तुमची मुलं व्हिडिओ गेम्स खेळतात का?

Submitted by वावे on 20 November, 2019 - 04:31

अजून तरी माझ्या मुलांना व्हिडिओ गेम्सची सवय नाही. आमच्या दोघांच्याही मोबाईलवर गेम्स नाहीत. आजी आजोबांच्या मोबाईलवर थोडेफार गेम्स आहेत. आजीआजोबा भेटले की त्यांना लाडीगोडी लावून अर्धाएक तास गेम खेळतात. पण हे सगळं सुट्टीला आम्ही तिकडे गेलो किंवा ते इकडे आले तरच. म्हणजे खूपच लिमिटेड काळासाठी. इतके दिवस असं सुरळीत चालू होतं.
आता असं झालंय की खाली खेळायला गेल्यावर मोठ्या लेकाच्या मित्रांबरोबर ज्या गप्पा होतात त्यात मित्र त्याला गेम्समधल्या गमतीजमती सांगतात किंवा इतर मित्र एकमेकांशी गेम्सबद्दल बोलत असतात त्यामुळे हा त्या गप्पांमध्ये एकटा पडतो. सोसायटीत १२/१३ वर्षांच्या एका मुलाला स्वतःचा मोबाईल मिळाला आहे. अजून एकाकडे स्मार्टवॉच आहे. अशी उदाहरणं आजूबाजूला दिसत असताना आपल्याला व्हिडिओ गेम खेळायला मिळत नाही याचं दुःख त्याला होणं साहजिक आहे . त्यामुळे त्याला हल्ली खूप वाटायला लागलंय की आपणही व्हिडिओ गेम्स खेळावेत. त्याला आम्ही त्याचे दुष्परिणाम समजावून सांगतो. त्याऐवजी आपण कसे शनिवार-रविवारी कधी टेकडीवर जातो, कधी पार्कमध्ये स्केटिंग/ सायकलिंग / बॅडमिंटन खेळतो, त्यात कशी मज्जा येते हेही सांगतो. त्याला ते पटतंय अजून तरी, किंवा तो तसं दाखवतोय.

एखादी गोष्ट अजिबात वर्ज्य केली तर त्याबद्दल जास्त ओढ निर्माण होते हेही खरं. किंवा लगेच अगदी सवय लागेल असंही नाही. पण म्हणून त्याला व्हिडिओ गेम्स आपणहून खेळायला द्यायचे हेही अजून पटत नाही. त्यात धाकटा मुलगा जरा नादिष्ट प्रकारातला आहे. एखादा खेळ आवडला की तोच खेळत बसणाऱ्यांपैकी. त्याला गेम्सचं लवकर व्यसन लागेल की काय अशीही धास्ती वाटते.

सुट्टीच्या दिवशी दोघेही तास दोन तास टीव्ही पाहतात. धाकटा मुख्यतः कार्टून पाहतो. पण मोठ्याला आता सिनेमे आवडायला लागले आहेत. दंगल, चक दे इंडिया, इकबाल, तारे जमीं पर, छोटा चेतन, होम अलोन, ज्युरासिक पार्क, बेबीज डे आऊट असे काही चित्रपट आम्ही आवर्जून त्याला दाखवले आहेत. अजूनही अनेक चित्रपट दाखवायचे आहेत. सांगायचा मुद्दा असा की स्क्रीन टाईम देत नाही असं नाही. पण गेम्स खेळून करमणुकीशिवाय फारसं काही मिळतं का याची आम्हाला खात्री नाही. त्यामुळे शक्य तितके दिवस हा प्रकार आपल्यापासून लांबच ठेवलेला बरा असं वाटतंय.

तुमचे काय अनुभव? तुमची मुलं व्हिडिओ गेम्स खेळतात का? किती वेळ खेळतात? त्याचे बरेवाईट काय परिणाम तुम्हाला दिसतात? त्यावर नियंत्रण कसं ठेवता?
खेळत नसतील तर कसं समजावून सांगता? पर्यायी करमणूक काय देता?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज ठरवून वेळ द्या गेम खेळायला.... फार्फार तर अर्धा तास किंवा वीकेंडला तासभर!
अतिबंधने उलटा परिणाम करतात कधीकधी!

