सल्ला हवा आहे

Submitted by राजेंद्र on 10 December, 2019 - 07:31

मी B.Com आहे (वय ५० वर्ष). मला आता टूर्स अँड ट्रॅव्हलिंग किंवा फूड इंडस्ट्री मध्ये काही तरी शिकण्याची इच्छा आहे ते शक्य आहे का? एवढी वर्ष समजत नव्हतं कि Accountancy नाही तर काय करणार.
मला इंग्लिश बोलता येत नाही
मला माहिती आहे कि हे शिकणं फार सोपं नाही, कदाचित जमणार नाही पण प्रयत्न करणार आहे.
कृपया सल्ला द्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सल्ला आगाऊपणाचा वाटेल परंतु केवळ इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे भारतात अनेक गुणी माणसं न्यूनगंडाने पछाडलेली आढळतात.

लक्षात ठेवा इंग्लंडात जन्माला आलेला प्रत्येक माणूस किंवा मूल काही "बॅरिस्टर" नसतं. त्यांना उत्तम इंग्रजी बोलता येतंच कि.

आपण मनात आणलं तर एक वर्षात आपण अस्खलित इंग्रजी बोलू शकाल. याबरोबरच आपण टूर्स आणि ट्रॅव्हलिंग चा किंवा फूडचा ऑनलाईन कोर्स करू शकाल आणि एकदा दोन्ही जमलं कि टूर्स आणि ट्रॅव्हलिंग चा किंवा फूडचा पूर्ण अभ्यासक्रम करू शकाल.

कोणतंही वय हे शिकण्यासाठी "जास्त" नाही.

आमच्या वडिलांचा मित्र अत्यंत गरिबीतून वर येऊन नोकरी करता करता वयाच्या ५३ व्या वर्षी पी एच डी झाला आणि शेवटी मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा प्रमुख म्हणून सन्मानाने निवृत्त झाला.

जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यातर्फे कोर्सेस चालवले जातात. केवळ कोर्स करून लगेच व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे आधी या क्षेत्रात काही दिवस काम करून खाचाकोचा जाणून घ्या. नंतर कोर्स करा.

मी तुमचे प्रोफाईल पाहिले. सोशल मीडीयाचा वापर कसा करावा हे तुमच्याकडून शिकावे. तुम्ही शंका विचारण्यासाठी, माहिती घेण्यासाठी केलेला उपयोग स्तुत्य आहे. तुम्ही ते अंमलात आणत असाल नक्कीच.

व्यवसाय सुरू करावा अशा विचाराप्रत आलात म्हणजे तुम्ही नेमक्या कोणत्या टप्प्यावर आहात हे समजत नाहीये. दोन्ही वेगळे उद्योग आहेत आणि पूरक देखील. खूप माहिती घेत बसल्यानेही व्यवसाय करता येत नाही. कधी कधी व्यवसायात पडल्यानंतर खाचाखोचा समजतात. कुणा कुणाचा धंदा चालतो, कुणाचा नाही.

तुम्ही स्वतः धंद्यासाठी फिट आहात का याची चाचपणी करा. व्यवसाय म्हटला की पायाला भिंगरी आली. घरच्या जबाबदा-या, आवडीनिवडी यांच्याशी तडजोड आली. सतत काहीतरी नवीन करणे, माणसांचा संग्रह करत जाणे, वाद घालण्यावर मुरड घालता येणे असे अनेक गुण लागतात.

सुरूवातीला धार्मिक सहली आयोजित करा. अलिकडे अनेक पुढारी अशा सहली आयोजित करतात. तुम्ही त्यांच्या संपर्कात असाल तर धंदा मिळेल. नाहीतर मग जाहीराती देऊन धार्मिक सहलीत कमी मार्जिनवर सुरूवात करावी. यातूनच पुढे तुमच्या व्यवसायाला ग्राहक वर्ग मिळू शकतो. सहलीच्या व्यवसायालाच पूरक धंदा जेवण, खाण, चहा, नाश्ता हा आहे. या ओळखी जपल्या तर नव्या धंद्याला बरकत येईल.

