सल्ला हवा आहे.

Submitted by Ashwini_९९९ on 7 November, 2019 - 00:21

मायबोलीकरांकडून सल्ला हवा आहे

माझी मामेबहीण ...बहिणीपेक्षा जास्त जवळची मैत्रीण आहे.
तीन वर्षांपूर्वी ती आणि तिच्या यजमानांनी फ्लॅट घेतला. फ्लॅट छोटा आहे पण छान आहे.
तिच्या लग्नाला आता २२ वर्ष पूर्ण होतील. छान चोकोनी कुटुंब आहे. सुरवातीची काही वर्ष सोडली तर तर त्यांची आर्थिक परिस्थिती नेहमीच चांगली होती. सर्व काही सुरळीत चालू होते. ती नोकरी करते आणि नवऱ्याचा स्वतःचा बिझनेस आहे.
या जागेत शिफ्ट झाल्यापासून मात्र ३ वर्षात परिस्थिती सगळ्यांना लक्षात येण्यासारखी बदलली आहे.
खूप आर्थिक अडचणी , सतत आजारपण , घरात सतत भांडण... हेच चालू आहे..घराचे हप्ते भरता येत नाहीयेत. पार जप्तीची नोटीस येण्याइतपत वेळ आली आहे.
घर लाभत नाहीये म्हणून असं होतंय असं वाटलं म्हणून ज्योतिष्यांकडे सुद्धा जाऊन आले. घर सुद्धा एका वास्तू expertla दाखवलं... सगळ्यांचं एकच म्हणणं आहे वास्तू मध्ये काही दोष नाही.
आता शेवटचा उपाय म्हणून हे घर भाड्याने देऊन त्यांनी दुसरीकडे भाड्याने राहायचं. पण ते हि जमत नाही कारण आर्थिक परिस्थिती इतकी खराब आहे कि डिपॉझिट साठीहीपैसे जमा करता येत नाहीयेत. जेवढं काही सेविंग केलेलं होत ते सगळं संपून गेलंयi.
इथे आल्यापासून ३ वर्षात तिच्या. ४ नोकऱ्या झाल्या आहेत. एकही नोकरी ६ महिन्याच्या वर टिकत नाहीये.नवऱ्याचा बिझनेस पूर्ण बंद पडला आहे. तो सध्या घरीच असतो. फिया भरता येत नाहीत म्हणून मुलांची शिक्षण बंद पडायची वेळ आली आहे. यातून कसा मार्ग काढायचा तिला समजेनासं झालाय. काल फोनवर बोलताना फटकन बोलून गेली आत्महत्येशिवाय आता दुसरा उपाय दिसत नाही.
हादरून गेलीये मी अक्षरशः . माझ्या नवऱ्याला मी सांगितलं तर तो म्हणाला कि आपण करू त्यांना मदत.
मदत करायला सगळेच कुटुंबीय तयार आहेत आणि करत पण आहेत.पण तीच आता कंटाळून गेलीये या सगळ्याला...
मी तिला चांगली ओळखते. सहजासहजी हार मानण्यातली ती नाही ..तीन असं बोलावं म्हणजे परिस्थिती नक्कीच खूप खराब आहे.
यातून काय मार्ग काढता येईल ?

Group content visibility: 
Use group defaults

ओह. Sad प्रत्यक्ष आर्थिक मदत ऐवजी तिला (आधी च्या गेलेल्या नोकरीची कारणे लक्षात घेऊन) चांगली नोकरी शोधून देणे, धंदा (का बंद पडला याचा तपशील लक्षात घेऊन) नवा धंदा करायला मदत करणे , सर्व हितचिंतकानी मिळून काही काळासाठी मुलांच्या फी ची जबाबदारी घेणे असं काही करता येईल का. सतत आजारपणं हे या सर्वाच बेसिक कारण तर नाही ना. योग्य वैद्यकीय उपचार चालू आहेत ना.
वास्तू - ज्योतिष यावर माझा काही अभ्यास नाही; पण श्रद्धा ही गोष्ट आप्ल्याला दुर्बल तर बन्व्त नाहीये ना ; त्यातल्या आशा-निराशा , अर्थिक भुर्दंड याने परिस्थिती आणखीच बिघडत नाहीये न हे पण लक्षात घ्यायला हवं सल्ले देताना या बाबतीत.
सहजासहजी हार मानण्यातली ती नाही .. > ही आणि तुमच्या सारखी मैत्रीण ही खूपच जमेची बाजू आहे. नक्की बाहेर येइइल यातून. मनापासून शुभेच्छा आणि प्रार्थना.

