Submitted by मन्या ऽ on 8 October, 2019 - 15:29
आपल्या सण-वारांतुन नेमकं अपेक्षित ते काय??
रात्रीच्या साडेबारापर्यंत मोठ्या आवाजात डिजे आणि साऊंड लावुन दांडीयाच्या नावाखाली विक्षिप्त गाणी लावुन नाचत राहण किती योग्य आहे?
आमच्या कॉलनीत गेले 5 वर्ष नवरात्रीचा कार्यक्रम साजरा होत आहे.पण होणार्या त्रासाचा आलेख मात्र चढत्या क्रमाने आहे.या मंडळातर्फे गेल्या 9 दिवसांत फक्त अष्टमीच्या दिवशी पैठणीचा खेळ घेण्यात आला.फक्त लहान मुलांसाठी म्हणुन कोणताच खेळ /उपक्रम घेण्यात आलेला नाही.
तर गणपती,नवरात्रीसारखे सण तद्दन भंगार गाणी,विचित्र डान्स आणि लाऊड म्युझिकपुरतेच मर्यादित राहिलेत का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मजा येते दांडिया मध्ये
मजा येते दांडिया मध्ये नाचायला. मी रात्री दहा ते सकाळी चार पर्यंत नॉन स्टॉप नाचायचो...
न पिता नशा चढते... मस्त धुंदी...
ह्यात सणावारांचा काय दोष? ते
ह्यात सणावारांचा काय दोष? ते काय डीजे लावून सांगतात साजरे करायला?
हे धार्मिकतेच भांडवल करुन
हे धार्मिकतेच भांडवल करुन साजरा केलेला
उन्माद आहे. याचा धर्माशी संबंध नाहि.हे बेकायदेशीर आहे
ज्या सेलेब्रेशन मधे / उत्सवात
ज्या सेलेब्रेशन मधे / उत्सवात आपण सामील नसतो तो त्रासदायक वाटतोच.
मग गरबा असो, क्रिकेटची जिंकलेली मॅच असो, रात्री बारा वाजता केक कापून केलेला आरडाओरडा असो.
कोणीतरी म्हणून गेलंय "बी द चेंज दॅट यु वाँट टू सी"
तर आयोजनात सामील व्हावे आणि बदल घडवून आणायचा प्रयत्न करावा.
हर्पेन +१
हर्पेन +१
ज्या सेलेब्रेशन मधे / उत्सवात आपण सामील नसतो तो त्रासदायक वाटतोच.>>>>>>>> ह्याला तर अगदीच अनुमोदन. मी नाचत नाहीये, गरबा दांडिया खेळत नाहीये तर काय धांगडधिंगा केवढा आवाज वाटतं. पण मी स्वतः सामील असल्यावर उत्साह ओसंडुन जात असतो.
हर्पेन, प्रतिसाद आवडला.
हर्पेन, प्रतिसाद आवडला. सणांची एक वेगळीच मजा असते, मलातरी खुप आवडते असे सण साजरे करायला. आमच्या कॉम्लेक्समधे नवरात्रीत देवी बसवतात, ती तयारी, एक - दोन महीने आधी पासुन सुरु होते. लहान मुले, बायकांसाठी विविध उपक्रम असतात, खेळ असतात. सगळे जण कामे वाटुन आंनदाने करतात. किती ऊत्साहात असतात सारे. गाण्यांचे म्हणाल तर तीही चांगली असतात. अन फक्त आमच्याकडेच नाही तर आमच्या दोन्ही गेटच्या अगदी जवळ म्हणजे २-५ मिनिटांवर दोन सार्वजनिक मंडळे आहेत. आम्हाला तरी थिल्लरपणा वगैरे जाणवला नाही. आता गरबा म्हणाल तर काळानुसार गाणीही बदलतातच, त्यातही अजुन तरी पारंपारिक गाण्यावरही दांडीया अन गरबा खेळतातच की. खुप छान अन पॉझिटीव्ह वातावरण असते सणांत. ऊलट कालच्या मुर्ती विसर्जनानंतर खुप खाली खाली ऊदास वाटतेय
Vb>> अगदी सहमत.
Vb>> अगदी सहमत.
