रूद्राभिषेक विषयी माहीती हवी आहे

Submitted by सूर्यगंगा on 13 March, 2020 - 09:06

रूद्राभिषेक विधी,त्याचे महत्व ,रूद्राभिषेकाचे प्रकार ,स्त्रिला हा विधी करता येतो का,पुजा विधी ब्राम्हनाकडूनच करून घ्यायची की स्वतःसुध्दा करू शकतो, किती वेळ लागतो इ.माहीती हवी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुद्राभिषेक बहुतेक पुरुषच करतात.‌ रुद्रपठण कोणालाही करता येत असावे. पण जाणकार ब्राह्मण ( पुरोहित) यथाविधी करु शकतो असे वाटते. खूप छान वाटतं रुद्रपठण करताना.
रुद्राभिषेकाचे फल सुध्दा चांगले मिळते. जरुर करुन घ्या.

स्त्रिला हा विधी करता येतो का
>> होय. मी स्वतः लघुरुद्राला अनेकदा बसले आहे.
गुरूजी म्हणूनही गेली आहे.
मी शिकले ते वाईचे अभ्यंकर शास्त्री लिंगभेद, जातीभेद न मानता इच्छा असलेल्या सर्वांना शिकवत. (जर देव सर्वांच्या घरी जातो तर वेद का नाही जाऊ शकत? असे म्हणायचे ते. मनापासून शिकण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला शिकवायचे.)

विधी ब्राम्हनाकडूनच करून घ्यायची की स्वतःसुध्दा करू शकतो, किती वेळ लागतो इ.माहीती हवी आहे.
>> रुद्र म्हणता येत असल्यास स्वतः करू शकता.
15-30 मिनिटे लागतील स्पीड नुसार.
एकादष्णीही करु शकता आपली आपली. (11 वेळा)
लघुरुद्र करायचा असेल तर पुरोहितांना बोलवावे लागेल. 2.5 तास साधारण.(11*11 )
महारुद्र आणि अतिरुद्र पण करता येतो. (121*11 , 121*121)

एकदा पुरोहित बोलवून vs एकदा युटयुब वरून करून बघा. जसे अनुभव तसे ठरवा.

विषय: धार्मिक-साहित्यहितगुज ग्रूप

पुण्यात असाल तर वेदमूर्ती डॉ. नित्यानंद देशमुख यांना भेटा. हवा असेल तर व्यक्तिगत संदेशातून त्यांचा मोबाईल नंबर देतो.

रूद्राभिषेक केवळ शिवशंकराचा करता येतो की इतर देवांचा पण करतात.
>> maruti, swami samarth ase je shankarache awatar samajale jatat tyanchahi karatat.
Rudra cha arth samajun ghya. Net var translation asel. Arthavar chintan Kara. Ek vyapak arth samor yeil. Itar devana karayala harakat nahi he maze mat tyatun alele ahe.

@parashuram - maza video nahiye.

धन्यवाद @ नानबा. मी रुद्रपाठ करतो पण लयीत जमत नाही. शब्द अडखळत नाहीत पण श्वास पुरत नाही सलग म्हणायला. पण खूप खूप छान वाटते म्हणायला. भगवान शंकर हे माझं इष्ट दैवत आहे.