((तीन वर्षांपूर्वी ती आणि तिच्या यजमानांनी फ्लॅट घेतला))---- हां बिल्डर कडून फर्स्ट ओनर म्हणून घेतला असेल तर ठीके पण रीपर्चेस केलाय आणि बाजारभावापेक्षा खुप स्वस्तात फ्लॅट मिळाला असेल तर आधीच्या ओनर बाबत काय परिस्थिती होती त्याची चौकशी करून घेता येईल का पहा म्हणजे जर खरंच त्या वास्तुत काही दोष / बाधा असेल आणि त्यामुळे हे घडत असेल तर त्याप्रमाणे काही उपाय करता येतील.

अन्यथा गंडेदोरे ह्याच्या मागे न लागता नक्की काय चुकतंय आणि काय सुधारणा करता येईल ह्यासाठी एखाद्या चांगल्या काउंसेलरकड़े चर्चा करा म्हणजे योग्य मार्ग मिळेल. कारण इथे तुम्ही अर्धवट माहिती दिलेली आहे त्यामुळे त्या गृहितकावर सांगोपांग चर्चा आणि निष्कर्ष कठीण होईल. त्याउलट काउंसेलरकड़े सर्व बाबी स्पष्ट आणि उघड चर्चा केल्याने काम सोपे होईल.

मी काही सल्ला देवू शकत नाही पण काही अनुभव शेअर करते, कदाचित झाला तर ऊपयोग होईल,

प्रतिसाद पटला तर ठिक नाही तर सोडुन द्या .

----------------

फ्लॅट रीसेल आहे की नविन, म्हणजे जेव्हा घेतला होता तेव्हा. अन असा त्रास त्या बिल्डींगमध्ये राहणार्या ईतर कुणाला झाला / होतोय का? जेव्हा घर नविन घेतले तेव्हा वास्तुशांतनस/ घरभरणी केली होती का? अजुन बरेच प्रश्न आहेत..

त्रासदायक असले तरी खुप महत्वाचे असतात हे प्रश्न. माझ्या मैत्रिणीचा एक अनुभव सांगते, स्वस्तात मिळाला म्हणुन एक रीसेल फ्लॅट घेतला त्यांनी, तो स्वस्तात मिळाला होता कारण जुना मालकाला पैशाची खुप निकड होती, म्हणुन राहते घर नाईलाजास्तवे विकावे लागले होते. ते घर सोडताना ना त्या घरचा जुना परिवार खुप दु:खी होता, अन त्यामुळे त्यांचा तळत्या/ हळहळ लागला म्हणे त्या घराला. मैत्रिणीला त्या घरात खुप त्रास झाला प्रगती होतच नव्हती पण घरी ईतर क्लेश वाढत होते. नशिबाने तिच्या घरी येणार्या बाईंनी एकजण सुचविले , त्यांनी घर बघुन हे सांगीतले . ती या घरी येताना फक्त गणेश पुजा करुन आली होती, पण त्यांनी तिच्याकडुन वास्तुशांती अन सत्यनारायण करुन घेतला त्यानंतर तिच्या परिस्थितीत खुप फरक पडला. आता या सगळ्यावर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येकाने आपल्यापुरता ठरवावे पण हा तिचा अनुभव होता.

याशिवाय वास्तु कोणत्या जागी बांधलीये हेही महत्वाचे असते, आमचे एक घर जिथे आहे ती जागा फार फार पुर्वी म्हणे स्मशानाची होती. त्यामुळे घरी जी रोजची दिवाबत्ती करतो ती चालते पण अगदी सत्यनारायण किंवा कुठलीही महापुजा बाधते हेही विश्वास ठेवायला कठीण आहे पण आजुबाजुच्या काही घरात याचा प्रत्यय आलाय, सगळीकडे पुजा झाल्यावर त्या घरातील एखाद व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडलेय. त्यामुळे विषाची परिक्षा कशाला म्हणुन कोणी मोठी पुजा करतच नाही.