मला सणावारातून चांगले चमचमीत
मला सणावारातून चांगले चमचमीत जेवण अपेक्षित आहे. मराठी सणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सणाची सिग्नेचर डिश वेगळी आहे. होळीची पोळी असेल तर चैत्र पाडव्याची बासुंदी. कुठलेच पक्वान्न रिपीट टेलेकास्ट होत नाही.।
बाकी लोकांचा धागडधिंगा प्रकरण - लोकांना हल्ली हेच आवडतं, ते केलं नाही म्हणजे एन्जॉय केलं नाही हे समीकरण।आहे. त्यामुळे गणपतीपुढे जितके बेफाम नाचतात तितकेच माळशेजच्या धबधब्याखाली नाचतात. सण = धार्मिक = गांभीर्य हे समीकरण त्यांच्यापर्यंत अजून पोचले नाही. कधी पोचेल का हे माहीत नाही.
आणि जोवर आपण त्यात नसतो तोवर(च) तो धांगडधिंगा असतो त्यामुळे आपल्याला त्रास वाटला तरी जे करताहेत त्यांना माहीतही नसतं ते त्रासदायक काहीतरी करत आहेत. रात्री 11 वाजता लाऊड लाऊडस्पीकर्सच्या आवाजात नाचणाऱ्या शेकडो लोकांना त्रास होऊन ते मैदान सोडून पळ काढतील, असे कधीतरी होईल अशी आशा ठेवायची.
आमच्या कॉलनीत गेले 5 वर्ष नवरात्रीचा कार्यक्रम साजरा होत आहे.पण होणार्या त्रासाचा आलेख मात्र चढत्या क्रमाने आहे.या मंडळातर्फे गेल्या 9 दिवसांत फक्त अष्टमीच्या दिवशी पैठणीचा खेळ घेण्यात आला.फक्त लहान मुलांसाठी म्हणुन कोणताच खेळ /उपक्रम घेण्यात आलेला नाही
पुढच्या वर्षी तुम्ही संयोजनात सामील व्हा.
@च्रप्स धुंदी चढते हे खरं
@च्रप्स धुंदी चढते हे खरं असलं तरी त्या धुंदीत वेळेचं भान असायला हवं इतकंच माझ म्हणण..
@रॉनी,इतरांना त्रास होईल अशाप्रकारे डिजे लावुन सणवार साजरे करण्याची पद्धत कितीपत योग्य आहे? असा माझा प्रश्न आहे..
प्रतिसादासाठी धन्यवाद!
@प्रकाश घाटपांडे,


हे धार्मिकतेच भांडवल करुन साजरा केलेला उन्माद आहे.. धर्माचा यात संबंध नाहि. हे बेकायदेशीर आहे>> तुम्हाला नेमक काय म्हणायचं आहे ते मला कळालं नाही.. असो. प्रतिसादासाठी धन्यवाद!
@हर्पेनकाका प्रतिसाद पटला..
पुढच्या वर्षी सामील होण्याचा नक्की प्रयत्न करेल..
सस्मित,प्रतिसादासाठी धन्यवाद!
आपल्या सण-वारांतुन नेमकं
आपल्या सण-वारांतुन नेमकं अपेक्षित ते काय?? >>>>> चार जणांची करमणूक आणि बाकी सगळ्यांचा छळ.
हे जे वर सगळ्यांनी लिहिलं आहे ना की बदल हवा तर संयोजनात सामील व्हा, ते खरंच प्रत्येक वेळेस शक्य आहे का? हल्ली उठसूट सगळेच सण सार्वजनिक करायची प्रथा चालू झाली आहे. वेळ नाही म्हणून अगदी बारा महिन्याच्या बारा सणाबद्दल लिहीत नाही, पण उदा. होळी सार्वजनिक, मग रंगपंचमीला सुद्धा स्पीकर्स लावून रंग खेळायचे त्याशिवाय झिंग कशी येणार, मग (महाताप) गणपती उत्सव सार्वजनिक, मग नवरात्री, मग कोजागिरी, मग ते नवीन फॅड देवीची तोरणं वाजतगाजत ट्राफिकचा विचार न करता न्यायची. 31 डिसेंबरला जेन्यूईन काम असेल तरी जीव मुठीत घेऊन गाडी चालवण्यापेक्षा घरात बसून रहायचं. हो गणपती आधी एकेक महिना ढोलताशा प्रॅक्टिस आहेच की. यापैकी कोणकोणत्या संयोजनात सामील होणार? मग नोकरी उद्योग सोडून, शाळेच्या परीक्षा आणि घरच्या जबाबदाऱ्या सोडून फक्त उत्सवच करावे लागतील. आणि जे वृद्ध एकेकटे समाजात रहातात, त्यांनी स्वतःला सांभाळायचं, आवाजाने चढणाऱ्या BP ला कन्ट्रोल करायचं की संयोजन समितीत नाचायचं? सार्वजनिक उत्सवाचा उद्देश संपला आहे त्यामुळे ते कठोरपणे बॅन करायला हवेत. नाही तर थोड्या लोकांचा उन्माद बाकी सगळ्यांसाठी उच्छाद असतो.