हो. आमच्याकडे सर्व गेमिन्ग अलाउड आहे. प्ले स्टेशन २ पासून घेत गेलो आता फोर आहे. कॉल ऑफ ड्युटी, जी टी ए. फिफा आणी ड ब्लु डब्लु एफ कुस्ती हे फेमस गेम असासिन्स क्रीड फेवरिट.

गेम प्लेअर्स चे व्हिडीओ बघतो. ऑनलाइन शेअर्ड गेम्स मल्टिप्लेअर गेम् खेळतो. इ ए च्या सिम्स च्या पण गेम्स आहेत.

फोन वर आर्केड व पब जी त्यातले मी फक्त चिकन डिनर बनऊन ठेवते.

मुलगे असतील तर ते आता मातेच्या पदरा खालून निघून पौगंडा वस्थेत काही महिने राहून पुरुष होण्याक डे वाटचाल आहे ह्यात गेमिन्ग हा एक महत्वाचा टप्पा समजून ट्रीट करा. पूर्ण मनाई केलीत तरच वाइट मानसिक परि णाम होउ शकतात हे माझे वैयक्तिक मत. ते त्या वयात त्या गेम मधून लगेच बाहेर पडतात. पण १३- २१ हा नवे अनुभव व लाइफ एक्स्पीरीन्स घेण्याचाच काळ आहे. मम मातेच्या मानसिकतेतून गेमिन्ग कडे बघू नका इट इज लॉट ऑफ फन.

पण अमेरिकेत राहात असाल तर घरातील बंदुका लॉक करून ठेवा मात्र.

विवध अँप वरचे गेम्स यात धरायचे का?

तद्दन निर्बुद्ध गेम खेळण्यात माझ्या मुलीचा हात कोणी धरू शकय नाही. बार्बी ड्रेस अप, मेकअप, पिझा मेकिंग वगैरे प्रकारचे गेम तिला भयंकर आवडतात,
आता तिचे तिला ऍप डाउनलोड करता येत असल्याने आम्ही टॅब लपवून ठेवायला सुरवात केली आहे.

लहान मुलीला टॉकिंग टॉम आवडतो. पण अजून तरी आता टॉम ला आई ने बोलावले आणि तो घरी गेला सांगितले तर ती ऐकते Happy

बिल्डिंग मधली इतर मुले (7वी 8वी) कुठल्याश्या बंदुकांच्या गेम बद्दल बोलत असतात, वेपन सिलेक्शन,त्याच्या रेंज, स्ट्रॅटेजी वगैरे त्यांची बोलणी ऐकून मी आ वासला होता.
त्या मुलांच्या इंस्टावर( हो 7 8वी ची मुले इंस्टावर पण आहेत) पण त्याचेच स्क्रीनशॉट्स असतात

सुरुवातीला पूर्ण मनाई केली होती तर लपून छपून खेळणे सुरु होत असे, मग सरळ सांगितले कि इतका बाहेर जाऊन खेळलास तर मोबाईल वर खेळायला मिळेल. मुख्य मुद्दा मोबाइल गेम नाही तर बाहेरचे खेळ खेऊन ऍक्टिव राहण्याचा होता, जो आता मुलाला पूर्णपणे पटला आहे.
स्क्रीन टाइम वर मर्यादा ठेवली, गेम कुठले खेळले जात आहेत त्यावर लक्ष ठेवले. PUBG सारख्या गेम चे दुष्परिणाम पण समजावून सांगितले. आता वेळ फार मिळत नाही पण असला तरी स्ट्रेस बस्टर म्हणून त्याचा वापर होतो.

एखादी गोष्ट अजिबात वर्ज्य केली तर त्याबद्दल जास्त ओढ निर्माण होते हेही खरं. >>+१
सद्ध्या सतत समोर मोबाईल, आयपॅड, लॅपटॉप असताना मुलांना त्यापासून लांब ठेवणे अवघड होते.
माझ्या छोट्या मुलासाठी मी ABC, Shapes चे अ‍ॅप डाऊनलोड केले. ते आवडले त्याला. नको खेळू म्हणण्यापेक्षा त्याच्यासमोर दुसरे काहीतरी करण्याचा पर्याय ठेवला तर लगेच बंद करतो.
आमच्यावेळी सुट्टी सुरु झाली कि आम्ही तासाचे २० रुपये देऊन व्हिडीओ गेम भाड्याने आणायचो. ते गेमस खूप भारी वाटायचे तेव्हा Happy