फ्लॅट resale चा आहे. नीट चौकशी करून घेतला आहे. आधीचे कुटुंब तिथे जवळपास १०-१२ वर्ष होते. त्यांना काहीच प्रोब्लेम न्हवता.
आजारपण म्हणजे accidents आणि मोठे accidents.........

फ्लॅट resale चा आहे. नीट चौकशी करून घेतला आहे. आधीचे कुटुंब तिथे जवळपास १०-१२ वर्ष होते. त्यांना काहीच प्रोब्लेम न्हवता.
आजारपण म्हणजे accidents आणि मोठे accidents.........

मी मध्यंतरी एक धागा काढलेला. आपल्याकडे पुरुषांवर कमवायचे, कमावत राहायचे दडपण असते का?
ईथे नवरयाचा बिजनेस बंद पडणे आणि तो घरीच बसणे हा मला सर्वात मोठा मुद्दा वाटतोय. जमल्यास तिथे आधी लक्ष घालून काम करा. जर त्यांना खरेच बिजनेसची समज असेल आणि पुन्हा उभारू शकतील बिज्नेस असे वाटत असेल तर एखादा नवीन बिजनेस सुरू करायला सांगा, त्यासाठी मदत करा. किंवा जमेल तशी नोकरी करायला सांगा. ती मिळवून द्यायला मदत करा. नवरा कमाऊ लागताच घरातली भाण्डणे त्रागा थांबेल. बायकोवरचे कमवायचे दडपण कमी होत तिची नोकरी टिकेल. आजारपणे सुद्धा घरच्या चिडचीड वातावरणामुळे येते. वातावरण प्रसन्न होऊ लागल्यास त्यातही सुधारणा होईल.

आणि हो, आता त्यांची वास्तूची चौकशी करून झालीय म्हणत आहात तर ईथे ती चर्चा शक्यतो सर्वांनी टाळाच.

तिच्या नवऱ्याने हि दुसरा बिझनेस चालू केला आहे. पण अजून फारशी प्रगती नाही त्यात. वय जास्त (५०+) असल्यामुळे नोकरी मिळण्यात हि प्रोब्लेम येतोय.

@ VB ..वास्तुशांत तिने नाही केलेली ... आम्ही विचारलं हि होत .. पण ती म्हणाली नंतर करणार आहे...
फक्त गृहपूजा केली होती त्यांनी ...नंतर बहुतेक पैशाच्या प्रॉब्लेम मुळे नसेल केली...कारण मला आठवतंय ज्या वर्षी ते राहायला आले त्याच वर्षी दिवाळी नंतर तिचा मोठा accident झाला. ते दुखणं तिला पुढचे ६ महिने पुरलं,.

मुलांची वयं काय आहेत?
सगळी नातेवाईक आणि हितचिंतक मंडळी मिळून त्या दोन्ही मुलांची एकदोन वर्षांची 'पूर्ण जबाबदारी' घेऊ शकतात का?
म्हणजे मुलांनी रहायचं एका नातेवाईककडे आणि बाकी उरलेल्यानी त्यांचा आर्थिक भार उचलायचा असे काहीसे...

मुलं आता सध्या कुठे राहतायत? आणि वय काय आहेत त्यांची? त्यांना आईवडलांपाशीच ठेऊन लांबून फक्त पैशाची मदत करू नका. त्यांना त्या घरातूनच हलवा, आईवडिलांपासून दूर न्या.

तुम्ही दोघ वयाने मोठी लोकं एकमेकांना सावरून स्ट्रॉंग व्हा. पण तोपर्यंत आम्हाला मुलांसाठी करुदया. हे तुम्ही त्यांना नाकारू शकत नाही असे सांगा पालकांना.

फ्लॅट resale चा आहे. नीट चौकशी करून घेतला आहे. आधीचे कुटुंब तिथे जवळपास १०-१२ वर्ष होते. त्यांना काहीच प्रोब्लेम न्हवता. >>> त्यांनी तो फ्लॅट का विकला? असे म्हणतात की जर प्रगती होतेय , मोठ्या घरात जायचेय म्हणुन कोणी विकत असेल घर ते घ्यावे जर कोणी दु:खात वा नाईलाजास्तवे विकत असेल तर घेऊ नये.

