लोकडाऊनमध्ये वाचण्यासाठी मायबोलीवरचे जुने धागे

Submitted by आभा on 30 March, 2020 - 22:13

नमस्कार मंडळी,

लॉकडाऊन मध्ये वाचण्यासाठी मायबोलीवरच्या तुम्हाला आवडलेल्या कुठल्याही विषयांवरच्या धाग्याची लिंक इथे द्या.
आपल्याला सगळ्यांना तर परत वाचता येतीलच पण भारतात एकटे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्या लिंक्स पाठवता येतील. त्यांना नेहमीच्या बातम्या आणि भीतीदायक कायप्पा मेसेजेस पासुन तेव्हढाच विरंगुळा.

सर्व विषय / कथा चालतील....
चला तर मग, वाट बघते आहे.
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Admin team ne लॉकडाऊन केलेले धागे वाचनमात्र मोड मध्ये चालू करावे. पूर्वीच्या शाब्दिक हाणामाऱ्या वाचायला मज्जा यील. नॅशनल आर्का ईव्ह ऑफ मायबोली यु नो!

>>Admin team ne लॉकडाऊन केलेले धागे वाचनमात्र मोड मध्ये चालू करावे. पूर्वीच्या शाब्दिक हाणामाऱ्या वाचायला मज्जा यील. नॅशनल आर्का ईव्ह ऑफ मायबोली यु नो!

+११११ जुनं हितगुज पाहिजे वाचायला

मायबोलीवरचे धम्माल धागे असा धागा आहे ना आधीच?
असो. तरी पण - कुत्रा सार्वजनिक गाडीने गावी कसा न्यावा - https://www.maayboli.com/node/51614 फनी धागे म्हटले की हा आठवतोच Rofl