प्रतिसादांसाठी सगळ्यांना धन्यवाद! राजसी, एडिट का केलास प्रतिसाद? असो.
एकंदरीत सगळेच प्रतिसाद मर्यादित काळ गेम खेळू द्यावेत अशाच मताचे दिसताहेत. माझीही याला हरकत नाही खरं म्हणजे. पण ते शक्य तितकं पुढे ढकलावं, खूप कठोर न होता, असं वाटतंय.
सातवी आठवीतल्या मुलांना स्वतःचा स्मार्टफोन घेऊन देणं हे चूक आहे असं मला वाटतं. पण खूपजण घेतात. माझा मुलगा अजून बराच लहान आहे, पण पुढेमागे २/३ वर्षांनी हीदेखील मागणी होईल. अशा चुकीच्या प्रवाहात आपण का पडावं? तसाच हा गेमिंगचा प्रवाहही चुकीचा आहे असं कितीजणांना वाटतं?

माझी मुलगी माईन क्राफ्ट बेदम खेळलेली पण ती एक फेझ होती. ती त्यातून बाहेरही सहजतेने पडली. तेव्हा वरी नॉट!!! त्याचं मन लवकरच भरेल व तो बाहेर पडेल. हॅव्ह कॉनफिडन्स इन हिम.

Smartphone is must for everyone who can afford to pay. Esp young adults their lives are on that phone. And with apps They can be in touch with parents all the time. This is a big plus. Gaming is a way of life. Have you played or seen any game play videos. If possible try to get more information and experience what fun it is. I have trouble with the controlling nature of parents. Not just today but from when I was a child myself. Controlling home environment, net access are power issues . Technology is for everyone.

राजसी, एडिट का केलास प्रतिसाद? --- अगं, मी एकटीच गेमिंग निरपेक्ष पालक इथे आहे असं मला वाटलं. नक्की तसाच प्रतिसाद अपेक्षित होता का ? असं मला वाटलं. आमच्याकडे गेमिंगला पोषक असं वातावरण आहे, सगळेजण गेम्स खेळतात. आम्ही अनुभवी असल्याने कुठे थांबायचे ते आम्हाला माहीत आहे पण मुलांसाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. जर एखादी गोष्ट पालक म्हणून आपल्याला पटत नसेल तर आपण नक्कीच मुलांना ती गोष्ट न करायला पटवून देऊ शकतो. कितवीतल्या मुलांना smart फोन द्यायचा हा पण पालकांचा वैयक्तीक निर्णय आहे. अतिशय चूक किंवा बरोबर असे काही नाही. कित्येक टीनेजर मुलं आजकाल uber वगैरे वापरतात, पालकांची परवानगी असते किंवा त्यांनीच शिकवलेल असतं मग अश्या गरजा असतील तर smart phone आवश्यक होतो. गेमिंग मध्ये चूक किंवा बरोबर असं काही नाही फक्त लक्ष द्यायला हवं नक्की काय चालले आहे, लिमिट प्रत्येकाने आपापले ठरवायला हवं. गेमिंग चे फायदे पण आहेत पण मी त्यातली तज्ञ नसल्याने मी नीट लिहू शकणार नाही. अभ्यास सोडून सतत पुस्तकं वाचत बसलं किंवा सतत मैदानात खेळत बसलं तर चालेल का ?

माझा मुलगा fortnite खेळत होता तेव्हा दोन वर्ष वयाचा नात्यातल्या मुलगा त्या खोलीत गेला आणि गेमचा विडिओ बघून बरेच दिवस घाबरलेला होता, कुऱ्हाड घेऊन पळणारा माणसाला पाहून. तो घरात आला तेव्हाच मी त्याचा आईला सांगितलं होतं की माझा मुलगा गेम खेळतोय तिकडे छोटूला जाऊ दे नको, लक्ष दे. आईचं दुर्लक्ष झालं नंतर माझ्या मुलाला बोलून काय उपयोग! तो वेगळ्या खोलीत बसून खेळत होता.