खरतरं मी हे सांगणे म्हणजेच मोठा जोक आहे कारण सध्या आस्तिक अन नास्तिक मध्ये अडकलेली आहे मी, देवावर विश्वासही नाही अन
तरी श्री गुरू नेहमी स्वप्नात येतात तरी सांगते. एखाद्या चांगल्या पंडिताकडुन घराची शांती करुन घ्या न जाने पडला तर फरक पडेल. दैवी माहीत नाही पण याने खुप पॉझीटिव्ह वाटते आणी विचारांना गती मिळते. अगदी साधीशी पुजा करायला हरकत नसावी बहुतेक

काही वेळा मोठा अ‍ॅक्सिडेंट, आजारपण , नोकरी जाणे वगैरे अनपेक्षित संकटांना आपण आर्थिक दृष्ट्या मुळातच तयार नसतो. अशावेळी संकट आले की सगळी घडी बिघडते. डॉमिनो इफेक्ट सारखे सगळे पडते. सावरायचा प्रयत्न केला जातो पण आपण इतके गोंधळलेले असतो की बरेचदा चुकीचे निर्णय घेतले जातात आणि परीस्थिती अजूनच बिघडते. स्वतःचा व्यवसाय म्हटला की आर्थिक चढउतार आले. यातला उतार सोसता आला नाही , अपेक्षेपेक्षा जास्त काळ चालला तर सगळे चित्र बदलते. तुमच्या बहिणीच्या बाबतीत असेच काही झाले असावे. आत्ता पर्यंत सगळे धडपडून स्वबळावर उभे केलेले सगळे विरुन गेलेय आणि नातेवाईकांची मदत घ्यावी लागते आहे हे त्यांना फार क्लेशकारक वाटणार. त्यांना खूप मानसिक आधाराची गरज आहे. क्रायसिस हेल्पलाईनलाही संपर्क केल्यास याबाबत मदत मिळेल. काही विपरीत निर्णय घेवू नये म्हणून कुणीतरी सोबत हवे.
चौकोनी कुटुंबाची सहा महिन्याची आर्थिक गरज काय आहेत ते माहित करुन घेता येइल का? तसे झाले तर सगळे नातेवाईक मिळून तो फंड उभा करायचा प्रयत्न करु शकता. अगदी तीन महिन्याची गरज भागली तरी थोडी ब्रिदिंग रूम मिळेल. घराचे कर्ज ज्या बँकेकडून घेतले आहे त्यांच्यांशी बोलून काय रिलीफ मिळतोय का ते पहा. नोकरी-व्यवसायाबाबत बोलायचे तर आजच्या काळातही सचोटी, कष्टाची तयारी हे गुण कामी येतीलच. आत्ता पर्यंत ज्या प्रकारचे काम केले आहे तसेच काम मिळावे हा आग्रह नसेल आणि थोडा चौकटी बाहेर विचार केला तर नोकरी-व्यवसाय करुन अर्थार्जन करणे शक्य होईल. पुन्हा नव्याने घडी बसेल. तुमच्या बहिणीला सांगा की सध्या आम्ही मदत करतोय ते बिनव्याजी कर्ज समजा, मुलं मार्गी लागली की हळू हळू परत करा. मुलं मार्गी लागतील, हेही दिवस पालटतील या आशेने त्यांचे मन पुन्हा उभारी घेइल.
मुले केवढी आहेत? १८+ असल्यास ती देखील लहान मोठे काम करुन हातभार लावू शकतील. अगदीच लहान असल्यास त्यांची पूर्ण जबाबदारी कशी वाटून घ्यायची ते सगळ्यांनी मिळून ठरवा. या निर्णयात मुलांना सामिल करुन घ्या म्हणजे त्यांनाही आश्वस्त वाटेल.
माझ्या नात्यातील दोन व्यक्ती अशा संकटातून गेल्या आणि नातेवाईकांच्या मदतीने काही काळाने सुखरुप बाहेर पडल्या. मात्र तो काळ सगळ्यांचीच झोप उडवणारा होता. अगदी फी थकलेय म्हणून शाळेने रिझल्ट अडवलाय इतकी वाईट परीस्थिती होती. राहाते मोठे घर जप्त झालेले, पैसे वाचवायला दूरच्या उपनगरात लहानशी जागा असेही दिवस वाट्याला आले. पण हळू हळू सावरले.
तुमच्या बहिणीला शुभेच्छा!

