय आता..आजच तिच्या आईला सांगितले की तिला घरी घेऊन जा काही दिवस..
कनिका- अपेक्षा इतकीच की त्यांनी तिला वेळ द्यावा..तिच्याशी बोलावं..काळजी करावी..( movies pahun dokyawr parinam zalay tichya..sgla filmy vichar krte murkhasarkha)
च्रप्स- हो ..नक्कीच..माझा इंटरव्ह्यू असेल जनवरी मधे..मी खरच दूर राहणार आहे आजपासूनच..
नीलाक्षी, ssj- मनस्ताप तर खरच झालाय खूप दिवस वाया गेली..
आता सांगितलय तिच्या घरी..ते सांभाळून घेतील अस वाटत..

विरू - हो.. मी या वर्षीची मेन्स दिलीय निकालानंतर इतर पर्यायंचा नक्की विचार करेल..>> तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.

परिचित - तिची प्रेमाची व्याख्या काय मला तरी माहिती नाही..पण इतकं नक्की की तिला शारीरिक आकर्षण नाहीय..बाकी मी आता हा विषय इथेच संपवायचा निर्णय घेतलाय..माझ्या परीने तिला यातून बाहेर पडायला मी भरपूर कष्ट घेतले बाकी तिचा निर्णय..
माझा अभ्यास बरा आणि मी बरी..
तुमचा सल्ला नाही आवडला पण मदत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद..!

पण इतकं नक्की की तिला शारीरिक आकर्षण नाहीय
>>> निसर्गाच्या नियमानुसार योग्य वयात आल्यानंतर भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल मुलीना मानसिक आकर्षण तर मुलांना शारिरीक आकर्षण निर्माण होते. त्यामुळे जे आहे ते बरोबरच आहे. सुरवात अशीच होत असते. मी दिलेल्या उदाहरणांमध्ये व इतर अनेक केसेस मध्ये सुद्धा तसेच होते कारण निसर्गनियमच तसा आहे. माझा मुद्दा इतकाच कि ह्यात अडकून न पडता पुढे चालावे. अर्थात तुम्हाला पटणार नाही आणि मला ते अपेक्षित होतेच. असो. त्यांना आणि तुम्हाला करीयर साठी भरपूर शुभेच्छा.

सरांना स्वतःचं लग्न झालंय हे स्पष्ट सांगून स्वतःकडून प्रामाणिक राहिल्याचं मनाला सांगून नो स्ट्रिंग ऍटॅच रिलेशनशिप हवीय.पण ते धोक्याचं आहे.त्यांचे कोणी फोटो काढून ब्लॅकमेल करू शकतं.बायकोला दाखवले तर लग्न तुटू शकतं.
प्रेमात पडलेली मुलगी आता नो स्ट्रिंग रिलेशनशिप ला तयार झाली तरी नंतर तिच्या मनात आशा निर्माण होऊन ती 'लग्नाचे आमिष दाखवून xxxx' वाल्या आरोपात अडकवू शकते.
सरांचे मन जास्त गुंतल्यास आणि पुढे मुलीने दुसऱ्या माणसाशी लग्न केल्यास ते ब्लॅकमेल करू शकतात.
एकंदर असे संबंध हा प्रचंड मोठा ट्रॅप आहे.त्याच्या शॉर्ट टर्म गेन पेक्षा लॉंग टर्म लॉस जास्त आहेत.या सर्वांची कल्पना मैत्रिणीला द्यावी आणि सरांना त्यांना ओळखणाऱ्या कोणी द्यावी.या उप्पर दोघांना फक्त मजा म्हणून संबंध चालू ठेवायचे असतील तर त्यांचे ते बघून घेतील.

All the best! तुम्ही बाहेर पडा ह्यातन. मैत्री कितीही महत्वाची असली तरी एका मर्यादेपेक्षा जास्त इनवोल्व झाल्यास त्रासदायक ठरते.

Mi_anu- अगदी पटतय मला हे..म्हणूनच मी यातून आता स्वतःला अलिप्त ठेवलंय..मी कितीही प्रयत्न केले तरी शेवटी तीच भविष्य तिलाच समजायला हवं..

रॉनी - हो प्रयत्न करतेय तिचा विचार करून मला सुद्धा त्रासच होतोय आणि अभ्यास होत नाहीये तो वेगळा..म्हणून मायबोलीकरांचे सल्ले ऐकून मी तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं ठरवलंय आता..

मला वाटतंय मी तिच्यासाठी जितकं करू शकत होते तितकं सगळ केलंय..एक मैत्रीण म्हणून मी तिची खरच मदत केली..आता बाकी ती स्वतः काय निर्णय घेते हे सर्वस्वी तिची जबाबदारी..
तुमच्या सगळ्यांचे खूप आभार..मला आता मी काय करायचं याच तर नक्की उत्तर मिळालंय..
हा धागा उडवला तरी चालेल..

मला वाटतंय मी तिच्यासाठी जितकं करू शकत होते तितकं सगळ केलंय..एक मैत्रीण म्हणून मी तिची खरच मदत केली..आता बाकी ती स्वतः काय निर्णय घेते हे सर्वस्वी तिची जबाबदारी..
तुमच्या सगळ्यांचे खूप आभार..मला आता मी काय करायचं याच तर नक्की उत्तर मिळालंय..
हा धागा उडवला तरी चालेल>>>

खूप छान क्लोजर दिलेत तुम्ही तुमच्या प्रश्नाला. तुमच्या परीक्षेसाठी व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!!

धागा उडवायचा असेल तर अडमीनना सांगा. आपण आपले धागे संपादन करण्याची सोय फक्त थोडे दिवस असते. त्यानंतर फक्त अडमीन ही कामे करू शकते.