तुमचा मुलगा कुठला गेम मागतो त्या गेमचा आॅनलाोइन रिव्यु वाचूनही ठरवता येईल. काहीवेळा ते तुमच्या मुलाच्या वयावरही अवलंबून असतं. मला मुलं डे केयरला असताना हा ताप नव्हता. शाळेत गेल्यावर या चर्चा, पर्यायाने आपलं मूल संवाद साधू न शकणं वगैरे होतं पण आमच्याकडे जवळजवळ चारच महिने बाहेर खेळायचं वेदर असल्यानेही आम्हीच सुरूवातीला “वी” घेतला मग नंतर केव्हातरी माइनक्राफ्ट आलं. मध्ये काही वर्ड गेमस वगैरे पण झालें. ते चालाव्ेत. मला गेम पेक्शा त्या गेम्सचे यु ट्युब विडिओज असतात आणि त्या विडिओजची भाषा (स्लॅंग इ.) वर जास्त आxeप आहे पण पर्याय नाही. मुलं एकेका फेज मधून जातात हे खरं असल तरी गेमिंग टाइम त्यांनी अर्न करणं आणि तो किती वेळ खेळतो हे आपण ठरवायचं इतकं करता येईल. सध्या मी सोम ते गुरू नो गेम्स/यु ट्यूब हे ठरवून पाळते. विकेंडला मेनली वेदरमुळ्ही शेवटी स्रकीन/गेम्स द्याव् लागतात.

छान विषय, मी कॉलेज मध्ये असताना कॉम्पुटर वर थोडेफार गेम्स खेळलेले आहेत, पण नंतर नाही, विशेष आवड हि नाही. पण मला माझ्या मुलांना खेळायची इच्छा असेल तर त्यांना प्रमाणात खेळू द्यावे असे वाटते. या बद्दल काही प्रश्न आहेत त्या बद्दल थोडे मार्गदर्शन करावे.

मुलींच्या बाबतीत हा प्रश्न वेगळा आहे का. मुलींना गेम्स च्या, ते पण व्हायलेन्ट गेम्सच्या नादी लागलेले मी तरी पाहिलेले नाही म्हणून विचारतो.
मुलींसाठी वेगळे आणि मुलांसाठी वेगळे असे काही गेम्स आहेत का?

एकंदरीत स्वतः गेम्स खेळून बघायला पाहिजेत Happy>>हो. काही ठराविक निरुपद्रवी (स्मित) तरी वावे.
मुलाबरोबर क्लॉ, नेबर्स फ्रॉम हेल, क्रिमिनल केस हे गेम्स मी खेळले आहे. आपला संवाद वाढायला मदत होते नक्कीच.
अवांतर - पण मुलापेक्षा आपणच इरेस पेटून खेळत राहणार नाही याची दक्षता घ्यावी. (फिदी)

सिम्बा +1
माझी लेक ही असले फालतू गेम खेळत बसायची. पण आता नवीन चालू केले आहे. तुनळीला व्हाॅईस कमांड देऊन डाॅल्स व्हिडिओ बघत बसते.

मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून आपण त्यांना जशी पुस्तकं वाचुन दाखवतो, मैदानी खेळांची आवड निर्माण व्हायला त्यांच्या बरोबर खेळतो... आणि ते केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ती आवड तयार होणे हा त्यातला फार बारिकसा भाग असतो. आपल्याला त्यांच्या बरोबर वेळ घालवता येतो, त्यांच्याशी बोलता येतं, कनेक्ट होता येतं आणि ते एकदा जमलं की त्यांच्या आवडी निवडी, एककल्ली असेल तर बाकीचं एक्स्पोज तरी करं असले जे युनिव्हर्सल सल्ले असतात ते गळी उतरवायला ही मदत होते. आणि एकंदर त्यांचं बालपण आपल्याला जगता येतं, त्यांच्या जवळ रहाता येतं.
मला विचाराल तर तुम्ही त्यांच्याबरोबर गेम खेळायला लागा. एक्स बॉक्स किंवा तत्सम काही तरी विकत घ्या आणि गेम्स आणि त्यातल्या चांगल्या/वाईट गोष्टींवर आपोआप संवाद वाढवा. त्याला/ तिला दूर ठेवून/ शिल्ड करणे हे वाळून मान खुपसुन रहाणे तर नाही ना यावर एकदा ओपनली विचार करा. आणि मग मनाला वाटेल तो निर्णय घ्या.
बाकी खेळायचा वेळ अर्थात लिमिट करा... ते करताना वादावादी वाढेल (तुमची होत असेल तर).. पण वादावादी नको म्हणून गेम्सच न देणे हे परत वाळून नाही ना हे बघा. आणि त्याला मित्रांशी बोलताना फोमो येणार नाही. Proud अगेन तुमच्या बाबतीत माहित नाही, पण फोमो न यावं म्हणून मी टीव्ही शोज चे एपिसोडच्या एपिसोड बघतो... आणि वॉरिअरचे गेम्स बघतो. Wink
तसंच इंटरनेटवर इंटरॅक्शन येणार असेल तर त्यातले डूज आणि डोंट्स... यावर बोलता येईल.
मी म्हणेन याच्याकडे निगेटिव्ह कॉनोटेशन म्हणून न बघता संवाद वाढवण्याची आणखी एक संधी म्हणून बघा.