Ashwini, तुमच्या मैत्रिणीला आणि तिच्या कुटुंबियांना या परिस्थितीमधून बाहेर पाडण्यासाठी देव मनोबल देवो .

@VB, फ्लॅट रीसेल आहे की नविन, म्हणजे जेव्हा घेतला होता तेव्हा. अन असा त्रास त्या बिल्डींगमध्ये राहणार्या ईतर कुणाला झाला / होतोय का? जेव्हा घर नविन घेतले तेव्हा वास्तुशांतनस/ घरभरणी केली होती का? अजुन बरेच प्रश्न आहेत..>> आपल्या आयुष्यात राहत असलेल्या वास्तूचे स्थान महत्त्वाचे असते त्यामुळे असे वाटणे स्वाभाविक आहे. पण मला वाटत, असा उहापोह करून नेहमीच उत्तर मिळेल असे नाही.

याबाबतीत माझा स्वतःचा अनुभव इथे शेअर करू इच्छितो. जवळजवळ १२ वर्षांपूर्वी मी एक घर विकत घेतले. हे घर त्यावेळेला फक्त १ वर्ष जुने होते पण रिसेल होते. ज्यांच्या कडून मी ते विकत घेतले त्या कुटुंबाने या घरात फक्त ६ महिने वास्त्यव्य केले होते. घर घेतल्यानंतर काही दिवसातच एक अपघात झाल्याने त्या व्यक्तीचा पाय fracture झाला होता. कामाचे ठिकाण घरापासून दूर असल्याने त्यांची गैरसोय होत होती, या कारणास्तव, त्या कुटुंबाने फक्त ६ महिन्यातच घर विकायचा निर्णय नाखुशीने का होईना घेतला होता.
मी घर घेताना माझीही द्विधा मनस्थिती होती, त्यांना असा अनुभव आल्याने थोडी भीती होती. त्याचवेळी नवीन घर तेही शहराच्या मध्यवर्ती भागात आणि बजेट मध्ये मिळत होते. घरांना खूप चांगली मागणी आणि वर्षभरात १०-२५% आरामशीर फायदा मिळेल असा काळ होता. म्हणून आईवडील आणि १-२ मित्रांशी चर्चा करून लगेच निर्णय घेतला.
घर घेतल्यानंतर काही कारणास्तव लगेचच वास्तुशांत करायला जमले नाही पण ३ वर्षानंतर केली.
ते घर घेतल्या पासून ईश्वरकृपेने कुठलाही वाईट अनुभव आला नाही. सगळेजण आनंदने आणि समाधानाने राहत आहोत.

स्वाती२,

अतिशय सुरेख प्रतिसाद!

पण अगदी सत्यनारायण किंवा कुठलीही महापुजा बाधते हेही विश्वास ठेवायला कठीण आहे पण आजुबाजुच्या काही घरात याचा प्रत्यय आलाय, सगळीकडे पुजा झाल्यावर त्या घरातील एखाद व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडलेय. त्यामुळे विषाची परिक्षा कशाला म्हणुन कोणी मोठी पुजा करतच नाही. >>>> असा अनुभव सातत्याने येतोय तर वरचेवर ईशपूजा, नित्यपठण, गुरुचरित्र वगैरे पठण, नवचंडी, गोरगरिब गरजूंची सेवा, सत्पात्री दान वगैरे जे आवडेल ते होवू दे (ह्यात जनावरांचा बळी वगैरे अजिबात नको, पूर्णपणे सात्विक उपासना हव्यात). एका टप्प्यानंतर सगळ्या वाईटाला उतार पडून जाईल व अधिकाधिक चांगलेच होईल. रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे| रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: || .... पावित्र्याला अपवित्रतेचा विरोध होणारच. पण शेवटी जिंकणार रामच.