मोठ्या प्रमाणावर जर धंदा सुरू करायच्या विचारात असाल तर माझा पास. कारण त्यासाठीची आर्थिक गुंतवणूक, मार्केटिंग एजन्सीजची निवड, वितरण व्यवस्था, जाळे यावर मी बोलू शकत नाही.

नुसताच कोर्स करायचा आहे कि त्या शिकण्यामागे काही व्यवसाय करण्याचं उद्दिष्ट आहे ते पोस्ट वरून नीट समजत नाहीये

नुसतच शिकायचं असेल तरी कुठल्याही वयात तुम्ही काहीही शिकू शकता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे . शिक्षणाला वयाचं बंधन नाही पण जर का कोर्स करून तुम्हाला त्या मधून काही कमवायचं असेल. तर मात्र टुरिझम चा कोर्स करू शकता. तो जास्त फायदेशीर आहे असं वाटतय . कोर्स केल्यानंतर एखाद्या छोट्या टुरिझम कंपनीमध्ये ( मात्र केसरी किव्वा वीणा नाही कारण तिथे या एज ला घेणार पण नाहीत ) थोड्या काळाकरता जॉब करून त्यातल्या खाचाखोचा समजून घेऊन नंतर केसरी किंवा वीणाची फ्रँचायझी घेऊ शकता. कोर्स मध्ये तुमच्या बरोबर जो कोणी विधार्थी असेल त्याला पार्टनर शिप मध्ये घेऊन फ्रेंचायची सुरु करू शकता आणि आधी कुठे तरी अनुभव घेतल्यामुळे आणि त्यातलं शिक्षण असल्याने तुम्हाला व्यवसाय करण पण सोप्प जाऊ शकेल . पार्टनरशिप मध्ये फ्रँचायझी घेतलीत तर एकट्यावर बोजा पण पडणार नाही असं वाटत . केसरी भाऊंनी स्वतः त्याच्या वयाच्या ४९- ५० वयामध्ये केसरी कंपनी सुरु केली होती

बाकी फूड इंडस्ट्री बद्दल काही कल्पना नाही . तुम्हाला शुभेच्छा Happy

राजेंद्र दादा
तुमचा काय प्लान आहे ते बी लिवा की. तसं कसं पब्लीक सांगू शकतंय व्हय ?
तुम्हाला पाच धा रुपै घालायचं हैत, का करोडो रूपै घालायचंत हे समजल्याबिगर कोण कसं काय सांगणार ?
फूड इंडस्ट्री म्हंजी नेमकं काय दादा ?
चिप्स, मूगडाळ, भुजियां अशी पाकीटं का चकल्या, गुजराती फाफडा, ढोकळा असे पदार्थ
का रेस्टॉरंट की वडापावचं मोठं आउटलेट ...

नेमकं काय हाय डोस्क्यात ?
किडा केव्हढा हाय ?

ट्रॅव्हल कोर्स IATA साठी वयाची अट नाही. शैक्षणीक पात्रता 12वी. याची फी 70-80 हजार आहे, पण जॉब लगेच मिळेल किंवा घरबसल्या टीकेटिंगची काम करून पण चांगले पैसे कमावता येतील. अर्थात ओळखीतून काम मिळत मिळत जम बसयला वेळ लागेल.