@VB, आमच्या इथे मंडळात
@VB, आमच्या इथे मंडळात लहानमुलांचा उत्साह दांडगा असतो पण त्यांना त्यांच्यासाठी खास असे उपक्रम गेल्या 2-3 वर्षात झालेले नाहीत..
गेले 9 दिवस मुलं हातात टिपर्या घेऊन रेंगाळत उभी असायची..
बायकांसाठी म्हणुन दरवर्षी पैठणीचा खेळ असतो.बायकांना तेवढाच काय तो विरंगुळा..
@श्रद्धा प्रतिसादासाठी धन्यवाद!
@साधना, रात्री 11 वाजता म्हणजे खुपच लवकर
काल 1 वाजेपर्यत सोहळा सुरु होता.
पुढच्या वर्षी उत्सवात सहभागी होण्याचा मानस आहे.. बघु आज वाटणारा त्रास पुढच्या वर्षी आनंद देईल का..
@मीरा.. मला जे म्हणायचे आहे.ते सर्व तुम्ही तुमच्या प्रतिसादातुन स्पष्टपणे मांडले.खरंच खुपसारे धन्यवाद!

काही ठिकानी तर रस्त्या वर
काही ठिकानी तर रस्त्या वर थोड्या थोड्या अंतरावर मंडळे गणपती बसवतात आणी तिथे स्पीकर वर मोठमोठ्याने गाणी लावतात. गणपती गेल्यावर तोच मांडव देविसाठी तसाच ठेवतात. गणपती मिरवणूकीत गणपती ची गाणी न लावता कोणतीही गाणी लावतात. ज्याचा आणी देवाचा काहीही संबध नसतो. अशी लोक सण हे परंपरा आपली संस्कृती जपणे भक्ती भाव यासाठी नव्हे तर केवळ आणी केवळ आपल्या मनोरंजना साठी करतात.
डिजे लावुन नाचत राहतात traffic होते सगळे.
बद्दल होण्यासाठी संयोजनात सामिल होणे शक्य नसते. आपली मते लोक एकतिल असे नाही. आणी किती ठिकानी होणार.
सार्वजनिक उत्सवाचा उद्देश संपला आहे त्यामुळे ते कठोरपणे बॅन करायला हवेत. नाही तर थोड्या लोकांचा उन्माद बाकी सगळ्यांसाठी उच्छाद असतो . अगदी बरोबर मीरा .
दुसर्यना त्रास न होता चांगल्या प्रकारे सण साजरे करु शकतो आणी त्याचा आनंद ही घेऊ शकतो.
मन्या, विषय उत्तम आहे.
मन्या, विषय उत्तम आहे.
मलाही या पध्दतीचा त्रास होतो. सणांच्या नावाखाली मोठ्या कर्कश्श आवाजात गाणं लावून नाचणे ना आपली संस्कृती आहे, ना त्याने काही चांगला उद्देश पुर्णत्वास जातो.
वृद्ध लोकांना, आजारी व्यक्तींना, काम करून दमलेल्या लोकांना झोपही घेता येत नाही त्या लाऊड स्पिकरच्या गोंगाटामुळे.
सणांच्या नावाखाली मोठ्या
सणांच्या नावाखाली मोठ्या कर्कश्श आवाजात गाणं लावून नाचणे ना आपली संस्कृती आहे, ना त्याने काही चांगला उद्देश पुर्णत्वास जातो. ख र आ हे. पण १८ - 30 वयोगटाला मजा येते नाचायला, मस्त धुंदीत रहायला . हे समजून जर safe and affordable areas तयार केले तर कोणाला त्रास न होता लोकाना मज्जा करता येइल.