<< घर लाभत नाहीये म्हणून असं होतंय असं वाटलं म्हणून ज्योतिष्यांकडे सुद्धा जाऊन आले. घर सुद्धा एका वास्तू expertla दाखवलं... सगळ्यांचं एकच म्हणणं आहे वास्तू मध्ये काही दोष नाही.>>

------- नोकरी जाणे, आर्थिक अडचणी, घरांत भांडणे... यांच्याशी घराचा/ वास्तूचा काहीच संबंध नाही आहे.
हवा खेळती नसणे किंवा मोल्ड. बुरशी असा प्रकार असेल तर आरोग्याला घातक आहे....

काही निर्णय चुकतात... काही निर्णय कमालीचे यशस्वी ठरतात. आयुष्यात चढ - उतार असतातच. वर अनेकांनी सांगितलेच आहे, मदत (मिळत असेल तर) घ्यायला काहीच हरकत नाही. परिस्थिती मधून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा.

वास्तुदोष हे एक पैसे उकळायचं फ्याड/ लबाडी आहे. मुळात नवऱ्याचा धंधा बुडला हेच कारण. धंध्याची उमेदवारी न करता उतरतात आणि स्वप्न पाहतात. धंधा बुडु शकतो यावर विश्वास नसतो. त्यात मोठा आर्थिक खड्डा पडतो तो भरून येत नाही. कुणाचीही मदत म्हणजे आणखी पैसे खड्ड्यात घालणे.

लवकर या परिस्थितीतून सावरण्यासाठी त्यांना शुभेच्छा.बॅड पॅच चालू आहे.तो पार पाडला की हळूहळू परत छान दिवस येतील.तोवर तग धरावा लागेल.
आत्महत्या करणाऱ्या लोकांनी नंतर दृष्टी मिळून आपल्या जाण्याने प्रश्न सुटले नाहीत, ते वाढले आहेत,आपल्याला अपेक्षा होती तसा खर्च कमी झालेला नाही हे पाहिलं असतं तर त्यांनी मेल्याबद्दल स्वतःलाच शिक्षा करून घेतली असती.
नातेवाईकांनी मिळून त्यांना(आर्थिकच नाही, तर मानसिक पण) मदत करावी.वातावरण हसतं खेळतां ठेवायला मदत करावी.
तसेच आम्ही वाचक काहीही,कोणत्याही प्रकारची मदत करू शकत असलो(नोकरी, रेफरन्स,कस्टमर म्हणून) तरी निःसंकोचपणे सांगा.

जरा विनोदबुद्धीने घ्या: सगळं फेल गेलं दिसतयं पण आत्महत्या यशस्वी होणार अशी खात्री आहे. खट्टामीठा का कुठल्या जुन्या सिनेमात मुलगी लग्न जुळेना म्हणून पंख्याला टांगायला जाते तर पंखा खाली येतो. सध्या काळ खराब असेल तर आत्महत्या पण सक्सेसफुल होणार नाही. आणि जर काळ ठीक आहे आणि काहीतरी सक्सेसफुल होईल अशी आशा असेल तर मग आत्महत्येचा विचार कश्शाला.....
एखादे सेमेस्टर-वर्ष शिक्षण बंद झाले मुलांचे तरी फार वाईट वाटून घेऊ नका. 'स्कूल ऑफ हार्ड नॉक्स' खूप काही शिकवते, जे आयुष्यभराचा पाया बनते.

घर फिरले की घराचे वासे पण फिरतात.
अशी जुनी म्हण आहे.
चांगली परिस्थिती असताना नातेवाईक ,मित्र मंडळी ह्यांची वागणूक जी असते ती आर्थिक स्थिती बिघडली की बदलते.
मदत आणि उपकार ह्या मध्ये पुसटशी सीमा रेषा असते.
त्या मुळे शक्यतो आहे ती सत्य परिस्थिती स्वीकारून तिला स्वतः च तोंड देणे उत्तम.

सीमंतिनी, स्वाती२, प्रतिसाद आवडले.

वास्तुदोष वगैरे गोष्टींत अडकू नका... दुबळ्या मनाची लक्षणं आहेत ती...