पुस्तकं वाचायचे, स्पोर्ट्स खेळायचे/ बघायचे जसं आवड ते व्यसन लागू शकतं आणि ते जितकं चांगलं/ वाईट आहे बहुतांशी व्हिडिओ गेम्स तितकेच चांगले असावेत.
व्हिडिओ गेम्सचा आणि गन व्हायोलन्सचा परस्पर संबंध नाही. तो निव्वळ ट्रंपिअन प्रोपगंडा आहे.

विचारपुर्वक गेम डाऊनलोड करुन दिले व किती वेळ व कधी खेळायचे यावर (प्रेमाने) बंधने घातली तर मुलांमधील काही गुण, कौशल्य वाढण्यास हे गेम्स नक्की पुरक ठरतात असा अनुभव आहे.

बाकी गेम ऍडीक्शनचे म्हणाला तर आजही मी कॉल ऑफ ड्युटीसारखा गेम खेळायला बसलो तर दोन तिन तास आरामात खेळतो. Lol

मूल जर ऑलरेडी गेम्स खेळत असेल आणि आपण खेळत नसू तर आपणही त्याच्याबरोबर खेळल्याने संवाद वाढेल हे बरोबर आहे.
फोमो हा प्रश्न मला तरी फारसा भेडसावत नाही. पण मुलालाही भेडसावणार नाही असं अजिबात नाही हे मला मान्य आहे.

वाळूत मान खुपसून रहायचं नाहीये म्हणून तर हा धागा काढण्याचा खटाटोप. Happy Informed decision घेणं कधीही चांगलं, चार लोक करतात म्हणून केवळ करण्यापेक्षा.

नात्यात एका मुलाला यात पूर्ण बुडून गेलेलं पाहिलं आहे. म्हणून काळजी.

मुलांमधील काही गुण, कौशल्य वाढण्यास हे गेम्स नक्की पुरक ठरतात असा अनुभव आहे.>> हरिहर, नेमकी कुठली कौशल्यं, कुठले गुण ते प्लीज सांगाल का? मला अशाच प्रकारची माहिती हवी आहे या धाग्यातून.

Hand-eye कॉ-ordination सुधारतं, stress buster असतात गेम्स, गेम खेळल्यामुळे आनंदी भावना निर्माण होते ती अर्थातच काही वाईट नाही, analytical आणि lateral thinking सुधारू शकतं. Xbox -360 मध्ये घरातल्या घरात physical exercise असलेले गेम्स खेळता येतात( जागा लागते) , क्सबॉक्स 360 मला पण खूप आवडते- exercise, dance सगळं मस्त करता येतं.

https://www.google.com/amp/s/www.engadget.com/amp/2017/02/09/8-cognitive...

हे फायदे गुगल सांगतंय.

बुडून गेलेलं म्हणजे सतत तेच गं. घरी असला की हातात फोन. कुठे ट्रिपला गेलं तरी तिथेही बोअर होतंय म्हणून परत हातात फोन. फोनवर गेम्स.
ॲमी , वाचली लिंक. गंभीर आहे. चर्चा चांगली आहे पण तिथली.

एकंदर मोठ्या स्क्रीनवर लिमिटेड काळासाठी गेम्स खेळू द्यावेत, आपणही खेळावेत असं माझं मत होत चाललं आहे.