साधना , तु म्हणतेस की काही
साधना , तु म्हणतेस की काही अंशी खरे असले तरी बर्याच लोकांना, विशेषतः वयस्कर लोकांना आणी लहान मुलांना याचा खरच त्रास होतो. बर्याच वेळा या आवाजाने घरात कोणी बोलत असले तरी कळत नाही. डिजे मुळे घराच्या भिंती हादरतात, लहान मुले दचकतात.
खरे तर नवरात्री असो वा गणपती हे मोठ्या मैदानातच साजरे केले जावेत, त्यांना वेळेचेही बंधन असावेच. कारण नवरात्री म्हणले की परीक्षांची पूर्व तयारीचा काळ असतो. माझी मैत्रिण जिथे रहाते तिथे मोठे मारुती मंदिर आहे. तर तिथे उत्सवाच्या वेळेस ( हनुमान जयंती ) तिथल्या नगरसेवकाने चक्क उ. प्रदेशातुन लोक प्रवचन व रामकथेकरता बोलावले. मोठे स्पीकर ठेवले. पण हे नाही लक्षात घेतले की त्याच वेळेस ८-९ वी च्या परीक्षा पण आहेत. दररोज मोठा आवाज असायचा म्हणे. आधी २ दिवस गर्दी होती, मग कोणीच येईना.
उत्सवात रंग असावा, कोणाचा बेरंग होऊ नये हीच अपेक्षा.
ज्यांची त्यांची आवड, सुरेल
ज्यांची त्यांची आवड, सुरेल गाणी लावून नाचा की कर्कश ढोल ताशात कर्कश किंकाळ्या फोडून नाचा, तासभर नाचा की आख्खी रात्र जागवून नाचा पण आपल्या आंनदोत्सवाचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
बंद सभागृहे, जिथे शक्य आहे तिथे गावा बाहेरील रिसॉर्टस वगैरे किंवा अजून काही सुचतं का पहा.
आम्ही पण मध्ये येऊन थोडावेळ था था थैया करून जाऊ जमेल तसे.
ज्या सेलेब्रेशन मधे / उत्सवात
ज्या सेलेब्रेशन मधे / उत्सवात आपण सामील नसतो तो त्रासदायक वाटतोच.
मग गरबा असो, क्रिकेटची जिंकलेली मॅच असो, रात्री बारा वाजता केक कापून केलेला आरडाओरडा असो.
कोणीतरी म्हणून गेलंय "बी द चेंज दॅट यु वाँट टू सी"
तर आयोजनात सामील व्हावे आणि बदल घडवून आणायचा प्रयत्न करावा.>>>>>
खूप आवडला तुमचा प्रतिसाद .
https://youtu.be/8uu6kEcXa4o
https://youtu.be/8uu6kEcXa4o
हे पहा
<<< रात्री 11 वाजता म्हणजे
<<< रात्री 11 वाजता म्हणजे खुपच लवकर Wink काल 1 वाजेपर्यत सोहळा सुरु होता. >>>
फोन उचला आणि पोलिसांना कळवा. इथे धागा काढून काय होणार आहे?
उपाशी बोका तुमचा पर्याय मला
उपाशी बोका तुमचा पर्याय मला जरी मान्य असला तरी माझ्या आईवडीलांना नाही.त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला इथेच राहायचं असेल तर एवढंतरी सहन करवंच लागेल..
रश्मी, त्रास होतो हे मला
रश्मी, त्रास होतो हे मला माहित आहे ग, मी गरब्याला जाणे केवळ त्या भयंकर आवाजामुळे बंद केले, मला छातीत धडधडायला लागायला लागले ग्राउंडवर गेल्यावर. आणि हे वयपरत्वे असण्याचा संभव खूप आहे.
पंचविशी-तिशीत असताना घर बदलले व बिल्डिंगच्या दारातच गरबा रंगायला लागला. दोन दिवस कानावर उशी दाबून झोपले. तिसऱ्या दिवशी मीही उडी घेतली गरब्यात आणि मला चक्क तो आवडायला लागला.