प्रॅक्टिकली विचार करून परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मानसशास्त्रीय समुपदेशन, करिअर काऊन्सेलर यांची मदत घ्या.

This too shall pass!
तुमच्या बहिणीला आणि तिच्या घरच्यांना मनापासून शुभेच्छा!
वरती चांगले सल्ले आलेच आहेत.
तुम्ही सगळे नातेवाईक त्यांच्या पाठीशी उभे आहात ही मोठी जमेची बाजू आहे. हे ही दिवस जातील.
तुमच्या बहिणीला gratitude journal लिहीता येईल का? रोज रात्री झोपायच्या आधी दिवसातल्या किमान तीन चांगल्या घडलेल्या गोष्टी लिहायच्या. दिवसभरातलं काही आठवलं नाही तर आजवरच्या चांगल्या घडलेल्या गोष्टी लिहिल्या तरी चालेल. रोज त्याच गोष्टी लिहिल्या गेल्या तरी हरकत नाही. याचा मला स्वतःला कठीण काळात खूप उपयोग झाला आहे. अगदी काही नाही तर आपण शरीराने धडधाकट आहोत (अपघात होऊनही) हे किती चांगले आहे असे म्हणायचे. असं केल्याने नकारात्मक विचार नक्कीच कमी होतात.

अगदी काही नाही तर आपण शरीराने धडधाकट आहोत (अपघात होऊनही) हे किती चांगले आहे असे म्हणायचे. असं केल्याने नकारात्मक विचार नक्कीच कमी होतात.>> +1 प्रतिसाद आवडला.
आजचा दिवस ही एक नवीन संधी आहे आणि ती आपल्याला मिळाल्याबद्दल पण आभारी असायला हवं. त्याचप्रकारे आपले कुटुंबिय खडतर काळात सोबत आहेत, आपापसात प्रेम, विश्वास टिकून आहे ही देखील जमेची बाजू आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये काहीतरी सकारात्मक शोधण्याची सवय मनाला लावणे गरजेचे आहे.

रात्री झोपायच्या आधी दिवसातल्या किमान तीन चांगल्या घडलेल्या गोष्टी लिहायच्या. --- मस्त विचार.

एकच सल्ला
धंद्याच्या फेल्युअर मुळे आलेल्या डिप्रेशन मधून बाहेर निघून नवर्‍याने लवकरात लवकर मिळेल ती नोकरी धरली पाहिजे.
मंथली स्टेडी ईन्कम ही पहिली गरज आहे घर चालवण्यासाठी. त्यातून छोटे छोटे आनंद मिळवून कुटुंबाची गाडी रूळावर आणता येईल.
घर विश्वासातल्या, जिव्हाळ्याच्या आणि फायनॅन्शिअली स्टेबल अशा दुसर्‍या व्य्क्तीच्या नावावर करून त्याला सध्या पुढचे हप्ते भरायला सांगू शकता. तुमची परिस्थिती सुधारेल तेव्हा ते पुन्हा तुमच्या नावावर करून घेण्याच्या बोलीवर.. मदतीसाठी त्या विश्वासू व्यक्तीला नंतर योग्य मोबदला देऊ शकता. कागदपत्रां करता थोडासा खर्च होईल पण ठीक आहे.

तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल आणि सल्ल्यांबद्दल मनापासून धन्यवाद.
तिच्याकडे उद्या जाणार आहे. बोलते तिच्याशी...

घर विश्वासातल्या, जिव्हाळ्याच्या आणि फायनॅन्शिअली स्टेबल अशा दुसर्‍या व्य्क्तीच्या नावावर करून त्याला सध्या पुढचे हप्ते भरायला सांगू शकता. तुमची परिस्थिती सुधारेल तेव्हा ते पुन्हा तुमच्या नावावर करून घेण्याच्या बोलीवर.. मदतीसाठी त्या विश्वासू व्यक्तीला नंतर योग्य मोबदला देऊ शकता. कागदपत्रां करता थोडासा खर्च होईल पण ठीक आहे.>>> हे असे करणे रिस्की असू शकते हेही लक्षात घ्या. भल्या भल्यांची नियत बिघडू शकते, अर्थात होईलच असे नाही पण सगळ्या शक्यतांचा विचार नक्की करावा