एकुलता एक आहे का? एकटं मूल असलं की कितीही आई-वडील company / involved असतील तरी समवयस्क सोबतीची गरज भागवू शकत नाहीत Sad म्हणून सतत गेम्स चांगलं नाहीच पण मग कशात तरी मन गुंतवायला हवं. आई-वडील विचार करत असतीलच.

नाही, एकुलता एक नाही. आता मोठाही झालाय. सध्याची परिस्थिती माहिती नाही. बाहेर पडलाही असेल त्यातून.

मी स्वतः कँडी क्रश खेळते. पण व्यसन नाही.
मुलगी १४. नो गेम्स. स्वतःचा फोन नाही. माझ्या फोनवर इन्स्टा अकाउंट आहे. ते मी घरी गेल्यावर / असताना बघणार. एखादा वेबसिरीजचा एपि.
जास्तकरुन गूगल वापरते. अभ्यासाचं / प्रोजेक्ट्चं काही बघायला. रोजचा साधारण अर्धा १तास वापर.
मुलगा ५ वर्ष. नो गेम्स. आतापर्यंत कार्टून्स/ नर्सरी र्हाइम्स चे विडीओ बघायचा. आता डायनोसोर, शार्क, मासे, बाकी प्राण्यांचे विडीओ बघतो. रोजचा साधारण अर्धा तास वापर.
आम्ही दोघेही दिवसभर घरी नसतो त्यामुळे घरी कंपुटर/ गेम स्टेशन्स घेतले नाहीत. कारण कंट्रोल नसणार.
तरी मी रोज बडबड करते. ओरडत असते. फोन ठेवा. किती वेळ झाला वैगेरे. Happy
सतत मोबाईल बघणार्‍या मुलांच्या आयांना किती ताप होत असेल.

सस्मित, मुलीने हट्ट केला होता का गेम्स किंवा फोनसाठी? केला असेल तर कसं समजावून सांगितलंत? पर्याय काय दिलेत? मुलगा ५ वर्षांचा म्हणजे लहान आहे अजून. पण त्याची मागणी असते का?

गेमसाठी नाही केला हट्ट.
फोनसाठी हट्ट केला होता ह्यावर्षी. पण आम्ही नाही मिळणार असं निक्षुन सांगितलं. तिच्या स्कुलमेट्स कडे मोठमोठे स्मार्ट्फोन्स आहेत. अगदी आठवी नववीच्या मुलांना पालक स्मार्ट्फोन्स, आयपॅड, आयफोन्स घेउन देतात. म म, साधारण आर्थिक परीस्थीती आणि काटकसरी कुटुंबातुन आलेल्या आम्हा दोघांनाही ते समहाउ पटत नाही. आणि तेवढी गरज पण नाहीच.
म्हणुन आम्ही नाही वरच ठाम राहिलोत. Happy तिनेही ऐकलं. तिच्यातही म म गुण घातलेच आम्ही. Happy
पुढच्या वर्षी गरज वाटली तर देणार. नाहीतर मग कॉलेजला गेल्यावर देणारच.
मुलगा ५ वर्षांचा म्हणजे लहान आहे अजून. पण त्याची मागणी असते का?> लहानच जरा बेरकी आहे. फोनसाठी हट्ट करतोच. वर आजुबाजुच्या दादालोकांचं बघुन मला पबजी खेळायचंय वैगेरे म्हणत असतो. Happy आम्ही बरेचदा मस्करीत टाळतो.
तसंही दोघांनाही रिकामा वेळ खुप कमी आहे. मोठीला तर खुपच कमी. रिकाम्या वेळात टीव्हीवर काहीतरी इंग्लिश सिरीयल्स बघते. फ्रेंड्स, नाईन नाईन, मास्टर्शेफ ऑ वैगेरे. कधी पुस्तक वाचते. मला मोबाईल बघण्यापेक्षा हे फार बरं वाटतं.
बारक्याचं टीव्हीवर कार्टुन बघण्याचं बंद करायचं आहे.

हं.. आमचेही विचार फोनच्या बाबतीत असेच आहेत. धाकटी मुलं बेरकी यासाठी +१ Happy आपणही थोडे जास्त लाड करतो धाकट्यांचे.
फ्रेंड्स बघतात का सर्रास या वयातली मुलं?

Pages