आवाजाचा त्रास होईनासा झाला. पण आता पुलाखालून बरेच पाणी गेलंय
. इथे नव्या मुंबईत जिथे आदल्या वर्षी मला गरब्यात बक्षिस मिळाले होते तिथे पुढच्या वर्षी पाच मिनिटेही उभे राहवेना. कदाचित दिवसेंदिवस आवाजाची पातळी उंचावत असावेत. नशिबाने माझी कॉलनी आवाजमुक्त आहे, पण जिथे हे सगळे होते तिथल्या लोकांची दया येते.
मSन्या, संयोजनात जा ह्यासाठी म्हटले की सगळ्यानाच काय कार्यक्रम ठेवावे हे सुचत नाहीत. सांस्कृतिक कार्यक्रम ठरवून ते पार पाडणे सोपे नाही. आमच्या बिल्डिंगीत आम्ही वेगवेगळी खाती केलेली, त्यामुळे मोजक्या चार संयोजक डोक्यांवर सगळा भार पडायचा नाही. कार्यक्रम ठरवायचे काम कल्पक व उत्साही लोक स्वतःहून मागून घ्यायचे किंवा त्यांना विनंत्या केल्या जायच्या. ते संयोजक नसायचे, पण कार्यक्रम आखून द्यायचे काम करायचे. गरबा 8 ला सुरू झाला तर 6 ते 8 या वेळात कार्यक्रम असायचे. गरब्यासाठी वेगवेगळ्या थिम्सही ठेवल्या जायच्या. आणि प्रत्येकाने आपल्या ग्रुपसोबत न नाचता एक मोठे रिंगण करून त्यात एकत्र नाचायचो. आत एक लहान रिंगण बाळ गोपाळांचे. मजा यायची हे सगळे करायला.
परवा दांडिया मध्ये गेलो होतो
परवा दांडिया मध्ये गेलो होतो.सगळे ग्रुप आपापले नाचत होते. काही ग्रुप एकदम मस्त प्रो नाचत होते.गंमत ही वाटते की दांडिया ला पण कोणतीही गाणी असतात.आमच्या सारख्या गरब्यात भोंडला डान्स करणाऱ्याना 'चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी बस तुम ही हो' किंवा 'भिगे होठ तेरे'सारख्या स्लो गाण्यांवर काय नाच करायचा हा प्रश्न पडतो.गरब्याला जरा नॉर्मल गरबा किंवा फास्ट गाणी का लावत नाहीत काय माहीत.सगळ्यांनी एक सर्कल आणि मध्ये लहान मुलं असं लहानपणी करायचे तसं केलं तर जास्त मजा येईल.इथे सगळे आपापल्या वेगळ्या चुली मांडून नाचतात.
आमच्या सोसायटीला लागून एका लॉन चे स्टेज आहे.लग्न होतात, होळीच्या दिवशी 9 ते 5 जोरदार डीजे असतो.(ज्यांना तक्रारींचे फोन करायचे ते पण तिथेच आनंदात असतात) बाकी वेळी त्रास नाही.लोक पटापट थोडा वेळ थोडा डीजे लावून लग्न करून उशिरा रात्री मंद इन्स्ट्रुमेंटल मध्ये जेवतात.
फोन उचला आणि पोलिसांना कळवा.
फोन उचला आणि पोलिसांना कळवा. इथे धागा काढून काय होणार आहे>>+111 हे मी केलं आहे एकदा. लॉची थर्ड इयर सेमिस्टर ची परीक्षा होती. बहुदा ऍड law किंवा लँड लॉ चा पेपर होता दुसऱ्या दिवशी. मध्यरात्री 12 वाजले तरी जोरजोरात लाऊडस्पीकर आणि दन्गा चालूच. पोलिसांना फोन केला पत्ता आणि मंडळाचं नाव सांगितले, त्यांना कॉर्डलेस वर आवाज ऐकवला. 10 मिनिटात पोलीस आले आणि सगळा फालतूपणा बंद केला.
आमच्याकडे दांडिया आणि गरबा या
आमच्याकडे दांडिया आणि गरबा या नॉनस्टॉप जुन्या गाण्यांवर चालतो.