तुमच्या सर्वांच्या तात्काळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद व मला प्रतिसाद द्यायला उशीर झाला म्हणून मला माफ करा.
सहा सात वर्ष्यापुर्वी मी असाच सल्ला विचारला होता कि पुढच्या आयुष्यात काय करावं ? सगळ्यांनी यौग्य सल्ले दिले होते.
पण मला समजत नव्हत कि B.Com नंतर Accountancy नाही तर काय करणार.
आत्ता तीन ते चार महिन्यापासून असे वाटत आहे कि टूर्स अँड ट्रॅव्हलिंग किंवा फूड इंडस्ट्रीज किंवा केटरिंग मध्ये मला इंटरेस्ट आहे, मला त्यात काही तरी जमू शकेल असे वाटते
मी एका छोट्या कंपनीत २३ वर्षे डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत आहे. २३ वर्ष्या नंतर माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच skill नाही, या कंपनीत फारसं काम नसतं बराच वेळ बसून राहण्यात जातो आजून काही वर्ष जरी या कंपनीत राहिलो तरी काहीही प्रगती होणार नाही म्हणून वाटत आहे कि टूर्स अँड ट्रॅव्हलिंग किंवा फूड इंडस्ट्री किंवा केटरिंग मध्ये ज्यात मला थोडा इंटरेस्ट आहे त्यात काही प्रगती करू शकेन.
आत्ता तरी वाटत नाही कि मोठा काही business करू शकेन.
ऑनलाइन tourism चा कोर्स करणार (हा ऑनलाइन tourism चा कोर्स कोणता ते कृपया सांगा) व एखाद्या लहान tourism च्या कंपनीत पार्ट time जॉब करणार म्हणजे त्यातल्या खाचा खोचा समजतील
व छोट्या स्वरूपातील business करणार. किंवा हे जमलं नाही तर फूड industry किंवा केटरिंग चा छोट्या स्वरूपातील business करणार. मी हे आत्ताच्या कंपनीतून बाहेर पडण्यासाठी व नवीन काही तरी शिकण्यासाठी करत आहे.

बंगलोरमध्ये ज्यांना कॅटरिंग चा व्यवसाय करायचाय ते घरातून पण व्यवसाय करतात. केक, चॉकलेट, लहान-मोठ्या पार्टीज च्या ऑर्डर, रोज संध्याकाळी snacks, weekend ला लंच-डिनर असा स्मॉल स्केल जास्त गुंतवणूक नाही.

हे जमले नाही तर ते करीन असा विचार असेल तर मग काहीच जमणार नाही. करीन तर हेच करीन, पाहू कसे जमत नाही असा विचार करुन विचारपुर्वक एखाद्या व्यवसायात उतरा. नक्की जमेल. जमायलाच हवे.
शुभेच्छा!

टूर्स अँड ट्रॅव्हलिंग - या धंध्यात टुअर ग्रुप लीडर लागतात पण ते काम करायला तरुण फारसे उत्सुक नसतात कारण फिरतीची नोकरी. यासाठी इंगरजी फाडफाडची गरज नाही/नसते. कोर्सचीही गरज नाही. ग्रुपबरोबर जायचे आणि परत यायचे. सुरुवातीला ज्या ट्रीपा देतील त्या पूर्ण करत गेलात की या धंध्यातले 'फिक्सिंग' आणि 'ठरलेल्या ट्रिपसाठी शिटा भरण्याचे कौशल्य' माहिती पडेलच.
पण आताचा जॉब सोडल्याशिवाय नाही. कमावता कमावता शिकाल. पैसे न गुंतवता.

बंगलोरमध्ये ज्यांना कॅटरिंग चा व्यवसाय करायचाय ते >>>> "कॅटरिंग" की केटरिंग ???? कॅट्=मांजर, रिंग्=घंटा; मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?

पद्मनाभ,
हे जमले नाही तर ते करीन असा विचार असेल तर मग काहीच जमणार नाही - तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण, टूर्स अँड ट्रॅव्हलिंग किंवा फूड इंडस्ट्री किंवा केटरिंग मधले मला काहीच माहिती नाही म्हणून मी लिहिलं. काहीच करणार नसतो तर हा धागा काढलाच नसता.
शरद,
घरातल्या प्रॉब्लेम मुळे ट्रॅव्हलिंग साठी बाहेर जाता येईल असे वाटत नाही. पुण्यातूनच ट्रॅव्हलिंग चे काम करावे लागणार
ऑनलाइन tourism चा कोणता कोर्स ते कृपया सांगा.