पारस १०८ नॉनस्टॉप डिस्को दांडिया
https://m.youtube.com/watch?v=JQXUUeraCB8
गेले पंचवीस वर्षे वा अधिक हेच अविरत हिट आहे. यातले एखादे गाणे मी बाहेर कुठे ऐकले की नकळत मन पुढचे गाणे जोडायला लागते ईतके हे डोक्यात फिट्ट बसले आहे. जी अफाट धमाल लहानपणी नाचायला यायची ती आजही येते. लहान मुले मुली स्त्रिया वृद्ध सारे धमाल एंजॉय करत नाचतात. छान छान कपडे घालून, देवीची आरती आणि त्यानंतर प्रसादाचा भरपेट नाश्ता. अष्टमीला होम असतो. महाप्रसादाचे जेवण असते. द्सरयाच्या आदल्या रात्री वेशभूषा स्पर्धा असते. बाहेरच्या मुलीही बिनधास्त नाचायला येतात ईतकी गैरप्रकार होणार नाहीत याची हमी असते. वेळ झाली की रुटीनप्रमाणे वेळेची आठवण करून द्यायला पोलिसमामा येतात. त्याक्षणीच खेळ थांबवला जातो. शेव्टच्या द्सरयाच्या दिवशी मात्र थांबूच नये असे वाटते. पोलिसमामाही मग एक एक्स्ट्रा झिंगाटचे गाणे होऊ देतात. मनात कोणाला त्रास द्यायचा हेतू नसेल वा उगाच कोणाच्या मनोरंजनामुळे प्रत्यक्षात त्रास होत नसतानाही मुद्दाम कांगावा करायची नियत नसेल, तर आपले सारेच सण धमाल असतात. किंबहुना या एकाच कारणासाठी पुन्हा पुन्हा याच मातीत जन्म घ्यायला आवडेल
बाकी हर्पेन यांची पोस्ट एकदम अचूक. समजून् घेतली आणि आचरणात आणली तर फार चर्चेची गरज नाही ईथे.
.
.
कोणीतरी म्हणून गेलंय "बी द
कोणीतरी म्हणून गेलंय "बी द चेंज दॅट यु वाँट टू सी"
तर आयोजनात सामील व्हावे आणि बदल घडवून आणायचा प्रयत्न करावा.
वृद्ध आणि आजारी माणसांनी कसं आणि काय करावं.
आमच्या दवाखान्याच्या आसपास कोणताही मोर्चा मिरवणूक निघत नाही परंतु घराच्या खाली मात्र कायम असा ठणाणा चालू असतो. दोन वर्षांपूर्वी
आमचे ८४ वर्षांचे वृद्ध सासरे आलेले असताना आताच माघी गणपतीच्या विसर्जनासाठी मिरवणूक निघाल्या होत्या. भयानक आवाज आणि त्यासोबत ढोल ताशांचा ठणठणाट. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले होते. दवाखान्यातुन नऊ वाजता परत आलो तेंव्हा हि स्थिती. होती. आम्ही त्यांना औषध देऊन स्थिरस्थावर केले.
परंतु ज्यांचे नातेवाईक डॉक्टर नाहीत त्यांना भुर्दंड पडेलच. आणि एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला तर काय करायचं?
सुदैवाने मुंबईत रात्री १० वाजता पोलीस हे सगळं नाटक बंद करायला लावतातंच आणि नाही झाला तर ५-१० मिनिटात मी हमखास मुलुंड पोलीस स्टेशनला फोन लावून वायरलेस व्हॅनला बोलावून हे बंद करायला लावतो.
गणेशोत्सव किंवा नवरात्री किंवा लग्नाची वरात असेल तर डी जे लावून भयानक ठणाणा करत आवाज करायचा हे कोणत्या धर्मात सांगितले आहे? त्यातून एकाच ठिकाणी उभे राहून गाणे संपेपर्यंत चार पाच मिनिटे चार पोरी नाचतात म्हणून त्यांना इम्प्रेस करायला चार टोळभैरवहि नाचत राहतात.
त्या ठिकाणी असलेल्या लोकांना किती त्रास होतो याची कोणाला कसलीही फिकीर पडलेली नसते.
हा धर्म नव्हे. कोणत्याही तर्हेने याचे समर्थन करता येणार नाही.